शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

वृक्षाची फांदी कोसळल्याने सोलरपंप निकामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 22:10 IST

संजय साठवणे । लोकमत न्यूज नेटवर्क साकोली : भारनियमन, वारंवार होणारा खंडीत वीज पुरवठा आणि वेळेवर देयकाचा भरणा होत ...

ठळक मुद्देकुंभलीतील प्रकार : अखेर पाण्यासाठी विजेचाच वापर

संजय साठवणे ।लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : भारनियमन, वारंवार होणारा खंडीत वीज पुरवठा आणि वेळेवर देयकाचा भरणा होत नसल्याने गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्याची समस्या उद्भवत होती. यावर मात करण्यासाठी लाखो रुपये खर्च करुन सोलरपंप कार्यान्वित करण्यात आली. मात्र पॅनलवर सावली येत असल्याने वृक्ष तोडताना मोठी फांदी पॅनलवर पडली आणि ही यंत्रणा निकामी झाली. परिणामी पुन्हा गावकऱ्यांना विजेचा वापर करुन पाणीपुरवठा सुरु झाला. हा प्रकार आहे साकोली तालुक्यातील कुंभली ग्रामपंचायतीचा.कुंभली येथे ग्रामपंचायती अंतर्गत पाणीपुरवठा योजना आहे. विजेवर आधारित ही योजना कार्यान्वित होती. मात्र गावातून कर वसूली होत नसल्याने आणि ग्रामपंचायतीचा निधी अपुरा पडत असल्याने पाणी पुरवठा योजना कुचकामी ठरली होती. त्यातच भारनियमन आणि खंडीत वीज पुरवठा फटका या योजनेला बसत होता. अनेकदा तर १५ ते २० दिवस पाणीपुरवठा बंद राहिला. त्याचा महिलांना सर्वांना त्रास सहन करवा लागला. यावर मात करण्यासाठी सोलरपंप योजना पुढे आली. योजनेअंतर्गत ७६ हजार ९६३ रुपये किंमतीचे सोलर पॅनल बसविण्यात आले. त्यावरुन गावाला पाणीपुरवठा सुरु करण्यात आला. आता आपल्याला सुरळीत आणि योग्य वेळी पाणी मिळले अशी अपेक्षा होती.मात्र काही दिवसात सोलर पंपला घरघर लागली. तीन चार महिन्यानंतर पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या पॅनलवर सावली येत होती. त्यामुळे हे यंत्रणा पाहिजे तेवढी प्रभावी ठरत नव्हती. त्यामुळे कोणतीही परवानगी न घेता येथील झाडे कापण्यात आली. परंतु झाडे कापताना खबरदारी न घेतल्याने एक मोठी फांदी या पॅनलवर पडली आणि पॅनल फुटले. त्यामुळे ही योजनाच आता निकामी झाली.पॅनल दुरुस्तीचा खर्च लाखोचा घरात आहे. आणि ग्रामपंचायत हा खर्च करण्यास सक्षम नाही. त्यामुळे शेवटी ही योजना पूर्ववत पुन्हा विजेवरच कार्यान्वित करण्यात आली आहे.चौकशीची गरजसोलर पंपच्या बाजुला असलेल्या वृक्षांची कत्तल कुणी केली. वृक्ष तोडतांना काळजी का घेतली नाही. पंपाचे पॅनल कसे फुटले, याची चौकशी होण्याची आता गरज आहे.