शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

कोविड केअर सेंटरमधील स्मोक अलार्म वाजला अन् एकच धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:35 IST

भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अग्नितांडवाची घटना ताजी असताना शनिवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास कोविड केअर सेंटरमधील स्मोक अलार्म वाजायला ...

भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अग्नितांडवाची घटना ताजी असताना शनिवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास कोविड केअर सेंटरमधील स्मोक अलार्म वाजायला लागला. आग लागल्याची ही सूचना बघता सर्वांची एकच धावपळ उडाली. अग्निशमन दलासह पोलिसांना पाचारण करण्यात आले. काही वेळात खरा प्रकार उघडकीस आला. कोविड केअर सेंटर आणि सहकार्याच्या मधल्या मोकळ्या जागेत केरकचरा पेटविण्यात आला होता. मोठा भडका होईल म्हणून ही आग तेथे उपस्थितांनी विझविली. मात्र, मोठा धूर झाला आणि तो लगतच्या कोविड केअर सेंटरमध्ये पोहोचला. त्याठिकाणी असलेल्या स्मोक अलार्मने धोक्याचा इशारा दिला.

या घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी संदीप कदम, अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, शहरचे ठाणेदार लोकेश काणसे यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. तसेच भंडारा नगरपरिषदेचे अग्निशमन दलही तत्काळ रुग्णालयात पोहोचले. या घटनेने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांत भीतीचे वातावरण पसरले होते.

भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात ९ जानेवारीच्या पहाटे अग्नितांडव घडले होते. यात दहा निष्पाप बालकांचा बळी गेला होता. त्यानंतर रुग्णालयाच्या विविध विभागात स्मोक अलार्म लावण्यात आले होते. अचानक कोविड सेंटरमध्ये शिरलेल्या धुरामुळे हा गोंधळ उडाला.