शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
2
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
3
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
4
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
5
बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!
6
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
7
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
8
भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवलेला नेता चकमकीत ठार, अनेक गुन्ह्यांत होता वाँटेड
9
देवदर्शनासाठी जाणारी पिकअप १०० ते १५० फूट दरीत; ३० महिला जखमी, तिघांचा मृत्यू, खेड तालुक्यातील घटना
10
बाजारात तेजी परतली! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, टाटा-SBI सह 'या' शेअर्सचा गुंतवणूकदारांना दिलासा
11
शाब्बास पोरी! देशसेवेचं स्वप्न पाहिलं- सत्यात उतरवलं अन् झाली IAS; हार मानलीच नाही..
12
डोनाल्ड ट्रम्प झाले 'वसुली भाई'; चिप निर्यातीचा लायसन्स देण्यासाठी आता कंपन्यांकडून मागताहेत पैसे
13
Janmashtami 2025: १० ऑगस्ट रोजी सुरू झाली आहे कृष्ण नवरात्र; त्याची सांगता कधी आणि कशी?
14
MS Dhoni: "तुला आयपीएल खेळायचं आहे", चाहत्याची कमेंट, धोनीनं काय उत्तर दिलं? पाहा
15
भटक्या कुत्र्यांना पकडा आणि..., सर्वोच्च न्यायालयाने दिले सक्त आदेश
16
“भाजपा-महायुती लुटेरे, केंद्रात-राज्यात राज्यघटनेच्या विचाराचे सरकार आणू”; काँग्रेसचा एल्गार
17
Janmashtami 2025: पती-पत्नीचे नाते राधा-कृष्णासारखे व्हावे, म्हणून जन्माष्टमीला करा 'हे' वास्तू उपाय!
18
१५० सेवा, ३ कोटी प्रवासी, ७५ हजार कोटींचे उत्पन्न; ‘वंदे भारत’ची महाराष्ट्रात काय स्थिती?
19
मध्य प्रदेशात भीषण अपघात, जीप आणि दुचाकीच्या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं?
20
हत्तीजवळ जाऊन फोटो काढणे भोवले; तरुणाला पायाखाली चिरडले, पाहा धक्कादायक Video...

पाणीपुरवठा योजनेसाठी विशेष ग्रामसभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2019 00:29 IST

गत दहा वर्षांपासून सातत्याने पाणीप्रश्न मार्गी लागावा, या हेतुने तरुणापासून तर वृध्दापर्यंत सर्वांनी नानाविध उपाययोजना केली. यात पालकमंत्री, आमदार देखील हतबल झाले. शेवटी गावातील सुमारे दिडशे नागरिकांनी सह्यांचे निवेदनाद्वारे चार जानेवारीला ग्रामपंचायतला दिले.

ठळक मुद्देतारांकित प्रश्नानंतरही तिढा कायम : प्रकरण ठाणा पेट्रोलपंप येथील दीड कोटींच्या पाणीपुरवठा योजनेचे

