शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

मुरुम, सुपीक जमिनीवरही तस्करांची नजर

By admin | Updated: October 15, 2015 00:36 IST

साकोली तालुक्याला गौण खनिजांचे वरदान लाभलेले असताना तस्करांची नजर आता या गौण खनिजावर पडली आहे.

फिरते पथक नावापुरतेच : रात्रंदिवस सुरु राहते सर्रास वाहतूक, दिवसाकाठी बुडतोय लाखोंचा महसूल संजय साठवणे साकोलीसाकोली तालुक्याला गौण खनिजांचे वरदान लाभलेले असताना तस्करांची नजर आता या गौण खनिजावर पडली आहे. साकोली तालुक्यातील तलाव, बोडी, नदीपात्रातील सुपीक माती व जंगलातील व पहाडीवरील मुरुमाची खुलेआम वाहतूक केली जाते. रेतीची अवैध वाहतुकीवर काहीअंशी लगाम लावण्यात प्रशासनाला यश आले तरी विनापरवाना तस्करांचीही नजर आता माती व मुरुमावर गेली आहे. यासाठी नेमण्यात आलेल्या फिरते पथकाचे मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे.पूर्व विदर्भातील भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुका विविधतेने नटलेला असून जंगल व पहाडीचे मोठे क्षेत्र तालुक्याला लाभले आहे. चुलबंद नदीच्या भरवशावर बारमाही पिके घेतली जातात. या नदीचे पात्र साकोली तालुक्यातून जात असल्यामुळे नदीपात्रात वाळूच्या रुपाने अमुल्य देणगी या तालुक्याला लाभली आहे. तेवढीच सुपिक जमीन नदीकाठावर, तलाव, बोडी, पहाडी व जंगलात मुरुमही उपलब्ध आहे. प्रचंड उत्पादन क्षमता असलेल्या या महसुली जमिनीवरील माती व मुरमाचे मोठ्या प्रमाणात खणन केले जात आहे.नागझिरा मार्गावरील तलावापासून गडकुंभलीच्या पहाडीतून नेहमीच माती व मुरुमाचे खणन सुरु असते. हे खणन जेसीपीच्या सहाय्याने करून ट्रॅक्टरद्वारे त्याची वाहतूक केली जाते. ही अवैध वाहतूक रात्री व पहाटे केली जाते. ही माती व मुरुम नवीन घरबांधणीसाठी व नवीन लेआऊटसाठी वापरण्यात येत असून यासाठी कुठलीही परवानगी घेतली जात नाही.यासाठी महसूल विभागाने फिरते पथकाची व्यवस्था केली असून यात मंडळ अधिकारी, तलाठी, पोलीस यांची नेमणूक केली असली तरी हे पथक दिवसा फिरतात व रात्री कुठे जातात कळत नाहीत. परिणामी अवैध खणन करणाऱ्यांना संधी मिळत असल्यामुळे याचा फायदा घेत सर्रास चोरी होते. यामुळे शासनाचा दिवसाकाठी लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे.