शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

सोनी हत्याकांडाची सुनावणी ‘फास्ट ट्रॅक’ कोर्टात

By admin | Updated: August 30, 2014 23:26 IST

येथील सराफा व्यापारी संजय सोनी (रानपुरा) त्यांची पत्नी पुनम व मुलगा द्रुमिल यांच्या हत्या प्रकरणातील खटला फास्ट ट्रॅक कोर्टात (जलद न्यायालय) वर्ग करण्यात आला आहे. या खटल्याच्या प्रथम

न्याय लवकर मिळण्याची अपेक्षा : उज्ज्वल निकम येणार भंडाऱ्याततुमसर : येथील सराफा व्यापारी संजय सोनी (रानपुरा) त्यांची पत्नी पुनम व मुलगा द्रुमिल यांच्या हत्या प्रकरणातील खटला फास्ट ट्रॅक कोर्टात (जलद न्यायालय) वर्ग करण्यात आला आहे. या खटल्याच्या प्रथम सुनावणीकरिता विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम दि. १ सप्टेंबर रोजी भंडारा येथे येत आहेत. महाराष्ट्र शासनाने या खटल्याकरिता सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली आहे. दि. २६ फेब्रुवारीच्या मध्यरात्री येथील प्रसिद्ध सराफा व्यापारी संजय सोनी, पत्नी पुनम व मुलगा द्रुमील या तिघांची सात दरोडेखोरांनी हत्या केली होती. या हत्याकांडात सहभागी असलेले शाहनवाज ऊर्फ बाबू सलार शेख (२२) रा.तुमसर, महेश आगाशे (२६), सलीम नजीर खान पठाण (२४), राहुल पडोळे (२२), केसरी ढोले (२२) (सर्व राहणार तुमसर), सोहेल शेख (२६), रफीक शेख (४२) रा. नागपूर या सात आरोपींना तुमसर पोलिसांनी अटक केली होती.आरोपीविरुद्ध भादंवि ३०२, ३९६, ४४९, १२०, २०१ आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तुमसर पोलिसांनी या दरोडा प्रकरणात ३९ लाख ५ हजार रोख, ८.३९४ किलोग्रॅम सोने किंमत १ कोटी ६५ लक्ष चांदी ८४२ ग्रॅम किंमत १९ हजार ५०० दोन दुचाकी ७० हजार असे एकूण २ कोटी ९ लाख रुपये किमतीचा ऐवज हस्तगत केला होता. दि. २८ मे रोजी तुमसर न्यायालयात ८०० पानांचे आरोपपत्र तुमसर पोलिसांनी दाखल केले होते. बहुचर्चित तिहेरी हत्याकांड राज्यभरात जागले होते. हत्याकांडाची भीषणता लक्षात घेऊन राज्याच्या गृहमंत्रालयाने या प्रकरणासाठी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली आहे. तीन महिन्यानंतर आरोप दाखल झाल्यानंतर ट्रायल दि. १ सप्टेंबर रोजी सुरु होत आहे. (तालुका प्रतिनिधी)असे आहे प्रकरणसराफा व्यापारी संजय सोनी, पत्नी पुनम व मुलगा द्रुमिल यांची गळा आवळून सात दरोडेखोरांनी निर्घृण हत्या केली. दि. २६ फेब्रुवारी रोजी संजय सोनी हे शाहनवाज सलार शेख या वाहनचालकासोबत गोंदिया येथे व्यवसायानिमित्त गेले होते. रात्री परतीच्या वेळी तिरोडाजवळील विहिरगाव शिवारात चालकाने कार थांबविली. तिथे सहा आरोपी दोन दुचाकी घेऊन वाट पाहत होते. कारचा इंडिकेटर दाखविताच ते धावत येऊन कारमध्येच संजय सोनी याचा गळा आवळून खून केला. संजयचा मृतदेह घेऊन हे सात आरोपी त्यांच्या घरी आले. घरी उर्वरीत रक्कम व सोने जमा करून या दरोडेखोरांनी संजय यांची पत्नी पुनम व मुलगा दु्रमिल या दोघांचाही गळा आवळून खून केला. सातही आरोपी फरार झाले. काटेबाम्हणी येथील शेतात सोन व रोख रकमेचे वाटप केले. चार आरोपी तुमसर तर तीन आरोपी रामटेक भंडारा मार्गे नागपूरकडे फरार झाले होते.