लोकमत न्यूज नेटवर्कजवाहरनगर : गत दहा वर्षांपासून सातत्याने पाणीप्रश्न मार्गी लागावा, या हेतुने तरुणापासून तर वृध्दापर्यंत सर्वांनी नानाविध उपाययोजना केली. यात पालकमंत्री, आमदार देखील हतबल झाले. शेवटी गावातील सुमारे दिडशे नागरिकांनी सह्यांचे निवेदनाद्वारे चार जानेवारीला ग्रामपंचायतला दिले. मासिक व ग्रामसभेत चर्चा न करता अर्जाकडे दुर्लक्ष केले. परिणामी तहकुब ग्रामसभेत महिलांनी मागणी रेटून धरली. अखेर सचिवाला विशेष ग्रामसभेचे आयोजन ११ फेब्रुवारीला करण्याचे भाग पाडले.जिल्ह्याच्या पश्चिम टोकावर असलेले विकसीत खेडेगाव म्हणजे ठाणा पेट्रोलपंप. येथे १५ अधिक सरपंच असे एकंदरीत १६ सदस्य ग्रामपंचायतमध्ये विराजमान आहे. येथील भौगोलीक परिस्थितीचा विचार करता ९० टक्के घरे व अंतर्गत रस्ते हे सिमेंट काँक्रीटचे आहेत. १२ वर्षापुर्वी टंचाईकृती आराखड्याअंतर्गत खरबी-ठाणा संयुक्त नळयोजना कार्यान्वित होती. १३ सार्वजनिक नळ स्टॅडपोस्टद्वारे जमीनीवर दोन फुट उंचावर उच्चदाबयुक्त पाणी दिवसाला दोन वेळा गावकऱ्यांना मिळत होते. दरम्यान गावाला जलशुध्दीकरणाव्दारे पाणी मिळावे, याकरिता तत्कालीन राज्यमंत्री बंडुभाऊ सावरबांधे, सामाजिक कार्यकर्ते दिनदयाल देशभ्रतार, माजी सरपंच राजेश गिरी, उपसरपंच रामचंद्र किंदर्ले, पाणीपुरवठा समिती सदस्य अनिल पाटील, ऋषीराज मेळे, प्रल्हाद हुमणे, किसन मानकर यांच्याद्वारे ३० जुन २००५ मध्ये महाजल स्वजलधारा अंतर्गत ठाणा पेट्रोलपंप येथे स्वतंत्र नविन नळ योजना मंजुरीचा ठराव पारीत करुन मुंबई-दिल्ली कार्यालयाद्वारे एक कोटी ४६ लक्ष किंमतीची महत्वाकांक्षी नळ योजना आणली. रितसर नळयोजनेचे भूमीपूजन जून २००९ ला करण्यात आले.नियोजनानुसार कामाला सुरुवात करण्यात आली. लगेच ग्रामपचांयत निवडणुका लागल्या नविन सदस्य ग्रामपचांयत व पाणीपुरवठा समितीमध्ये आले. कालांतराने राज्यातही रस्ता परिवर्तन झाले. एकाच कामाला तीन कंत्राटदाराकरवी गावातील पाणीपुरवठा कामे करण्यात आली. काम कसे सुरु आहे यावर कुणाचेही लक्ष नव्हते. ९० टक्के रक्कम खर्च झाले. मात्र गावाला एक थेंब पाण्याचे मिळाले नाही. तरुण, ज्येष्ठ महिला पुरुषांनी पाणी प्रश्नाबाबत ग्रामपंचायत पाणीपुरवठा समिती व जिल्हा ग्रामीण पाणीपुरवठा विभाग यांच्याकडे विचारणा केली असता उडवाउडवीचे उत्तर मिळत होते. गावातील नवीन वाढीव पाईप लाईनची मागणी मंजुर करुन ‘क’ चे मिशन करीत होते. दिड कोटी खर्च झाले, मात्र गावाला एक थेंब पाणी देऊ शकले नाही. आमदार रामचंद्र अवसरे यांनी विधानसभेत तारांकीत प्रश्न उपस्थित केले होते. येथे ही ‘क’ चे मिशन करणारा खाऊदास पोहचला आणि प्रकरण थंडावला. पालकमंत्र्यांकडेही ठाणा येथील पाणी प्रश्न रेटले यातही यश पदरी पडले नाही. अमित देशभ्रतार यांनी माहितीचा अधिकार वापर केला. यावरही ‘क’ चे मिशनधारक येऊन ठेपले. हतबल झालेले ग्रामस्थ आता शेवटचा उपाय म्हणून ४ जानेवारीला दिडसे नागरिकांच्या सह्या असलेले निवेदन ग्रामपंचायत ठाणा पेट्रोलपंपला दिला. मात्र ग्रामपंचायतच्या मासिक सभेत २६ जानेवारीच्या तहकुब ग्रामसभेत विषय चर्चेला घेतला नाही व निर्णय घेतला नाही. गावातील महिलांनी २ फेब्रुवारीच्या तहकुब ग्रामसभेत गावातील पिण्याच्या पाण्याच्या प्रश्न मार्गी लागण्यासाठी विशेष ग्रामसभा ११ फेब्रुवारीला आयोजित केली होती.

टॅग्स :water transportजलवाहतूक