शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत 'शटडाऊन'चं संकट, सरकारी कामकाज बंद; ६० मतांची होती गरज, ट्रम्प यांना मिळाली ५५ मते
2
"दुबईच्या शेखला सेक्स पार्टनर हवा," बाबा चैतन्यानंदाची विद्यार्थीनींकडे अश्लील मागणी; चॅटमध्ये नेमके काय?
3
LPG Price 1 October: एलपीजी सिलिंडर महागला, दसऱ्यापूर्वी मोठा झटका; दिल्ली ते मुंबईपर्यंत इतकी वाढली किंमत
4
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
5
फिलीपिन्समध्ये भूकंपाचा धक्का, २२ जणांचा मृत्यू; अनेक इमारती कोसळल्या
6
चिनी इन्फ्लूएन्सरनं केलं 'फॉलोअर'शी लग्न! व्हायरल होतेय त्यांची प्रेमकहाणी
7
सोनम वांगचुक यांच्या अडचणी वाढणार! प्रशासनाने सांगितले, त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी पुरेसे पुरावे
8
राशीभविष्य १ ऑक्टोबर २०२५: 'या' राशीतील लोकांना आज खूप मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता
9
दळवी, तटकरेंमध्ये शाब्दिक 'वॉर' सुरूच! पालकमंत्रिपदावरील वाद दिवसेंदिवस शिगेला
10
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
11
दिवाळीपूर्वी उद्योजक, व्यापाऱ्यांवर अतिरिक्त वीजदराचा बोजा, ९.९० पैसे प्रतियुनिटने वाढ
12
गोदाकाठी १६ गावांना अजूनही पुराचा वेढा, मराठवाड्यात ९१० डीपी, ९ हजार खांब पाण्यात
13
४.५ लाख महिला अत्याचाराच्या बळी! देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
14
गाझात युद्ध थांबविण्यासाठी ट्रम्प यांची २० कलमी योजना इस्रायलला मान्य!
15
बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
16
चार लाख जणांना रोजगार; ५० हजार कोटींची गुंतवणूक! राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय
17
हत्ती आणि हरीण; पूरग्रस्तांना फक्त आर्थिक नव्हे, मानसिक आधाराची गरज!
18
यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 
19
राहुल गांधी यांचे 'नागरिकत्व' आणि 'ईडी'; या एन्ट्रीमुळे प्रकरणाला अनपेक्षित वळण
20
यशस्वी खेळाडू होण्यासाठी स्वत:प्रती प्रामाणिक राहा; व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा नवोदित खेळाडूंना सल्ला

टँकर-कमांडर अपघातात सहा प्रवासी जखमी

By admin | Updated: October 18, 2014 01:02 IST

डिझेल वाहून नेणारा टँकर व कमांडर यांच्यात आमोरासमोर झालेल्या धडकेत सहा प्रवासी जखमी झाले. यातील एका प्रवाशाची प्रकृती चिंताजनक ...

तुमसर : डिझेल वाहून नेणारा टँकर व कमांडर यांच्यात आमोरासमोर झालेल्या धडकेत सहा प्रवासी जखमी झाले. यातील एका प्रवाशाची प्रकृती चिंताजनक असून त्यांना भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. उर्वरित पाच जखमींवर तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात तुमसर-कटंगी राज्य मार्गावरील वळणावर सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडला. अपघात स्थळावरून मतमोजणी केंद्र हाकेच्या अंतरावर आहे. डिझेल भरलेला टँकर असल्याने मोठा अर्थ टळला.डिझेल टँकर खापरी नागपूरवरून गोबरवाहीकडे जात होता तर ट्रक एम.एच.३१/डी.एस.२८४ तर कमांडर गोबरवाहीकडून तुमसरकडे येत होती. एम.एच.३५/ई.०००२ आंबेडकर वॉर्डातील पॉवर हाऊस वळणावर अनियंत्रित टँकर कमांडरला जोरदार धडक दिली. यातील सहा प्रवाशी मिताराम शेंडे (६५) रा. ताडगाव, अ‍ॅमी डिसुझा (३४) रा. तुमसर, कमल जाऊळकर (७६) रा. चिचोली, नत्थू कडूकर (४०) रा.भंडारा, राजेश मेश्राम (३५) रा. मिटेवानी, हरीचंद्र नगरे (४५) रा. पवनारा जखमी झाले. अपघातातील मिताराम शेंडे यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले.तुमसर विधानसभा मतदार संघातील ईव्हीएम यंत्र शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात ठेवली आहेत. येथून अपघात स्थळ १०० मीटर अंतरावर आहे. डिझेल टँकर भरला असल्याने अपघातानंतर मोठा अनर्थ टळला. प्रत्यक्षदर्शीने सांगितले की ट्रकचा वेग अतिशय जास्त होता. या अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाला. स्थानिक नागरिकांनी त्या चालकाचा पाठलाग केला, परंतु चालक ग्रामस्थांच्या हाती लागला नाही. जखमींना स्थानिक सामाजिक कार्यकर्ता मीरा भट, कैलाश जोशी व इतरांनी उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. ट्रँकरमध्ये सुमारे १३ हजार लिटर डिझेल भरला आहे. ट्रँकरवर एम.व्ही. कापगते साकोली असा संपर्काचा पत्ता लिहिला आहे. तणस पोलीस उपनिरीक्षक मेसरे करीत आहेत. वृत्त लिहीपर्यंत टँकर चालकाला अटक झाली नव्हती. (तालुका प्रतिनिधी)