शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्टफोनमुळे बळावला विस्मरणाचा धोका

By admin | Updated: February 4, 2015 23:09 IST

मोबाईल वापरकर्ते दिवसेंदिवस स्मार्टफोनवर निर्भर होत आहेत. यामध्ये युवक आघाडीवर आहेत. बहुतांश यूर्जस दैनंदिनीतील ठरलेली कामे यावरुनच करीत आहेत. तसेच स्मार्टफोनमध्ये

भंडारा : मोबाईल वापरकर्ते दिवसेंदिवस स्मार्टफोनवर निर्भर होत आहेत. यामध्ये युवक आघाडीवर आहेत. बहुतांश यूर्जस दैनंदिनीतील ठरलेली कामे यावरुनच करीत आहेत. तसेच स्मार्टफोनमध्ये तुमची महत्त्वाची माहिती सेव्ह आहे. परंतु एखाद्या दिवशी तो हरवला किंवा चोरीला गेला तर मोठी समस्या निर्माण होऊ शकते. अशावेळी तुमच्या वैयक्तिक माहिती व डाटाचा गैरवापर होऊ शकतो. त्यामुळे स्मार्टफोनवर वाढत्या निर्भरतेबरोबर सावधानी बाळगणे आवश्यक आहे. मोबाईलवर फोन स्मार्ट होताच त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सुविधा व अ‍ॅप्लिकेशन्स जोडले गेले. परिणामी मोबाईल फ्रेंडली व आवश्यक बनला. त्याचबरोबर वापरकतेर्ही स्मार्ट बनले खरे. परंतु सावधानी बाळगण्याकडे कमी लोकांचे लक्ष आहे. बहुतांश यूर्जस रात्री झोपण्यापर्यंत गुगल कीपवर डे-प्लान, ई-वॉलेट, मोबाईल रिचार्ज, सेटटॉप बॉक्स, बिल पेमेंट, यू-ट्युबवर ट्रेलर पाहणे, व्हॉटसअ‍ॅपवर मित्रांना मेसेज पोस्ट करण्यापासून फेसबुकवर अपडेट करण्यात व्यस्त असतात. स्मार्टफोन सोबत झालेली ही मैत्री धोकादायक असू शकते. सायबर तज्ज्ञांच्या मते, यामध्ये पर्सनल डेटा व माहिती साठवली जात आहे. यातून तुमची माहिती, संवाद लीकसुद्धा केले जाऊ शकतात. यासंबंधी आता सायबर सेल पोलिसांकडे तक्रारीही धडकू लागल्या आहेत. (नगर प्रतिनिधी)