शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

पोटाच्या भारावर झोपण्याच्या पद्धतीने वाढते शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:37 IST

इंद्रपाल कटकवार लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : आजच्या वैश्विक कोरोना महामारीच्या जगतात मानवाला अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. ...

इंद्रपाल कटकवार

लोकमत न्यूज नेटवर्क

भंडारा : आजच्या वैश्विक कोरोना महामारीच्या जगतात मानवाला अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. मानवी आरोग्याच्या दृष्टीने शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण योग्य प्रमाणात ठेवणे हे सर्वांत मोठे आव्हान ठरत आहे. याच पार्श्वभूमीवर फिजिओथेरपिस्ट तथा वैद्यकीय तज्ज्ञांनी रुग्णाला तत्काळ दिलासा मिळू शकतो, असा उपाय सुचविला आहे. यात पोटाच्या भारावर झोपण्याच्या पद्धतीने शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढते, असा बहुपयोगी सल्ला दिला आहे.

बदलत्या काळानुरूप सवयी बदलल्या. नैसर्गिक पद्धतीने जीवनशैली जगावी तरच मानवी शरीरही आपल्याला साथ देते. मात्र, धावपळीच्या युगात अनेकांच्या सवयी बदलल्या आहेत. त्यात कोरोना महामारीने शिरकाव करीत अनेकांना भांबावून सोडले आहे. अनेकांचे जीवही गेले आहेत.

अशा स्थितीत वेळप्रसंगी रुग्णालयात पैसा आणि रुग्णाला पोहोच करूनसुद्धा ऑक्सिजन मिळत नाही. त्यामुळेच नैसर्गिक पद्धतीनेच शरीरातील व रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण कसे समतुल्य रहावे, याचा प्रयत्न केला पाहिजे. पोटाच्या भारावर कोविड रुग्णाला झोपविल्यास त्याचा त्याला तत्काळ फायदा होऊ शकतो. सरळ झोपल्यावर शरीरात ६० ते ६५ टक्के ऑक्सिजन मिळते; परंतु त्याच कोविड रुग्णाला पालथे झोपायला लावल्यास ९५ टक्क्यांपर्यंत ऑक्सिजन लेव्हलची मात्रा येऊ शकते.

पोटाखाली उशी घेतल्यानंतर आपण किती वेळ तसं राहू शकतो याची कल्पनाही रुग्णाला मिळते, त्यानुसार तो अधिक सोयीने ही पद्धत अवलंबू शकतो.

यात सदर रुग्ण बरा होण्यासही प्रारंभ होतो. घरच्या घरी होम आयसोलेशनमधील रुग्ण हे अधिक सोयीस्करपणे करू शकतात. परिणामी त्यांना रुग्णालयात जाऊन ऑक्सिजनचीही गरज भासणार नाही. गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णांसाठी ही पद्धत अत्यंत साधी, सोपी व लाभदायी आहे.

असा वाढवा रक्तातील ऑक्सिजन

रुग्णाला झोपतानाही त्याच्या पोटाखाली एक उशी ठेवावी. श्वासोच्छ्‌वास करताना श्वसन प्रक्रिया सामान्यपणे ठेवावी, तीस मिनिटे ते दोन तास पूर्णतः पोटाच्या भारावर तर तेवढाच कालावधी उजव्या बाजूवर झोपून पूर्ण करावा, असे करताना आपले डोके खालच्या बाजूला असेल याची काळजी घ्यावी. रुग्णाच्या सोयीनुसार अशी प्रक्रिया वारंवार करावयास लावावी. काेरोनाबाधित पेशंटला १२ ते १५ तास पालथे झोपणे गरजेचे आहे तरच रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण झपाट्याने वाढू शकते.

पालथे झोपण्याचे फायदे

कोविड रुग्णाने पालथे झोपणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण योग्य प्रमाणात राहते. असे केल्यास ऑक्सिजनचे प्रमाण कमी असलेल्या रुग्णाचे शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढत असते. भरती असलेल्या किंवा गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णांचे ऑक्सिजनचे प्रमाणही वाढू शकते. ही प्रक्रिया सामान्यपणे व कुठलाही मानसिक तणाव न ठेवता करावी. फिजिओथेरपी करताना अशी पद्धत वापरली जाते. या पद्धतीचा कुठलाही साइड इफेक्ट होत नाही.

- डॉ. दिलेश वंजारी, फिजिओथेरपिस्ट, भंडारा.

डॉक्टरांवर विश्वास ठेवा

रुग्णाला पोटाच्या भारावर झोपण्यासाठी आधीच प्रवृत्त केले पाहिजे. या पद्धतीने रुग्णाला लवकरच फायदा होऊन ऑक्सिजनचे प्रमाण सुधारण्यास मदत होते ही झटपट बाब प्रत्येकालाच सांगितली पाहिजे. घरी विलगीकरणात असलेल्या रुग्णांसाठी ही बाब तर अधिक सोपी व सहज आहे. डॉक्टरांवर विश्वास, नियमित औषधोपचार ठेवल्यास रुग्ण लवकरच बरा होतो.

- डॉ. नितीन तुरस्कर,

अध्यक्ष, आयएमए, भंडारा

ही तर संजीवनीच

कोविड रुग्णाला पालथे झोपायला सांगितल्यास त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो. लहान बालके बहुतांश पोटाच्या भारावर झोपत असतात. पालथे झोपू नको, असे बजावतही असतो. मात्र, पोटाखाली उशी ठेवून झाेपल्यास शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण योग्य राहते, असा निष्कर्षही आता काढण्यात आलेला आहे. कोविड रुग्णांसाठी ही पद्धत संजीवनीच आहे.

- डॉ. अमित कावळे,

बालरोग तज्ज्ञ, भंडारा