शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरपासून पंजाब, दिल्लीपर्यंत महापूर! अनेक रस्ते पाण्याखाली, वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा...
2
...तर सर्व मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळणार; सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ सिद्धार्थ शिंदे म्हणाले...
3
सरकारनं जीआर काढला, मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं; नेमका कुणाला मिळणार लाभ? फडणवीसांनी सांगितलं!
4
जीएसटी कपातीबाबत ऑटो कंपन्यांना आधीच माहिती होते? विक्री घसरली की मुद्दाम कमी केली... 
5
हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट म्हणजे काय? मराठा आरक्षणाशी काय संबंध? जाणून घ्या...
6
मोठ्ठा विकेंड? ८ सप्टेंबरला ईदची सार्वजनिक सुट्टी मिळणार? आमदार असलम शेख यांची मागणी, मुख्यमंत्र्यांना पत्र
7
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
8
Big Breaking: ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले
9
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
10
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
11
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
12
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
13
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
14
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
15
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
16
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला
17
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
18
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?
19
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
20
लाखोंचा खर्च टाळला, अवघ्या २ हजारांत केले लग्न; IAS युवराज अन् IPS मोनिका यांची प्रेम कहाणी

राखीव जंगलातून ५७ सागवृक्षांची कत्तल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 23:16 IST

एकीकडे वृक्ष लागवड करून पर्यावरणाच्या रक्षणाकरिता वनविभाग प्रोत्साहन देत असून दुसरीकडे राखीव जंगलातील मौल्यवान सागवन झाडांची कत्तल केली जात आहे.

ठळक मुद्देकंपार्टमेंट क्रमांक ३६४ मधील प्रकार : कृषीदेव टेकडीचा जंगल, वनविभागाकडून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न, अधिकाºयांचा फोन बंद

मोहन भोयर।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : एकीकडे वृक्ष लागवड करून पर्यावरणाच्या रक्षणाकरिता वनविभाग प्रोत्साहन देत असून दुसरीकडे राखीव जंगलातील मौल्यवान सागवन झाडांची कत्तल केली जात आहे. नाकाडोंगरी वनपरिक्षेत्रातील पवनारा - साखळी बीट क्रमांक ३६४ मध्ये हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मे महिन्यात ही सागवान झाडे कापण्यात आली. बिंग फुटू नये म्हणून झाडांचा पंचनामा करून दुसरे आडजात तथा सागवन झाडे चिचोली वनडेपोत गोळा करण्यात आली. त्या थुटांचा आकार कमी जास्त आहे हे विशेष.पवनारा बिट अंतर्गत कंपार्टमेंट (बिट) ३६४ अंतर्गत साखळी गावाजवळ कृषीदेव टेकडी आहे. टेकडीच्या पायथ्याशी सन १९९६-९७ मध्ये सागवान तथा अन्य आडजात वृक्षांची लागवड करण्यात आली होती. २० वर्षानंतर ही सर्व झाडे निश्चितच मोठी झाली आहेत. सदर जंगल राखीव वनात मोडते. मे महिन्यात या बिटमधील सुमारे ५७ सागवन वृक्षांची कत्तल करण्यात आली. सुमारे ३ ते साडेतीन फुट झाडांची गोलाई (रुंदी) आहे. जुलै महिन्यात हा प्रकार येथे उघडकीस आला.वनविभागाने सदर प्रकरण दाबण्याकरिता सारवासारव करण्याचा केविलवाणा प्रकार सुरु केला आहे.प्रकरण उघडकीस येऊ नये म्हणून ११ झाडांच्या थुटांचा (पी.आर.) पंचनामा केला. त्याला हॅमरींग केले.चिचोली येथील लाकूड आगारात बिजा, रोहन तथा आसलपानी येथून शेतकºयांकडून सागवान वृक्ष खरेदी करून जमा करण्यात आले. येथे धक्कादायक बाब ही की कंपार्टमेंट क्रमांक ३६४ मधील कापलेली सागवान झाडे व चिचोली वनडेपोत जमा केलली झाडांचे थुटात मोठा फरक आहे हे विशेष.कापलेल्या झाडांच्या थुटासभोवताल पालवी फुटली असून ही थुटे सध्या झाकल्या गेली आहेत. येथे वनविभाग व कंत्राटदारांच्या संगनमताने ही सागवान झाडे कापण्यात आली असे दिसून येत आहे.कापलेल्या झाडांवर वनविभागाने हॅमरिंग केले आहे. परंतु थुटांच्या आकारात तफावत कशी हा मुख्य प्रश्न येथे उपस्थित होत आहे.जंगलापासून जवळ एका गावात एक लाकूड कंत्राटदार राहतो. त्या कंत्राटदारासोबत फिक्सींग करून ही झाडे उन्हाळ्यात कापण्यात आली. सदर सागवान नागपूर येथे विक्री करण्यात आल्याचे समजते.राखीव जंगलाचा परिसर व इतर गावापासून दूर असून सहसा या जंगलाव्याप्त परिसरात कुणी भटकत नाही. त्याचा फायदा येथे लाकूड तस्करांनी घेतला आहे. प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी केल्यास मोठे घबाड बाहेर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.४७ हजार १५२ सागवान वृक्षापैकी २९ हजार ७९० रुपयांचा लाकूड हस्तगत करण्यात आला, त्यापैकी १७ हजार रुपयांचा लाकूड हस्तगत करणे शिल्लक आहे. १.१०७ घनमीटर लाकूड जप्त करण्यात आला. सदर प्रकरणाचा तपास सुरु असून नियमानुसार दोषींवर कारवाई करण्यात येईल. सध्या आरोपींचा शोध घेणे सुरु आहे.- एम.एन. माकडे,वनपरिक्षेत्र अधिकारी, नाकडोंगरी