शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सवाच्या तयारीला वेग

By admin | Updated: August 25, 2014 23:49 IST

गणेश चतुर्थी जवळ येऊ लागल्यामुळे गणपती मूर्ती बनविण्याच्या कामाला चांगलाच वेग आला आहे. भारतीय संस्कृतीत कोणत्याही शुभ कार्याची सुरूवात करताना सर्वप्रथम गणरायाचे पूजन आणि स्तवन केले जाते.

भंडारा : गणेश चतुर्थी जवळ येऊ लागल्यामुळे गणपती मूर्ती बनविण्याच्या कामाला चांगलाच वेग आला आहे. भारतीय संस्कृतीत कोणत्याही शुभ कार्याची सुरूवात करताना सर्वप्रथम गणरायाचे पूजन आणि स्तवन केले जाते. भारतीय संस्कृतीत गणेशाला सर्वप्रथम मान देण्यात येतो. येत्या २९ आॅगस्टला गणरायाचे घराघरांत व सार्वजनिक ठिकाणी आगमन होणार आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या पूर्वतयारीला शहरासह ग्रामीण भागात वेग आला आहे. लोकमान्य टिळकांनी समाजाने एकत्र येऊन चर्चा करावी व गावात शांतता व धार्मिक वातावरण निर्माण व्हावे, या उद्देशाने सन १९३४ मध्ये पुणे येथे सार्वजनिक गणेशोत्सवाची स्थापना केली. तेव्हापासून आजतागायत घराघरात व लहानमोठ्या खेड्यापाड्यात बाप्पा पोहोचले. यावर्षी कोरडा दुष्काळ असल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहेत. मात्र गणरायाची दुष्काळ असो किंवा अतिवृष्टी, न चुकता शेतकरी सुख दु:ख विसरून स्थापना करतात. गणेशोत्सवासाठी बालगोपाल, गणेश मंडळांचे सदस्य, बाप्पांच्या स्वागतासाठी आतापासूनच धडपड करताना दिसत आहे. एक गाव - एक गणपती, या राज्य शासनाच्या संकल्पनेला गणेश मंडळांनी प्रतिसाद न दिल्याने शहरातील अनेक चौकाचौकांत व ग्रामीण भागातील प्रत्येक गावात दोन ते तीन गणेश मंडळ दिसत आहेत. बहुतांश घरांमध्येही गणरायाची स्थापना होते. त्यामुळे मूर्तीकारांकडे गणपतीच्या बुकींगलाही वेग आला आहे. आता जवळपास सर्वच मूर्तीचे काम शेवटच्या टप्प्यात पोहोचले आहे. रंगरंगोटीचा अंतिम हाथ सुरू आहे. याचबरोबर सार्वजनिक ठिकाणी बसणाऱ्या गणरायाच्या आगमनासाठी मंडप डेकोरेशन, लायटींग, डीजीटल बॅनर, आकर्षक गेटची उभारणी करताना गणेश मंडळांचे सदस्य व्यस्त आहेत. गणपतीच्या आगमनासाठी व विसर्जनासाठी बँड, डी.जे.चे बुकींगही गणेश मंडळाकडून करण्यात येत आहे. गणरायाच्या स्थापनेसाठी सर्वच उत्सुक दिसून आहेत. पोलिसांनीही विविध गणेश मंडळांना शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक त्या सूचना दिलेल्या आहेत. (प्रतिनिधी)