शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
2
Maharashtra Police Bharti 2025: १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
3
"तिसरं मूल झाल्यास गाय अन् ५०००० रुपयांचं बक्षीस"; घोषणा करणाऱ्या खासदाराचं पंतप्रधान मोदींनी केलं कौतुक!
4
प्रेमविवाहानंतर अवघ्या १० दिवसांत पत्नीचा काटा काढला; पोलीस शिपाई का बनला गुन्हेगार?
5
पैशांचा पाऊस! अदानींच्या संपत्तीत एका दिवसात ५० हजार कोटींची वाढ, टॉप-२० श्रीमंतांच्या यादीत पुन्हा स्थान!
6
Video: एकाच महिलेचं ६ वेळा मतदार यादीत नाव, EPIC क्रमांक वेगळे...; महाराष्ट्रातील प्रकार व्हायरल
7
ना करुण नायर, ना श्रेयस अय्यर, ना साई सुदर्शन... ३ नंबर बॅटिंगसाठी गांगुलीची कुणाला पसंती?
8
एका झटक्यात ₹४००० नं घसरला शेअरचा भाव; शेअर विकण्यासाठी गुंतवणुकदारांच्या रांगा, पाहा कोणता आहे स्टॉक?
9
कोण आहेत १२४ वर्षीय मिंता देवी? ज्यांच्या नावाचं टी-शर्ट घालून विरोधकांचा संसदेत राडा!
10
पंजाब पोलिसांची मोठी कारवाई; बब्बर खालसा संघटनेशी संबंधित ५ दहशतवाद्यांना अटक
11
आसिम मुनीर यांना सारखं अमेरिकेत बोलावून भारतच नव्हे, तर 'या' तीन देशांनाही इशारा देतायत डोनाल्ड ट्रम्प!
12
'परम सुंदरी'च्या रोमँटिक केमिस्ट्रीवर भाळले प्रेक्षक, सिनेमात कॉमेडीचाही तडका; ट्रेलर रिलीज
13
१४, १५ की १६ ऑगस्ट? नेमकी कधी आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी? पाहा, शुभ मुहूर्त, महत्त्व, मान्यता
14
पोरी हुश्शार! भारतीय महिला फुटबॉल टीमने रचला इतिहास, २० वर्षांनी आशियाई कपसाठी क्वालिफाय
15
या ऑटो कंपनीने सर्वांवर कडी केली...! १० वर्षांची एक्स्टेंडेड वॉरंटी स्कीम आणली, आधीच तीन वर्षे...
16
“काँग्रेसने जनहिताची भरपूर कामे केली, सोशल मीडियावर सक्रीय व्हा”; कार्यकर्त्यांना कानमंत्र
17
ना भीती, ना ढोंग, ना पश्चाताप.., Gen Z आणि मिलेनियल्सबाबत काय म्हणाले अमन गुप्ता?
18
तेजश्री प्रधानचं वय माहितीये का? सुंदर दिसण्यासाठी करते फक्त 'ही' एकच गोष्ट
19
"चल हट, येथून निघून जा...", भाजपा नेत्याच्या मुलाची गुंडगिरी, पोलीस कॉन्स्टेबलशी गैरवर्तन
20
'छावा', 'द काश्मीर फाईल्स' सारखे सिनेमे बनवणार नाही, जॉन अब्राहम असं का म्हणाला?

बोगस धान बियाणांमुळे शेतकऱ्यांची बोळवण

By admin | Updated: April 27, 2017 00:31 IST

अडयाळ व परिसरातील शेतकरी खरीप हंगामात याआधी फसले. परंतु उन्हाळी पीक घ्यावे म्हणून अडयाळ येथील कैलास कावळे यांनी....

