शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
3
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
4
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
5
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
6
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
7
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
8
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
9
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
10
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
11
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
12
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
14
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
15
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
16
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
17
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
18
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
19
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
20
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा

आधारभूत खरेदी केंद्रावर धान पडूनच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:31 IST

आधारभूत धान खरेदी केंद्र शेतकऱ्यांना तारणहार ठरलेले आहे. शासनाच्या आधारभूत केंद्रावर शेतकरी हक्काने धान विक्री करतो. यावर शासनाच्यावतीने मूळ ...

आधारभूत धान खरेदी केंद्र शेतकऱ्यांना तारणहार ठरलेले आहे. शासनाच्या आधारभूत केंद्रावर शेतकरी हक्काने धान विक्री करतो. यावर शासनाच्यावतीने मूळ किमती व्यतिरिक्त प्रोत्साहन राशी अर्थात बोनस सुद्धा मिळते. शेतकरी आपला धान आधारभूत केंद्रावर विकून मोकळा होतो. परंतु आधारभूत केंद्राने खरेदी केलेला धान पुढे भरडाईसाठी उचल होत नसल्याने धान संकटात सापडलेले आहेत. अवकाळी पावसाच्या दणक्यात धानाला सडका वास सुद्धा येत आहे. गोदाम उपलब्धता अत्यल्प असल्याने व शेतकऱ्यांचे धान मोजणे अत्यावश्यक झाल्याने खुल्या जागेत धान मोजल्याशिवाय पर्याय नव्हता. लोकप्रतिनिधींनी सुद्धा मोजणीकरिता प्रोत्साहित केले. मात्र आता धानाची उचल होत नसल्याने मध्यस्थाची भूमिका लोकप्रतिनिधींनी निभवावी अशी अपेक्षा आधारभूत धान खरेदी केंद्राकडून व्यक्त होत आहे.

बॉक्स

उताऱ्याची समस्या कायम

धान भरडाई झाल्यानंतर मिलर्सनी शासनाला ६७ टक्के एवढे तांदूळ देणे आवश्यक आहे. परंतु हंगामाचा अभ्यास केला असता केवळ ६० टक्के एवढाच उतारा निघालेला आहे. त्यामुळे ७ टक्क्याची उताऱ्याची समस्या कायम आहे. या समस्याकरिता लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी, मंत्रालयातील सचिव यांनी पुढाकार घेत शेतकऱ्यासह आधारभूत खरेदी केंद्रांना न्याय द्यावा. खरेदी केलेला धान १ मे पूर्वी न उचलल्यास उन्हाळी धानाचा हंगाम प्रभावित होण्याची दाट शक्यता उभी झालेली आहे.

मुरमाडी तुपकर येथील आधारभूत केंद्राच्यावर ४५ हजार क्विंटल धानाची खरेदी आटोपली आहे. यातून भरडाईकरिता केवळ २२०० कट्ट्यांची उचल झालेली आहे. उर्वरित सर्व धान केंद्रात पडून आहे. धान झाकण्यासाठी ७५ हजारांची ताडपत्री खरेदी करण्यात आली. जिल्हा पणन कार्यालयाने आधारभूत खरेदी केंद्राच्या समस्यांची जाणीव ठेवून तात्काळ भरडा याचा प्रश्न निकाली काढावा.

मधुकर झंझाळ,

संचालक दि भगीरथ भात गिरणी मुरमाडी/ तुपकर