शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
3
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
4
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
5
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
6
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
7
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
8
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
9
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
10
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
11
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
12
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख
13
Stock Market Today: १७८ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकमध्ये जोरदार तेजी, FMGC आपटले
14
नियंत्रण कक्षात आला एक फोन कॉल; अवघ्या १२ मिनिटांत पोलिस पोहचले अन् मिळालं जीवदान
15
टॅरिफवर ट्रम्प यांचा आणखी एक यु-टर्न; आता 'या'वरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा
16
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
17
Akshaya Tritiya 2025: सोन्याची किंमत पाहून फुटतोय घाम? 'हा' आहे २४ कॅरेट सोनं स्वस्तात खरेदी करायचा जुगाड
18
भरत जाधवचं 'सही रे सही' नाटक कधी निरोप घेणार? केदार शिंदे म्हणाले, "ज्या दिवशी तो..."
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
20
शाहरुख, सलमान की आमिर- कोणासोबत काम करायला जास्त आवडतं?; परेश रावल म्हणाले...

घनकचरा व्यवस्थापनेचे धिंडवडे

By admin | Updated: July 20, 2016 00:23 IST

‘‘पाऊस आणि पुरूष केव्हा येईल, याचा नेम नाही’’, असे नेहमी बोलल्या जाते. अशीच स्थिती शहरातील घनकचरा व्यवस्थापन संदर्भात झाली आहे

नागरिक बोलेना- पालिका ऐकेना : ऐन पावसाळ्यात आजाराला आमंत्रण इंद्रपाल कटकवार भंडारा‘‘पाऊस आणि पुरूष केव्हा येईल, याचा नेम नाही’’, असे नेहमी बोलल्या जाते. अशीच स्थिती शहरातील घनकचरा व्यवस्थापन संदर्भात झाली आहे. स्वच्छ व सुंदर प्रशासनांतर्गत शहराचे सौंदर्य अबाधित कसे राखता येईल, हे न सांगण्यासारखे आहे. अस्वच्छतेबाबत नागरिकांनी गप्प राहणे अन् पाहुनही न दिसल्याची पालिका प्रशासनाची भूमिका घनकचरा व्यवस्थापनेचे धिंडवडे काढायला पुरेशी आहे.दीड लाख लोकसंख्या असलेल्या भंडारा शहरात पालिका प्रशासनाच्या स्वच्छता विभागाचे नियोजन कोलमडल्याचे दिसते. पाठ करून गेल्यावर नागरिक पटकन कंटेनरच्या बाहेर कचरा फेकतात. स्वच्छता राखण्याची जबाबदारी तथा मानसिकता कुणाची नाही, हे दिसत असले तरी त्याच क्षमतेने पालिका प्रशासानाला दोष दिला जातो. पालिकेच्या नियोजनाला उदासिन भंडारेकरांचा प्रतिसाद अल्प असतो, असे पालिका प्रशासनाचे म्हणने आहे. होय, पण हे सत्य असले तरी नागरिकांचे सहकार्य नसले तर कुठलिही योजना यशस्वी होत नाही. परंतु पालिका पदाधिकाऱ्यांची जबाबदारी संपली असे होत नाही. दमदार नियोजन तथा नागरिकांची मानसिकता बदलण्याची तयारी घेऊनच जनतेसमोर येण्याचे धाडस केले पाहिजे. झाडूपासून ते घंटागाडीपर्यंत वेगवेगळे नियोजन आखून अस्वच्छतेवर मात करण्याचा प्रयत्न करण्यात आला. अर्थात, यासाठी हमखासपणे नागरिकांचे सहकार्य सर्वतोपरी ठरते. घंटागाडीवाला दहा रूपयांऐवजी १५ ते २० रूपये लोकांना मागतो, असे बोलून रस्त्याच्या कडेला कचरा फेकून नागरिक मोकळे होतात. परंतु उघड्यावरील या समस्येमुळे संभाव्य आजाराचा धोका तुमच्याच कुंटुबासाठी धोकादायक ठरू शकतो, ही बाब समजण्यापलिकडे आहे. शहरातील जुन्या प्रभाग रचनेनुसार आठ प्रभागांतर्गत घनकचरा व्यवस्थापनेची काय स्थिती आहे, ही बाब भंडारेकरांसाठी नवीन नाही. परंतु आरोग्याचा विषयावर पेटून उठण्याची जबाबदारी कोण स्वीकारणार, हा प्रश्न नागरिकांना घरीच बसवून ठेवतो. पालिका काही तरी उपाययोजना करेल, याच आशेवर नागरिक बोलत नाही. दुसरीकडे पालिका प्रशासनातील पदाधिकारी व अधिकाऱ्यांना अस्वच्छतेची स्थिती दिसुनही ब्र काढत नाही, हे भंडाराचे दुर्देव म्हणावे लागेल. लक्षावधी रूपयांचा खर्च होऊनही तोंडावर रूमाल घेऊन रहदारी करण्याची वेळ भंडारेकरांवर आली असेल तर सुयोग्य प्रशासनाचे हे सर्वोत्तम उदाहरण ठरेल. ‘नागरिक हो...जागृत व्हा’ असे बोलण्याची वेळ ओढवून घेऊ नका, असेच शेवटी म्हणावे लागेल. नगर परिषद अधिनियम कलम १९६५ तथा अधिनियम २००४ नुसार संपूर्ण स्वच्छता व पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी पालिका प्रशासनाची आहे. नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देणे हे पालिका प्रशासनाचे कर्तव्य आहे. वेळोवेळी यावर विशेष सभा बोलाविण्याची मागणी केली, परंतु सभा घेण्यात आली नाही. आरोग्याशी निगडीत असलेल्या मुद्यावर पालिका प्रशासन गंभीर नाही. दूषित पाणी पुरवठ्यातही नागरिकांचे हाल होत आहे. लक्षावधी खर्चुनही शहरात घनकचरा व्यवस्थापनेचे धिंडवडे निघाले आहे.-हिवराज उके, नगरसेवक, भंडारा