शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

सामाजिक बांधिलकीचा वसा अविरत ठेवणार

By admin | Updated: April 27, 2016 00:28 IST

सन २००४ पासून मोहरणा येथे सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन नियमित करीत आहोत.

विनोद पटोले यांचे प्रतिपादन : मोहरणा येथील सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा, आठ जोडपी विवाहबद्धलाखांदूर : सन २००४ पासून मोहरणा येथे सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन नियमित करीत आहोत. सामाजिक बांधिलकी व समाजसेवेचा उदात्त हेतू मनाशी बाळगून वैयक्तिक लग्न समारंभाला येणारा जास्तीचा खर्च कमी करण्याचा हा प्रयत्न असाच सुरु ठेवणार असल्याचे मत खासदार नाना पटोले यांचे मोठे बंधू विनोद पटोले यांनी व्यक्त केले. तालुक्यातील मोहरणा येथील सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सरपंच ग्रिष्मा राऊत, न.प. सदस्य रामचंद्र राऊत, पं.स. सदस्य शिवाजी देशकर, अशोक चांडक, जि.प. सदस्य मनोहर राऊत, जि.प. सदस्य प्रदीप बुरडे, जि.प. सदस्या प्रणाली ठाकरे, ईश्वर घोरमोडे, ताराचंद मातोर, टिकाराम झोडे, रज्जू पठाण, प्रकाश राऊत, प्रभू राऊत, लिवन पारधी, नाना पिलारे, दादा राऊत, नाना रासेकर, ऋषी राऊत, राजू भानारकर, यादोराव माटे, ताराचंद गुरनुले, मेहबुब पठाण, वंदना ढोरे, उमेश राऊत, अ‍ॅड.जितेंद्र राऊत व अन्य मंचकावर उपस्थित होते. ते पुढे म्हणाले की, या भागातील शेतकरी व सर्वसामान्याशी असलेले संबंध या भागातील मातीशी नाड जोडून आहेत. सुख असो वा दु:ख ते कुटुंबाप्रती समजून काही प्रमाणात खारीचा वाटा उचलण्याचा हा प्रयत्न विवाह सोहळ्याच्या माध्यमातून सुरु असून पुढेही सुरु राहणार असल्याचे मत पटोले यांनी व्यक्त केले. रामचंद्र राऊत यांनी आपल्या भाषणातून सांगितले की, शेतकरी आत्महत्या या नापिकी व कर्जाला कंटाळून होतात. यात मुलामुलींचे लग्न हा मोठा प्रश्न यातून श्रम वेळ व खर्च याला कात्री लावण्याचा पटोले यांचा प्रयत्न मागील १२ वर्षांपासून सुरु आहे. मित्र परिवाराकडून दरवर्षी असेच सोहळ्यांचे प्रयत्न सुरु राहणार असल्याचे ते बोलले. सदर विवाह सोहळ्यामध्ये ८ जोडपी विवाहबंधनात अडकले असून पटोले व मित्र परिवाराकडून संसार उपयोगी साहित्य व एलसीडी भेट देण्यात आली. हजारो वऱ्हाड्यांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडला. (तालुका प्रतिनिधी)