शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
2
ठाकरे बंधू जाहीरनामा, युती एकाच दिवशी जाहीर करणार? शिवाजी पार्क येथे प्रचाराची सांगता सभाही एकत्रित..?
3
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
4
ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातून तब्बल ४५ हजार मतदार हटवले; सत्ताधारी TMC राबवणार मोहीम
5
मुंबईत दोन मोठे विमानतळ, मात्र स्टेट हँगरच नाही; सरकारलाही भाड्याने घ्यावे लागते हँगर!
6
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
7
अनंत अंबांनींच्या वनताराला भेटीने मेस्सी आनंदी; प्राण्यांची काळजी घेण्याची पद्धत पाहून प्रभावी
8
१९९७ पासून केलेल्या विकासकामांची यादी, उद्धवसेनेच्या विकासकामांचे श्रेय घेऊ नका : आ. आदित्य ठाकरे
9
मंत्री कोकाटेंची २ वर्षांची शिक्षा कायम; सवलतीच्या घरांसाठी खोटी कागदपत्रे, कोट्यातून फ्लॅट लाटणे भोवले
10
धुक्यात थांबला होता 'काळ' : ७ बस, ३ कार एकमेकांना धडकून १३ जण खाक
11
दुचाकी, ट्रॅक्टरसह साडेतीन एकर शेतीही विकली, तरीही व्याजाचा डोंगर वाढताच... सावकाराचा तगादा; शेतकऱ्याने विकली किडनी
12
नॅशनल हेराल्ड केस : ईडीला धक्का; राहुल, सोनिया गांधी यांना दिलासा
13
एकच उच्चशिक्षणासाठी नियामक मंडळ असेल तर... मूल्यांकन होईल 'डिजिटल' आणि पारदर्शक!
14
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
15
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
16
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
17
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
18
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
19
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
20
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

साकोली-तुमसर विधानसभा क्षेत्रात आघाडीची सरशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 23:16 IST

भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँगे्रस आघाडीचे उमेदवार मधुकर कुकडे हे ४८ हजार ९७ मताधिक्क्यांनी निवडून आले. विशेष म्हणजे भंडारा व गोंदिया जिल्ह्याती एकूण ६ विधानसभा क्षेत्रातून साकोली व तुमसर विधानसभा क्षेत्रातून कुकडे यांना मताधिक्य चांगले मिळाले आहे.

ठळक मुद्देभंडारा-गोंदिया पिछाडीवर : लोकसभा पोटनिवडणूक

इंद्रपाल कटकवार/देवानंद नंदेश्वर ।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँगे्रस आघाडीचे उमेदवार मधुकर कुकडे हे ४८ हजार ९७ मताधिक्क्यांनी निवडून आले. विशेष म्हणजे भंडारा व गोंदिया जिल्ह्याती एकूण ६ विधानसभा क्षेत्रातून साकोली व तुमसर विधानसभा क्षेत्रातून कुकडे यांना मताधिक्य चांगले मिळाले आहे. तर दुसरीकडे भंडारा व गोंदियामध्ये काही प्रमाणात मतामध्ये पिछाडीवर असल्याचे दिसून आले.काँग्रेस-राकाँ-रिपा व पिरीपा आघाडीचे उमेदवार असलेल्या मधुकर कुकडे यांनी भाजपचे उमेदवार हेमंत पटले यांना पराभूत केले. लोकसभा क्षेत्र असलेल्या सहा विधानसभा क्षेत्र अंतर्गत दोन क्षेत्रातून म्हणजेच साकोली व तुमसर येथून कुकडे यांनी लीड मतांचे अंतर कायम ठेवण्यात यश प्राप्त केले. पहिला राऊंडपासूनच कुकडे हे पटले यांच्यावर आघाडीने होते. सदर विधानसभा क्षेत्रात कुकडे यांची लोकप्रियता अभेद्य असल्याचे दिसून आले.भंडारा व गोंदिया हा राष्ट्रवादीचा गड मानला जातो. मात्र येथे राकाँला काही प्रमाणात नुकसान सोसावे लागले. या दोन्ही विधानसभा क्षेत्रात भाजपने चांगले मत घेतली. भंडारा विधानसभा क्षेत्रात हेमंत पटले यांनी ३,८०४ मतांनी कुकडे यांना मागे टाकले. दुसरीकडे गोंदिया विधानसभा क्षेत्रात २,३१४ मतांनी आघाडी घेतली तरी लीड मतांच्या अंतराला ते पार करू शकले नाही.गृहक्षेत्रात दबदबा कायमतुमसर विधानसभा क्षेत्र हे मधुकर कुकडे यांचे गृहक्षेत्र आहे. यात त्यांना चांगली मते मिळतील, असा अंदाज वर्तविण्यात येत होता. हा अंदाज खराही ठरला. त्यांनी एकूण मतदानापेक्षा निम्यापेक्षा जास्त मते प्राप्त केली. तुमसर विधानसभा क्षेत्रात त्यांनी ८६,३१६ मते प्राप्त केली. या क्षेत्रात १ लक्ष ६७ हजार २४५ मतदान झाले. भाजपाचे उमेदवार हेमंत पटले यांच्यापेक्षा या विधानसभा क्षेत्रातून १८,८२२ मते अधिक घेतले. कुकडे यांनी गृहक्षेत्रात दबदबा कायम ठेवला, अशी चर्चा होऊ लागली आहे. साकोली विधानसभा क्षेत्रातही कुकडे यांनी १५,१७४ मते जास्त प्राप्त केली. या विधानसभा क्षेत्रात १ लक्ष ८६ हजार ५९४ मतदारांनी मतदान केले होते. एकूण मतदानाच्या ४७.५३ टक्के मतदान तालुका विधानसभा क्षेत्रात कुकडे यांना मिळाले. तिरोडा विधानसभा क्षेत्रात कुकडे यांना ७,९२८ मते मिळाली तर अर्जुनी मोर. विधानसभा क्षेत्रात कुकडे यांनी १२,२८७ मतांची आघाडी घेतली होती. सदर निवडणुकीत उमेदवार म्हणून मिळालेली मते अशी आहेत. यात मधुकर यशवंत कुकडे (राकाँ) ४,४२,२१३, हेमंतकुमार श्रावण पटले (भाजप) ३,९४,११६, अक्षय योगेश पांडे विदर्भ माझा पार्टी ४३१२, गोपाल टिकाराम उईके २४७६, डॉ. चंद्रमणी कांबळे १७५८, जितेंद्र आडकू राऊत १९९१, धर्मराज रामचंद्र भलावी १७१५, नंदलाल काटगाये ११५४, बोरकर राजेश पुरुषोत्तम ६३६२, मडावी लटारु कवडू ४०,३२६, अजबलाल शास्त्री ७४५३, किशोर पंचभाई १९६३, काशिराम गजबे ८२०४, चनिराम मेश्राम १६४४, पुरुषोत्तम कावळे २७११, राकेश टेंभरे ६८९३, रामविलास शोबेलाल मस्करे ९४५४ तर सुहास अनिल फुंडे यांन ८१०३ मते प्राप्त केली.