शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

सिंचन प्रकल्पातील प्रश्न तातडीने सोडवा

By admin | Updated: December 11, 2015 01:00 IST

जिल्ह्यातील सर्व सिंचन प्रकल्पातील वनजमीन, पर्यावरण, भूसंपादन व पुनर्वसनाचे प्रश्न तात्काळ मार्गी लावून प्रकल्प लवकर पूर्ण करण्यासाठी कामाचा वेग वाढवा,

लोकप्रतिनिधींशी चर्चा : मुख्यमंत्र्यांनी घेतला भंडारा जिल्ह्याचा आढावा भंडारा : जिल्ह्यातील सर्व सिंचन प्रकल्पातील वनजमीन, पर्यावरण, भूसंपादन व पुनर्वसनाचे प्रश्न तात्काळ मार्गी लावून प्रकल्प लवकर पूर्ण करण्यासाठी कामाचा वेग वाढवा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. विधानभवन सभागृहात बुधवारला मुख्यमंत्र्यांनी भंडारा जिल्ह्यातील प्रश्नासंदर्भात आढावा बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते.बैठकीला पालकमंत्री डॉ.दीपक सावंत, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रिय, खासदार नाना पटोले, आमदार रामचंद्र अवसरे, आमदार चरण वाघमारे, आमदार बाळा काशीवार, अपर मुख्य सचिव आनंद कुळकर्णी, सचिव मालिनी शंकर, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रविण परदेशी, सचिव मनिषा म्हैसकर, विभागीय आयुक्त अनूपकुमार, जिल्हाधिकरी धीरजकुमार व मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर उपस्थित होते.सुरेवाडा आणि करजखेडा उपसा सिंचन प्रकल्पासाठी वनविभाग आणि पर्यावरण विभागाने तात्काळ मान्यता द्यावी. सर्व सिंचन प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी आधी निधी उपलब्ध करून नंतरच अन्य कामांसाठी निधी वितरीत करावा. ज्या सिंचन प्रकल्पासाठी जमीन शेतकऱ्यांडून हस्तांतरीत करण्यात आली मात्र त्याचा उपयोग झाला नाही, अशा जमीन शेतकऱ्यांना परत करावे, असे निर्देश त्यांनी दिले. रेंगेपार आणि बपेरा येथील पुरग्रस्तांसाठी आवास योजनांमधून घरे उपलब्ध करून द्यावी. जिल्हा परिषदेचे रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे द्यावी, अशी मागणी नाना पटोले यांनी केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्हा मार्ग व राज्यमार्ग खड्डे मुक्त करून द्यावे, असे निर्देश दिले. नाल्यांचे वाहून जाणारे पाणी अडविण्यासाठी जलयुक्त शिवारमधून त्यावर बंधारे बांधावे, सूर नदीवर जलयुक्त शिवारमधून बंधारे बांधून पाणी अडवावे, प्रादेशिक पाणी पुरवठा योजना, वीज बिल न भरल्यामुळे अनेकदा बंद पडतात. या योजना कायम स्वरुपी सुरु ठेवण्यासाठी त्या जीवन प्राधीकरण विभागाकडेच अंमलबजावणीसाठी द्यावे. वनजमिनीचे पट्टे ज्यांना हस्तांतरीत केले आहेत, त्या आदिवासी शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध व्हावे यासाठी संबंधित विभागाने निर्णय घ्यावा, असे निर्देशही त्यांनी दिले (नगर प्रतिनिधी)