शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

काेणी सेप्टी पीन गिळतो, कोणाच्या नाकात शेंगदाणा, तर कोणाच्या नाकामध्ये गहू !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:43 IST

भंडारा : लहान बालकांकडे २४ तास लक्ष देण्याची गरज असते. आई-वडिलांच्या नजरेआड झालेली बालके कधी अंगावर संकट आणतील ...

भंडारा : लहान बालकांकडे २४ तास लक्ष देण्याची गरज असते. आई-वडिलांच्या नजरेआड झालेली बालके कधी अंगावर संकट आणतील याचा नेम नाही. मुलगा-मुलगी खेळत जरी असले तरी ते खेळता-खेळता स्वत:लाच नुकसान कसे पोहोचवतील याचा नेम नाही. यासाठी पालकांनी २४ तास त्यांच्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

लहान मुले खेळताना सेप्टी पीन गिळतात, घरातील लोकांची औषधे खिडकी किंवा टेबलवर ठेवली असतील तर तीदेखील लहान मुले खातात. शेंगदाणे, फुटाणे तोंडात टाकता-टाकता नाकातही टाकतात. यात लहान मुलांच्या संदर्भात परिस्थिती अत्यंत धोकादायक असते व शस्त्रक्रिया कराव्या लागतात. तर काही बालकांचा यात मृत्यूदेखील होतो. भंडारातील तीन महिन्यापूर्वी एका दोन वर्षीय बालकाने प्लॉस्टीकचा तुकडा गिळला होता. मोठ्या शिताफीने तो तुकडा बाहेर काढण्यात आला होता. लहान बालके खेळता-खेळता कोणतीही वस्तू उचलून तोंडात-नाकात टाकतात, याकडे लक्ष द्यावे.

मुले काय करतील याचा नेम नाही

सुटे पैसे तोंडात टाकून ठेवत असल्याने अनेकदा ते पोटात जातात.

सेप्टी पीन किंवा इतर साहित्य तोंडात टाकत असतात त्यामुळे अडचण होते.

खेळता-खेळता गहू, हरभऱ्याची डाळ या वस्तू नाकात टाकत असल्याने त्या श्वसननलिकेत अडकतात.

घरातील लोकांनी आपल्या आजारासाठी आणलेली औषधे खिडकी किंवा कपाटात ठेवली असतील ती औषधे लहान मुले सेवन करतात.

भंडारा जिल्ह्यात काही लहान मुलांनी खेळताना औषधाच्या गोळ्या खाल्ल्याची उदाहरणे घडली आहेत.

मागील वर्षी झाली होती एक शस्त्रक्रिया

लहान मुलांनी पोटात टाकलेली वस्तू व श्वसननलिकेत अडकलेले पदार्थ काढण्यासाठी वर्षभरापूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या. काही मुलांनी औषधांच्या गोळ्यांचे सेवन केल्याने उपचार करण्यात आले.

अशी घ्या मुलांची काळजी

उंदीर मारण्याचे औषध, आजारासाठी वापरण्यात येणारी औषधे बाहेर ठेवू नका.

लहान मुले खेळत असतील तर, आपली नजर चुकवून ते साहित्य तोंडात किंवा नाकात टाकत असतात. त्यासाठी त्यांच्याकडे लक्ष द्या.

वेळोवेळी खेळत असलेल्या मुलांनी काही खाल्ले तर नाही याची शहानिशा करा, घातक वस्तू त्यांच्या हातात लागणार नाहीत याची खबरदारी घ्या.

खाऊचे शिक्के पोटात टाकतात

कुणाच्या घरी पाहुणे आले की, ते पाहुणे परत जाताना लहान मुलांना खाऊचे पैसे देतात. ते पैसे ती लहान मुले घरातील मंडळींकडे देत नाहीत. ते पैसे आपल्याकडे घेण्याचा मानस घरातील मोठी मंडळीही करीत नाही. शिक्के असलेले पैसे काही काळ आपल्याजवळ बाळगताना लहान मुले कधी खिशात, तर कधी हातात ठेवतात. ते शिक्के अनेक मुले तोंडात टाकतात. त्यामुळे तोंडात ठेवलेला शिक्का तोंडातून पोटात जातो. बहुधा पोटात गेलेला शिक्का काढण्यासाठी बालकांना केळी खायला देतात.