शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

चांदपूरच्या विकासाला गती देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 21:38 IST

भंडारा जिल्ह्यात चांदपूर गावाची नंदनवन म्हणून ओळख आहे. या गावात विविध देवस्थान व पर्यटन स्थळ आहे. देवस्थान भाविकांचे श्रद्धास्थान असून पर्यटन स्थळात अनेक पर्यटक दाखल होत आहे.

ठळक मुद्देधनेंद्र तुरकर : गावात विविध विकास कामांचे भूमिपूजन

लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : भंडारा जिल्ह्यात चांदपूर गावाची नंदनवन म्हणून ओळख आहे. या गावात विविध देवस्थान व पर्यटन स्थळ आहे. देवस्थान भाविकांचे श्रद्धास्थान असून पर्यटन स्थळात अनेक पर्यटक दाखल होत आहे. यामुळे परिसरातील अर्थव्यवस्था सावरण्यास मदत मिळत आहे. चांदपूर गावाचे विकास कार्यासाठी निधी खेचून आणण्याचे प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे अर्थ व शिक्षण समितीचे सभापती धनेंद्र तुरकर यांनी केले.सातपुडा पर्वत रांगेच्या टेकडीवर असणाऱ्या चांद शॉ वली दरगाहाचे पायºया बांधकामाचे आयोजित भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते.आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी दरगाह कमेटीचे अध्यक्ष रियाज अली सैयद होते तर प्रमुख अतिथी म्हणून सिहोराचे सरपंच मधु अडमाचे, कादर अन्सारी, हेमराज लांजे, शकील कुरैशी, मानिक ठाकरे, इकबाल शेख, महेंद्र चौरीवार, फिरोज पठाण, राहुल लारोकर, कान्हा बर्वे उपस्थित होते. धनेंद्र तुरकर पुढे म्हणाले सातपुडा पर्वत रांगाच्या घनदाट जंगलात असणाºया चांदपूर गावात निसर्ग वैभव, हिंदू - मुस्लिम बांधवाचे देवस्थान आहेत.या देवस्थानात लाखो भाविक दर्शनासाठी येत आहे. गाव आणि देवस्थानचे विकास कार्यासाठी राजकारण आड येवू नये. या गावातील वैभावाने देशाचे काना कोपºयात ओळख निर्माण केली आहे.जागृत हनुमान देवस्थान चांद सां वली दरगाह, ऋषी मुनीचे आश्रम आणि पर्यटन स्थळ अशी सांगड असणाºया या गावाचे विकास कार्यासाठी एकाच व्यासपीठावर येण्याची गरज आहे.चांद सां वली दरगाहचे पायºया बांधकामासाठी तीन लाखाचा निधी मंजुर करण्यात आला आहे. याच गावात महिनाभरात राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते प्रफुल पटेल यांचे हस्ते सिमेंट रस्ता बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले आहे. गावाचे विकासात सातत्याने भर पडत आहे. जिल्हा परिषद अंतर्गत तिर्थस्थळ पॅकेजचा कायदा या गावातील देवस्थानचे विकास कार्यायासाठी प्रयत्न करणार आहे.राज्य शासनाला निधी मंजुरी करिता पाठपुरावा करण्यात येईल. या शिवाय सिहोरा परिसरातील गावांना विकासाचे एकसुत्रात बांधण्याचे प्रयत्न केली जाणार आहे. पर्यटन स्थळाचे विकास कार्याकरिता सहकार्याची भूमिका घेतली जाणार आहे. चांदपूरचे विकास करिता राज्य शासनाने जलद गतीने निधी मंजुरी करण्याची आवश्यकता आहे.कार्यक्रमाचे संचालन कादर अन्सारी यांनी केले तर आभार प्रदर्शन फिरोज पठाण यांनी मानले.