शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

साकोलीत नाभिक समाजाचा मोर्चा

By admin | Updated: September 16, 2015 00:30 IST

जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार गडकुंभली मार्गावरील संत सेनाजी महाराज मंदिराचे अतिक्रमण हटवून मूर्ती व साहित्य जप्तीची कारवाई करण्यात आली.

प्रकरण अतिक्रमणाचे : मोर्चात महिलांची उपस्थिती लक्षणीयसाकोली : जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार गडकुंभली मार्गावरील संत सेनाजी महाराज मंदिराचे अतिक्रमण हटवून मूर्ती व साहित्य जप्तीची कारवाई करण्यात आली. त्याठिकाणी साकोली पंचायत समितीचे फलक लावण्यात आले. मूर्तीची विटंबना केल्याप्रकरणी साकोली तालुका नाभिक समाज संघटनेने मंगळवारला मोर्चा काढून प्रशासनाचा निषेध केला. सदर भुखंड हा नाभिक समाजासाठी नियमित करण्याच्या मागणीचे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले. निवेदनानुसार, प्रशासनाने संत सेनाजी महाराज यांच्या मंदिराची तोडफोड केली. याची संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आली नाही. मंदिराचे अतिक्रमण हटविताना मूर्तीची विटंबणा करण्यात आली. जानेवारी २०१० ला संघटनेने ही जागा समाजासाठी देण्यात यावे यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत निवेदन दिले होते. मागील २५ वर्षापासून या जागेवर सामाजिक कार्यक्रम घेण्यात येत होते. मात्र अल्पसंख्यक समाज समजून राजकीय पदाधिकाऱ्यांच्या आपसी वैरत्वाचा बळी घेण्यात आला. त्यामुळे प्रशासनाने सदर जागा नाभीक समाज संघटनेच्या नावाने करण्यात यावे अशी मागणी केली. सदर मोर्चा गडकुंभली येथून उपविभागीय अधिकारी कार्यालयात नेण्यात आला. यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या मोर्चात जिल्हाध्यक्ष मधुकर फुलबांधे, सचिव विजय धोरेकर, शरद उरकुडे, साकोली तालुका अध्यक्ष जगदीश सुर्यवंशी, उपाध्यक्ष निताराम पोहनकर, कार्याध्यक्ष दुलीराम फुलबांधे, कोषाध्यक्ष मधुकर लांजेवार, सचिव सुनील सुर्यंवशी यांच्यासह नाभिक समाजाचे महिला व पुरुष सहभागी झाले होते. (तालुका प्रतिनिधी)