शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

सभापती व तलाठी वाद पोहोचला ठाण्यात

By admin | Updated: August 9, 2014 00:47 IST

सिंदपुरी येथे मालगुजारी तलाव फुटून १७ दिवस झाले. महसूल प्रशासनाने येथे नुकसानग्रस्त घरांचा पंचनामा केला नाही.

तुमसर : सिंदपुरी येथे मालगुजारी तलाव फुटून १७ दिवस झाले. महसूल प्रशासनाने येथे नुकसानग्रस्त घरांचा पंचनामा केला नाही. खावटी दिली नाही, शासकीय मदत दिली नाही. ग्रामस्थांनी तीनदा निवेदन देऊनही दखल का घेत नाही, यावरुन पंचायत समिती सभापती कलाम शेख आणि तलाठी भावे यांच्यात शाब्दिक वाद झाला. त्यानंतर भावे यांनी कामात व्यत्यय आणला, या आशयाची शेख यांच्याविरुद्ध सिहोरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन सभापती शेख यांच्याविरूद्धात सिहोरा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.दि.२२ जुलै रोजी पहाटे सिंदपुरी येथील मालगुजारी तलावाची पाळ फूटली. संपूर्ण गाव वाहून जाण्याची भिती होती. सुदैवाने दुसरीकडून तलावाची पाळ ग्रामस्थांनी फोडल्याने संकट टळले. प्रशासनाने येथे तात्काळ धाव घेतली नव्हती. सिंदपुरी येथील ६० ते ७० घरांना या तलावातील पाण्याचा फटका बसला. ते कुटूंब सध्या गावातील विष्णु मंदीर, हनुमान मंदीर व स्थानिक नागरिकांचया घरी आश्रयास आहेत. महसूल प्रशासनाचा गावातील मुख्य कर्मचारी तलाठी भावे यांनी पिडीतांची पूर्ण यादी तयार केली नाही. खावटी मदतीचा प्रस्ताव व पडलेल्या घरांचे पंचनामे अद्याप तयार केले नाही. ज्यांना पाण्याचा फटका बसला त्यांचे नाव मदत यादीत नाही तर ज्यांना फटका बसला नाही त्यांची नावे सर्रास या यादीत तलाठी भावे यांनी नोंदविली आहेत.ग्रामस्थांकडून चिरीमिरी घेवून खोटी नावे मदत यादीत घातल्याचा आरोप शेख यांनी केला आहे. घरांचे पंचनामे तात्काळ तयार करा, असे निर्देश सभापती कलाम शेख यांनी तलाठी भावे यांना दिले. यादीसंदर्भात जाब विचारला सभापती शेख व भावे यांच्यात शाब्दिक वाद झाला. शासकीय मदत व पंचनामे याकरिता शेख यांनी जिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार यांना दिले. परंतु आतापर्यंत कोणतीच कारवाई झाली नाही. ग्रामस्थांसोबत सभापती शेख यांनी तहसीलदार सचिन यादव यांनी भेट घेतली होती. दरम्यान तुम्ही नायब तहसीलदारांना भेटा, असे सांगण्यात आले. इकडून तिकडे चेंडू टोलविला जात आहे. महसूल प्रशासन उदासीनप्रशासनाच्या दुर्लक्षामुळेच सिंदपुरी येथील मालगुजारी तलावाची पाळ फूटली. यातून प्रभावित व बेघर झालेल्या नागरिकांना प्रशासनाने तात्काळ कोणती मदत करता येईल ती नियमानुसार करणे तेवढेच गरजेचे आहे. घरे सध्या धोकादायक स्थितीत आहेत. घरात प्रवेश कसा करावा, प्रवेश करतानी भीती वाटते, असे ग्रामस्थांनी सांगितले. तलाठी भावे यांचेशी शाब्दिक चकमक प्रकरणी भावे यांनी संघटनेसह तहसीलदारांना कामबंद आंदोलनाचे निवेदन शुक्रवारी दिले. यामुळे लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ विरूद्ध प्रशासन अशी संघर्षाची स्थिती निर्माण झाली आहे. (तालुका प्रतिनिधी)