शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

मुरुमीकरण झालेल्या रस्त्यावर पुन्हा मातीकाम

By admin | Updated: April 10, 2017 00:31 IST

तालुक्यातील ग्रा. पं. धुटेरा येथे रोहयो अंतर्गत गावातील आखरापासून ते देवसराळ महादेव मंदिरापर्यंतचा रस्त्याचे

घुटेरा येथील प्रकार : मोजमाप न करता शेतावर केले अतिक्रमणतुमसर : तालुक्यातील ग्रा. पं. धुटेरा येथे रोहयो अंतर्गत गावातील आखरापासून ते देवसराळ महादेव मंदिरापर्यंतचा रस्त्याचे दोन मुरुमीकरण झालेल्या रस्त्यावर मातीकाम करुन रस्ता खराब करण्याचा प्रकार घडला आहे. यामुळे अपघात होण्याची सत्र सुरु आहे.रोहयो अंतर्गत अशा रस्त्याचे नियोजन व काम केले जाते की, जिथे योग्य रस्ता नाही व तिथे मातीकाम व मुरुमीकरण करुन नागरिकांना ये-जा करण्यास सुविधा व्हायला पाहिजे. मात्र धुटेरा ग्रा. पं. चे जरा वेगळेच म्हणावे लागेल. त्याच गावातील रहिवासी हा तांत्रिक पॅनल अधिकारी असल्याने ग्रा.पं. पदाधिकाऱ्यांशी संगनमत करुन मुरुमकाम झालेल्या रस्त्यावर मातीकाम करणे सुरु केले आहे. चांगल्या रस्त्यावर मातीकाम होत असेल पावसाळ्यात तो रस्ता चिखलमय होवून नागरिकांना ये-जा करण्यास त्रासाला सामोरे जावे लागणार आहे. या रस्त्याचे मातीकाम करवून घेत असतांना तांत्रिक पॅनल अधिकाऱ्याने आपल्या शेताचे खोलीकरण करुन मजुरांच्या हातानेच शेतातील धुरे बनविले व शेतात जाण्याकरिता रस्ताही बनविला. ईतकेच नव्हे तर या महाशयांनी ईतराच्या शेतात मोठमोठे खड्डे खोदवून घेतले. त्यामुळे पावसाळ्यात त्यात पाणी साचून प्राणहाणीही होण्याची शक्यता आहे. सदर कामावर रोजगार सेवक नसतांना रोहयोची कामे सुरु करण्यात आली. परिणामी रस्त्याचे मोजमाप नाही. आपल्याच मर्जीने रस्त्याची रुंदी व उंची वाढविण्यात आली. त्यामुळे ईतराची शेतजमीन त्या रस्त्यात दाबल्या गेल्याने शेतकऱ्यांना शेतजमिनीला मुकावे लागत आहे. त्यामुळे भविष्यात त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबतची लेखी तक्रार तेथील रहिवासी देविप्रसाद चुनाराम बेलखेडे यांनी खंडविकास अधिकाऱ्यासह वरिष्ठांनाही दिली. मात्र अधिकाऱ्यांनी थातुरमातुर चौकशी करुन दोषींना वाचविण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र इथे अपघाताच्या संख्येत दिवसेंदिवस वाढच होताना दिसते. जोपर्यंत या रस्त्यावर एखादया आपल्या प्राणाला मुकावे लागेल तेव्हाच प्रशासन कारवाई करणार का असा सवाल बेलखंडे यांनी तक्रारीत केला आहे. (शहर प्रतिनिधी)