कारवाईची मागणी : शेतकऱ्यावर हजारो रूपयांचा भूर्दंडविशाल रणदिवे अडयाळअडयाळ व परिसरातील शेतकरी खरीप हंगामात याआधी फसले. परंतु उन्हाळी पीक घ्यावे म्हणून अडयाळ येथील कैलास कावळे यांनी दीड एकरासाठी व दिपक गभने यांनी दीड एकरासाठी वृंदावन कृषी केंद्र अडयाळ येथून यांच्या सांगण्यानुसार २५ नोव्हेंबर १६ ला सिजंटा हायब्रीड एनके-५२५१ जातीची धान विकत घेतले. मात्र हे धान्य १२० दिवसाचे होते. परंतु १६० दिवसानंतरही पिकाचा लाभ शेतकऱ्यांना झाला नाही. या दोन्ही शेतकऱ्यांची फसवूणक झाली. यात धान्य कंपनी तथा कृषी केंद्र चालकावर कायदेशीर कारवाइ करण्याची मागणी जिल्हा ग्राहक सरंक्षण परिषद तथा जिल्हाधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी भंडारा यांना दिलेल्या पत्रात शेतकऱ्यांनी केली आहे.दोन्ही शेतकऱ्यांनी शेतात गहू न लावता १२० दिवसाचे भातपीक लावले. तेव्हापासून ते आतापर्यंत कृषी केंद्र चालकाच्या सल्ल्यानुसार खत, फवारणी, औषधी मारली. आपल्या कंपनीचे धान्य १२० दिवसाचे असून धान्य आतापर्यंत आले नाही. याच्या पाहणीसाठी कंपनीचे मोठमोठे अधिकारी येऊन गेले. परंतु त्यांच्याकडून वेळकाढूपणाचे उत्तर मिळाले आणि त्यानंतर पुन्हा आले नाही. कैलास कावळे या शेतकऱ्यांने शेतात नेवून आपबिती सांगितले. शेतातले दृश्य एवढे भयंकर आहे की त्या शेतकऱ्यांची फसवणूक आल्याचे कळते. धान १२० दिवसाचा आहे म्हणून हे धान पेरले. १५० दिवस होवून सुध्दा पुढिल अंदाजे एक महिना फसल धानाची हातात येवू शकत नही. आजच्या घडला त्या धानाला पाण्याची गरज आहे. परंतु कैलास कावळे यांच्या बोरला पाणी नाही म्हणजे दात आहेत तर चने नाही आणि चने आहेत तर दात नाही. आपल्या कंपनीचे धान १२५ दिवसाचे आहे असे या कंपनीचे अधिकारी व कृषी केंद्र चालक ही सांगतात. मग आज १५० दिवस होवून सुद्धा त्या सिजंटा कंपनीचे एनके ५२५१ हे धान आले का नाही? या शेतकऱ्यांची आतापर्यंत या धानाच्या शेतीसाठी ७६,६६० रुपये खर्च केले. पण आज यामुळेच मानसिक तणावात वावरतांना दिसत आहे. जिल्ह्यात दरवर्षी असे प्रकार घडतात. कंपनी संचालकांवर कडक कारवाई करणे गरजेचे आहे. सिजंटा हायब्रीड एनके-५२५१ हे धान १२५ दिवसाचे आहे. आम्ही या शेतकऱ्यांच्या शेतात पाहणीकरिता येणार होतो. पण येवू शकलो नही, आणि याविषयी मी काहीही माहिती मोबाईलवर देवू शकत नाही. लवकरच शेतीची पाहणी केली जाईल.- किशोर डामरे, सेल्स युनिट लीडर.मी या विषयी अनेकदा सिजंटा कंपनीच्या अधिकाऱ्यांशी बोललो. परंतु त्यांनी आज-येतो उद्या येतो असेच बोलतात. परंतु या कंपनीमुळे हा शेतकरी फसला आहे. याला न्याय मिळणे गरजेचे आहे.- महेश वैद्य, वृंदावन कृषी केंद्र.१२० दिवसाची व्हेरायटी लावली. परंतु १५० दिवस होवून सुद्धा धान परिपक्वअवस्थेत आले नाही. पाणी नाही त्यामुळे हातची फसल जाईल. त्यामुळे मला धान्य कंपनीने मदत करावी हीच मागणी आहे.- कैलाश कावळे, शेतकरी.