शहरं
Join us  
Trending Stories
1
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
2
Mumbai Rain: 'गो अराऊंड'चा मेसेज आणि 9 विमानांच्या मुंबई विमानतळावर बराच वेळ घिरट्या
3
'अलास्का' इथं डोनाल्ड ट्रम्पच्या भेटीला पोहचले डुप्लिकेट पुतिन; सोशल मीडियात चर्चांना उधाण, कारण...
4
गुंतवणूकदार होणार मालामाल! 'ही' ऑटोमोबाईल कंपनी देणार प्रति शेअर १०० रुपये लाभांश, तुम्हालाही संधी?
5
मोठी नाचक्की...! ऑपरेशन सिंदूरवेळी कराची बंदरातून पाकिस्तानी नौदल पळून गेलेले; कुठे लपलेले...
6
Russia-Ukraine War : एकीकडे शांतता चर्चा, दुसरीकडे बॉम्ब वर्षाव: झेलेन्स्की अमेरिकेत असताना रशियाने युक्रेनला हादरवले!
7
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
8
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
9
दहावीतील विद्यार्थ्याची नववीतील विद्यार्थ्याने केली हत्या, चाकूने सपासप वार केले आणि...  
10
Mumbai Local: मुंबईत मुसळधार पाऊस! हार्बर आणि मध्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत
11
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
12
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
13
परळी हादरलं! लग्नावरून परतताना जीप पुरात वाहून गेली; तिघे बचावले, एकाचा मृत्यू
14
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
15
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले
16
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
17
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
18
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
19
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
20
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...

मार्चपर्यंत योजनांची सर्व रक्कम खर्च करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 21:41 IST

शासनाच्या विविध विभागाअंतर्गत येणाºया विविध योजनेतील सर्व रक्कम ३१ मार्चपर्यंत खर्च करा. अन्यथा वेतन वाढ रोखणार असल्याची तंबी उर्जामंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिली. तुमसर येथील नगर परिषदच्या प्रांगणात आयोजित ४२ कोटी रुपयांच्या विकास कामांच्या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना निर्देश : तुमसर येथे ४२ कोटी रुपयांच्या विविध कामांचे भूमिपूजन

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : शासनाच्या विविध विभागाअंतर्गत येणाºया विविध योजनेतील सर्व रक्कम ३१ मार्चपर्यंत खर्च करा. अन्यथा वेतन वाढ रोखणार असल्याची तंबी उर्जामंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिली.तुमसर येथील नगर परिषदच्या प्रांगणात आयोजित ४२ कोटी रुपयांच्या विकास कामांच्या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार मधुकर कुकडे, आमदार चरण वाघमारे, नगराध्यक्ष प्रदीप पडोळे, उपविभागीय अधिकारी स्मिता पाटील, मुख्याधिकारी अर्चना मेंढे, माजी खासदार शिशुपाल पटले, माजी नगराध्यक्ष अमरनाथ रगडे, अरविंद कारेमोरे, न.प. उपाध्यक्षा कांचन कोडवानी, सभापती सुनील पारधी, पंकज बालपांडे, राजू गायधने, किरण जोशी, तारा गभणे, नगरसेवक मेहताब ठाकुर, सचिन बोपचे, रजनिश लांजेवार, शाम धुर्वे, सलाम शेख, राजेश ठाकुर, किशोर भवसागर, प्रमोद घरडे, वर्षा लांजेवार, छाया मलेवार, शीला डोये, अर्चना भुरे, भारती धार्मीक, खुशलता गजभिये, स्मिता बोरकर उपस्थित होते.बावनकुळे म्हणाले, येणाऱ्या काळात शाश्वत वीज देणार असल्याचा मानस असून एक शेतकरी एक ट्रान्सफार्मर ही योजना राबविणार आहोत. नव्यानेच पालकमंत्री पांदन योजनेचा शासन निर्णय अपलोड झाला आहे. सर्वपक्षीय पुढाऱ्यांनी या योजनेचा फायदा घेऊन गावाचा विकास करावा.प्रास्ताविक नगराध्यक्ष प्रदीप पडोळे यांनी केले. त्यांनी शहराच्या विकासासाठी कटीबद्ध असल्याचे सांगून शहरवासीयांना दिलेले आश्वासन पूर्णत्वास नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न सुरु आहे. न.प. चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यालाही भविष्यात घरकुल उपलब्ध करून देणार आहे.खासदार मधुकर कुकडे यांनी जिल्ह्यातील नागरिकांना वीज मिळाली पाहिजे, अन्न मिळाले पाहिजे व सर्वांचा हाताला काम मिळाले पाहिजे. मात्र शासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याची खंत त्यांनी बोलून दाखविली.आमदार चरण वाघमारे यांनी शासनाच्या कार्यशैलीचे कौतूक करून मुख्यमंत्र्यांनी तुमसर शहराला १५० कोटी रुपये देण्याच्या आश्वासनाची पूर्तता सुरु असल्याचे सांगितले. संचालन चंद्रकांत भट यांनी केले. आभार जगदीश ठाकरे यांनी मानले.