शहरं
Join us  
Trending Stories
1
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
2
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
3
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
4
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
5
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत पर्यटक अनेक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
6
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
7
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
8
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
9
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
10
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
11
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
12
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
13
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
14
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
15
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
16
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
17
विशेष लेख: ढिसाळ रेल्वे, बेदरकार प्रवासी हेच जबाबदार!
18
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
19
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
20
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक

सोयाबीन : हमीभाव रु ३८८०

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2020 05:00 IST

केंद्र शासनाने सोयाबीनसाठी हमीभाव प्रतिक्विंटल ३ हजार ८८० रुपये असा जाहीर केला आहे. चालू हंगामात सोयाबीनची आवक बाजारात सुरू झाली आहे. बाजारभाव हमीभावापेक्षा कमी असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी खरेदी केंद्रे लवकरच सुरू करण्यात येणार आहेत.

ठळक मुद्देऑनलाईन नोंदणीला झाली सुरुवात : १५ ऑक्टोबरपासून खरेदी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : चालू हंगामातील किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठीची ऑनलाईन नोंदणी १ ऑक्टोबरपासून सुरू झाली आहे. सोयाबीन खरेदीची सुरुवात १५ ऑक्टोबरपासून होणार आहे. त्यादृष्टीने जिल्ह्यातील अधिकाधिक सोयाबीन उत्पादकांची नोंदणी होण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करावे आणि खरेदी प्रक्रियेच्या दृष्टीने केंद्रावर परिपूर्ण नियोजन व व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.केंद्र शासनाने सोयाबीनसाठी हमीभाव प्रतिक्विंटल ३ हजार ८८० रुपये असा जाहीर केला आहे. चालू हंगामात सोयाबीनची आवक बाजारात सुरू झाली आहे. बाजारभाव हमीभावापेक्षा कमी असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी खरेदी केंद्रे लवकरच सुरू करण्यात येणार आहेत. कोरोनाकाळ लक्षात घेऊन दक्षतेच्या दृष्टीने खरेदी केंद्रांवर होणारी गर्दी टाळण्यासाठी गुरुवारपासून ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याचे पणन अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.मूग व उडीद खरेदीसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रत्यक्ष खरेदीलाही सुरुवात करण्यात येत आहे. जिल्ह्यात राज्य पणन महासंघाची धारणी, चांदूर रेल्वे, तिवसा व दर्यापूर येथे आणि विदर्भ मार्केटिंग सोसायटीची वरूड, अमरावती, चांदूर बाजार, मोर्शी, अंजनगाव, धामणगाव रेल्वे येथे केंद्र्रे आहेत.- कल्पना धोपे, पणन अधिकारीऑनलाईन नोंदणीसाठी हे आवश्यकऑनलाईन नोंदणीसाठी आधार कार्ड, सातबारा उतारा, पीकपेरा, बँक पासबूक आदी आवश्यक आहे. नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांना नोंदणीच्या क्रमवारीनुसार सोयाबीन खरेदी केंद्रावर आणण्यासाठी एसएमएसद्वारे कळविण्यात येईल. ज्या केंद्रावर नोंदणी केली आहे त्याच केंद्रावर एसएमएस आल्यानंतरच शेतकऱ्यांनी शेतमाल घेऊन यावा. सर्व खरेदी ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. शेतकऱ्यांनी आपआपल्या तालुक्यातील किंवा जवळच्या खरेदी केंद्रावर नोंदणी करावी. नोंदणीकरिता आधार कार्डची छायांकित प्रत आणि पिकाची नोंद असलेला सातबारा उतारा सादर करावा. शेतकरी बांधवांनी आपला मोबाईल क्रमांक खरेदी केंद्रावर नोंदवावा.

टॅग्स :agricultureशेती