शहरं
Join us  
Trending Stories
1
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
2
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
3
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
4
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
5
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
6
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
7
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
8
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
9
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
10
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
11
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
12
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
13
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
14
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
15
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
16
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
17
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
18
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
19
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
20
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान

झरपडा येथे कौशल्यावर आधारित शेतकरी प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:34 IST

शेतकरी प्रशिक्षणात कृषी मंडळ अधिकारी सुधीर वरखडे यांनी ५ टक्के निंबोळी अर्क व बीजामृत तयार करण्याची पद्धत प्रात्यक्षिकाद्वारे सांगितले. ...

शेतकरी प्रशिक्षणात कृषी मंडळ अधिकारी सुधीर वरखडे यांनी ५ टक्के निंबोळी अर्क व बीजामृत तयार करण्याची पद्धत प्रात्यक्षिकाद्वारे सांगितले. तंत्रज्ञान व्यवस्थापक विलास कोहाडे यांनी पर्यावरणपूरक शेतीविषयक माहिती दिली. जैविक व सेंद्रिय खतांचा वापर, जैविक व सेंद्रिय कीटकनाशकाचा वापर, जैविक बुरशीनाशक, जीवाणूनाशक व विषाणूनाशकाचा वापर, हिरवळी खताच्या वापराबाबत माहिती विशद केली. उमेदचे समन्वयक कोवित रंगारी यांनी दशपर्णीअर्क, जीवामृत तयार करण्याची पद्धत समजावून सांगितली. नोजेंद्र लांडगे यांनी कामगंध सापळे, चिकट सापळे, प्रकाश सापळे प्रत्यक्ष शेतकऱ्यांना दाखवून त्याचे फायदे व महत्त्व पटवून दिले.

भूमेश्वरी येरणे यांनी पिकातील मित्र व शत्रू कीड कोणते ते कसे ओळखायचे, याबाबत माहिती सांगितली. सदर शेतकरी प्रशिक्षणात कृषी प्रात्यक्षिकाद्वारे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. गावातील शेतकऱ्यांनी प्रशिक्षणाचा लाभ घेतला. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी महेश मात्रे, दिनेश भेंडारकर, प्रमोद मेश्राम यांनी सहकार्य केले.