शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सामाजिक वनीकरणाच्या झाडांवर कुऱ्हाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 22:42 IST

तुमसरकरांना पाणी पुरवठा करण्यासाठी रनेरा गावाचे हद्दीत असणाऱ्या वन विभागाचे जागेत पाईप लाईनचे खोदकाम करण्यात येत आहे. या खोदकामात वन विभाग आणि सामाजिक वनीकरण विभागच्या मौल्यवान वृक्षांचे प्रचंड नुकसान झाले आहे. जेसीबीची कुऱ्हाड धावत असताना कार्यरत कर्मचाऱ्यांची बघ्यांची भूमिका घेतल्याचे दिसून आले आहे.

ठळक मुद्देरनेरा शिवारातील प्रकार : मौल्यवान झाडांचे नुकसान, वन विभागाच्या जागेतून जलवाहिनीसाठी खोदकाम

लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : तुमसरकरांना पाणी पुरवठा करण्यासाठी रनेरा गावाचे हद्दीत असणाऱ्या वन विभागाचे जागेत पाईप लाईनचे खोदकाम करण्यात येत आहे. या खोदकामात वन विभाग आणि सामाजिक वनीकरण विभागच्या मौल्यवान वृक्षांचे प्रचंड नुकसान झाले आहे. जेसीबीची कुऱ्हाड धावत असताना कार्यरत कर्मचाऱ्यांची बघ्यांची भूमिका घेतल्याचे दिसून आले आहे.तुमसरकरांना पाणी पुरवठा करण्यासाठी सिहोरा परिसरातील वैनगंगा नदीवरील वांगी गावाचे शेजारी पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे. या पाईपलाईनचे खोदकाम सिहोरा परिसरातील तुमसर-बपेरा राज्य मार्गाचे लगत करण्यात येत आहे. पाईपलाईनचे खोदकाम कंत्राट प्रीतीपालसिंग नामक कंपनीला देण्यात आले आहे. पाईप लाईन खोदकाम पूर्णत्वाकडे आले आहे. राज्य मार्गाचे लगत पाईप लाईनचे खोदकाम करताना अनेक मौल्यवान झाडांचे प्रचंड नुकसान झाले आहे. परंतु कुणी चौकशी केली नाही. झाडांचे नुकसान करीत असताना कारवाई करिता पुढाकार घेण्यात आला नाही.रनेरा गावाचे हद्दीत गट क्रमांक २६५ आणि ३२८ मध्ये वन विभागाचे राखीव क्षेत्र आहे. या राखीव गटात मौल्यवान वृक्ष आहे. याच गट क्रमांकमध्ये २०१७ पासून सामाजिक वनीकरण विभाग मार्फत मौल्यवान वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. २ कि.मी. अंतर पर्यंत झाडांचे संवर्धन आणि संगोपन कार्यात १३ लाख ५७ हजार ५३९ रुपये खर्च करण्यात आले आहे. या झाडांची उंची ८ ते १० फुट पर्यंत झाली आहे. यामुळे वनविभागाचे राखीव गटात मौल्यवान वृक्ष असल्याने जेसीबीने खोदकामाची मंजुरी वन विभाग देत नाही. परंतु रनेरा गावाचे शिवारात नियम धाब्यावर बसविण्यात आले आहे. गट क्रमांक २६५ ते ३२८ मध्ये पाईप लाईनचे खोदकाम जेसीबी मशीनने करताना वन विभागाचे झाडांचे नुकसान झाले आहे. उभे असणाºया झाडांची मुळे (जडी) तोडण्यात आली आहे.ही झाडे कधी उन्मळून कोसळतील याचा नेम नाही. या शिवाय पाईप लाईनचे खोदकामात सामाजिक वनीकरण अंतर्गत लागवड करण्यात आलेल्या झाडांना बसला आहे. या झाडांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या गटात जेसीबी मशीन झाडांचे नुकसान करीत असताना कार्यरत कर्मचाऱ्यांनी बघ्यांची भूमिका घेतल्याचे निदर्शनास आले आहे. विभागाने घटनास्थळावर पंचनामा केला आहे. नुकसानग्रस्त झाडांचा पंचामा केला असला तरी जेसीबी मशीनचे खोदकाम थांबविण्यात आले नाही. सामाजिक वनीकरण विभागाने ७ झाडांचे नुकसान झाल्याचे कागदावरील पंचनाम्यात नोंद केली आहे. पंचनामा तयार करताना रक्षक आर.डी. चौधरी, सरपंच कोमल टेंभरे, टी.एस. भेग्रे उपस्थित होते. काही वन विभागाचे कर्मचारी होते. परंतु झाडांचे डोळ्यादेखत नुकसान होत असताना यंत्रणेचे कर्मचारी बघ्यांच्या भूमिकेत असल्याचे दिसून आले. त्यांनी तशी पंचनाम्यात नोंद केली.हाच निर्णय आणि नियम वन विभागांची यंत्रणा सामान्य जनतेसाठी लागू करणार नाही. एका योजनेसाठी वन विभागाने नियम धाब्यावर बसविल्याचा आरोप आहे. वनविभागाचे राखीव गटात पाईप लाईन खुल्या पद्धतीने नेली जात आहे.जमिनीत खोदकामाची मंजुरी वन विभाग देत नाही. परंतु रनेरा शिवारात सर्व काही आलबेल करण्यात आले आहेण नळ योजनेला कुणाचा विरोध नाही. परंतु नियम धाब्यावर बसविण्यात आले आहे. सामान्य जनतेसाठी वन विभागाचे नियम असल्याचे दिसून आले आहे. झाडांचे नुकसान भरपाई करिता तुमसर नगर पालिकेला पत्र देणार असल्याचे उपस्थित कर्मचाºयांनी सांगितले असले तरी वन विभागाने नाली खोदकाम संदर्भात भूमिका स्पष्ट केली नाही. या संदर्भात वनपरिक्षेत्राधिकारी जोशी यांना संपर्क साधला असता होवू शकला नाही.