शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

सोनी हत्याकांड : जलदगती न्यायालयात १५ पासून सुनावणी

By admin | Updated: September 2, 2014 23:30 IST

तुमसर शहरातील बहुचर्चित सोनी हत्याकांडाची सुनावणी १५ सप्टेंबरला सुरू होणार आहे. याप्रकरणात विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सरकारी पक्षाकडून युक्तीवाद करतील. याप्रकरणासाठी सरकारी

भंडारा : तुमसर शहरातील बहुचर्चित सोनी हत्याकांडाची सुनावणी १५ सप्टेंबरला सुरू होणार आहे. याप्रकरणात विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सरकारी पक्षाकडून युक्तीवाद करतील. याप्रकरणासाठी सरकारी वकील म्हणून नियुक्त झाल्यानंतर अ‍ॅड.निकम हे सोमवारला भंडारा जलदगती न्यायालयात वकीलपत्र सादर केले. हा खटला अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन. बी. येनुरकर यांच्या न्यायालयात चालणार आहे. ८०० पानांचे आरोपपत्रसोनी हत्याकांडाचा तपास करणाऱ्या तुमसर पोलिसांनी या प्रकरणात ८०० पानांचे आरोपपत्र न्यायालयात सादर केले होते. पोलिसांना याशिवाय केमिकल आणि डीएनए अहवालासह अन्य अहवाल सादर करायचे आहेत. सोमवारला न्यायालयात आरोपपत्रासोबत अन्य आवश्यक कागदपत्रे १५ सप्टेंबरच्या पूर्वी सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. सोमवारला सुनावणी दरम्यान पोलिसांनी शाहनवाज ऊर्फ बाबू शेख (२२), महेश आगाशे (२६), सलीम पठाण (२४), राहुल पडोळे (२२), केसरी ढोले (२२) रा.तुमसर, सोहेल शेख (२६), रफीक शेख (४२) रा.नागपूर या आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले होते. काय आहे प्रकरणतुमसर येथील प्रतिष्ठीत सराफा व्यापारी संजय रानपुरा (सोनी), त्यांची पत्नी पूनम आणि मुलगा द्रुमिल या तिघांचा २६ फेब्रुवारीच्या मध्यरात्री निर्घृण खून करण्यात आला होता. त्यानंतर त्यांच्या घरातून ८.३ किलो सोने, ३४५ ग्रॅम चांदी आणि ३९ लाख रुपये रोख असे साडेतीन कोटींचा ऐवज पळविला होता. हत्याकांड उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी सातही आरोपींना २४ तासाच्या आत अटक केली होती. यातील चार आरोपींना तुमसरातून, दोन आरोपींना नागपुरातून आणि एक आरोपीला मुंबईतून अटक करण्यात आली होती.मुलीने घेतली अ‍ॅड.निकम यांची भेटया हत्याकांडात बचावलेली संजय सोनी यांची मुलगी हीरल ही न्यायालयात आली होती. त्यापूर्वी विश्रामगृहात तिने अ‍ॅड.निकम यांची भेट घेऊन आरोपींना कठोर कारवाई करण्याची मागणी केली.(जिल्हा प्रतिनिधी)