शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

तर एसटीतील एक हजार संपकऱ्यांचे पुढे काय होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2022 05:00 IST

जिल्ह्यात आतापर्यंत ४५७ कर्मचारी कामावर रुजू झाले असून विभागातील १ हजारपेक्षा जास्त कर्मचारी अद्यापही संपात सहभागी आहेत.  जर हे कर्मचारी संपावर कायम राहिले तर त्यांचे पुढे काय होणार, असा सवालही उपस्थित होत आहे. एसटीला राज्य शासनात विलीनीकरण करून घ्यावे, या मुख्य मागणीला घेऊन कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत. अनेकदा संधी देऊनही कर्मचाऱ्यांनी राज्य शासनाच्या हाकेला हवा तेवढा प्रतिसाद दिला नाही.

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या संपाला चार महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लोटला आहे. वारंवार संधी देऊनही कर्मचारी कामावर पूर्णत: आलेले नाहीत. आता २२ एप्रिलपर्यंत कामावर परत येण्याची डेडलाईन न्यायालयाने दिली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४५७ कर्मचारी कामावर रुजू झाले असून विभागातील १ हजारपेक्षा जास्त कर्मचारी अद्यापही संपात सहभागी आहेत. जर हे कर्मचारी संपावर कायम राहिले तर त्यांचे पुढे काय होणार, असा सवालही उपस्थित होत आहे. एसटीला राज्य शासनात विलीनीकरण करून घ्यावे, या मुख्य मागणीला घेऊन कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत. अनेकदा संधी देऊनही कर्मचाऱ्यांनी राज्य शासनाच्या हाकेला हवा तेवढा प्रतिसाद दिला नाही. काही कर्मचाऱ्यांनी प्रतिसाद देत कामावर परतले, तर अजूनही विभागातील हजारावर कर्मचारी संपाच्या निर्णयावर ठाम आहेत. त्यांच्याबाबत न्यायालय काय निर्णय घेईल याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

हजार कर्मचारी संपात- गत चार महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. या संपात भंडारा जिल्ह्यातील दीड हजारपेक्षा जास्त कर्मचारी सहभागी झाले होते. आता ४०० पेक्षा अधिक कर्मचारी कामावर परतले असून, एक हजार कर्मचारी संपात अजूनही सहभागी आहेत. ते आपल्या निर्णयावर ठाम आहेत.

जिल्ह्यातील बहुतांश बसेस अजूनही बंदच- राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या भंडारा विभागाने मुख्य मार्गावरील बसेस सुरू केल्या आहेत. मात्र, अजूनही बहुतांश ठिकाणच्या फेऱ्या चालक व वाहकांमुळे सुरू करता आल्या नाहीत. परिणामी ग्रामीण भागातील दळणवळणाला फरक पडला आहे. ऐन परीक्षेच्या तोंडावरही विद्यार्थ्यांना बसची प्रतीक्षा करावी लागली होती.

 महामंडळाची कारवाई शासनाचे आदेश असतानाही कामावर परत न येणाऱ्या भंडारा विभागांतर्गत भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील चालक-वाहक व अन्य कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. आता २२ एप्रिलनंतर जे संपकरी निर्णयावर ठाम राहतील त्यांच्यावर महामंडळ कुठली कारवाई करेल यावरही निर्णय होणार आहे.

संपकरी आता काय म्हणतात?

चार महिन्यांपासून आमचा संप सुरु आहे. मात्र, न्यायालयीन व्यवस्थेवर आमचा पूर्ण विश्वास आहे. न्यायालयाने न्याय मागण्यांसंदर्भात विचार करावा, अशीही आमची मागणी आहे. सरकारला आमच्याशी काही देणेघेणे नाही, असेच दिसून येत आहे. आता काय होईल ते पाहू.    - संपकरी

राज्य शासनाची भूमिका आधीपासूनच आडमुठेपणाची राहिली आहे. कर्मचाऱ्यांवर अन्याय होत असतानाही राज्य शासन हिटलरशाहीप्रमाणे वागत आहे. कर्मचाऱ्यांना कमकुवत करण्याचा डाव आम्ही कधीही यशस्वी होऊ देणार नाही.     - संपकरी

राज्य शासनाच्या आवाहनानंतर ४००पेक्षा जास्त कर्मचारी कामावर परतले आहेत. अजूनही बहुतांश कर्मचारी संपावर आहेत. त्यांना कामावर परत येण्यासंदर्भात वारंवार वरिष्ठांचे तसेच न्यायालयाच्या निर्णयाबाबत अवगत केले आहे.        -चंद्रकांत वडस्कर, विभाग नियंत्रक

 

टॅग्स :ST Strikeएसटी संप