शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

तूर उत्पादक शेतकऱ्यांची बोळवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2017 00:40 IST

भंडारा धान उत्पादक जिल्हा असला तरी मागील वर्षी तूर डाळीचे भाव गगनाला भिडले होते.

हमीभाव केंद्राचा अभाव : प्रशासनाने लक्ष देण्याची गरजमुखरु बागडे पालांदूरभंडारा धान उत्पादक जिल्हा असला तरी मागील वर्षी तूर डाळीचे भाव गगनाला भिडले होते. त्यामुळे जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात तुरीचे उत्पादन घेतले आहे. मात्र नाफेड अंतर्गत एकही हमीभाव केंद्र नसल्याने येथील शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून बोळवण होत आहे. शेतकऱ्यांच्या अनभिज्ञतेचा फायदा घेत खाजगी व्यापारी शेतकऱ्यांची मोठी आर्थिक लूट करीत आहे. यामुळे शेतकऱ्यांना हमी भावापेक्षा २० ते २५ रुपये कमी मिळत असल्याने शेतकरी संकटात सापडले आहे. शासनाने तूर डाळीला ४६२५ रुपये व ४२५ रुपये बोनस जाहीर केला असतानाही शेतकऱ्याला मात्र त्याचा लाभ मिळणे दुरापास्त झाले आहे. यामुळे घराघरात पोहचलेले खाजगी व्यापारी शेतकऱ्यांची डाळ खरेदी करताना जुन्याच काट्याने किंवा पायलीने ती खरेदी करीत असल्याने शेतकऱ्यांची अक्षरश: लूट होत असल्याचे चित्र आता नित्याचे झाले आहे.मागील वर्षी तूर डाळीचे भाव २०० रुपये किलोवर पोहचले होते. त्यामुळे सर्वसामान्यांच्या जेवनातील तूर डाळ दिशेनासी झाली होती. त्यामुळे नगदी उत्पादन म्हणून यावर्षी अनेक शेतकऱ्यांनी तुरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले. त्यांना निसर्गानेही साथ देत तूर डाळीचे अधिक उत्पादन झाले. तुरीची डाळ विकण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती किंवा केंद्रसरकारच्या नाफेडच्या माध्यमातून जिल्ह्यात धान खरेदी केंद्रासारखे डाळ खरेदी केंद्र नाही त्यामुळे तूर डाळीला हमीभाव दिला असला तरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यापासून वंचितच राहावे लागत आहे.नाफेड ने जिल्ह्यात हमी भाव केंद्र सुरु करावे अशी मागणी परिसरातील तूर उत्पादकांनी केली आहे. हमीभाव केंद्राअभावी जिल्ह्यातील डाळ खरेदी करणारे खाजगी व्यापारी शेतकऱ्यांकडून डाळ खरेदी करीत असले तरी त्यांना योग्य मोबदल्यापासून दूर रहावे लागत आहे. प्रतिकिलो मागे शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. प्रशासनाने ही बाब लक्षात घेता. जिल्ह्यात नाफेड अंतर्गत तुर डाळ खरेदी केंद्र सुरु करावे अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. तूर खरेदी नाफेड मार्फत केली जाते. त्यानी जागा मागीतली तर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात व्यवस्था केली जाईल. भंडारा जिल्ह्यात नाफेड ही खरेदी यंत्र नसल्याने शेतकऱ्यांची अडचण होणे शक्य आहे. - संजय पारोदे, सचिव, कृउबा समिती लाखनीशेतकऱ्यांनी हमीभावापेक्षा कमी किमतीने तूर विकू नये, शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील तुरीची माहिती बाजार समितीला द्यावी नंतर त्याची माहिती जिल्हाधिकारी यांना देवून हमीभाव केंद्र सुरु करण्याची मागणी करु.- शिवराम गिऱ्हेपुंजे, अध्यक्ष, कृउबा समिती, लाखनी