शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

सहा इंच उंचीची सायकल चालवणारे ‘मन्नाडे’

By admin | Updated: August 18, 2016 00:19 IST

मानवी जीवनात कलेला मोलाचे स्थान आहे. आपली ऐतिहासिक सांस्कृतिक कला टिकविणे हे प्रत्येक कलावंताचे ध्येय असते.

आगळावेगळा उपक्रम: अंधश्रद्धा दूर करण्याकरिता जादूचे प्रयोग विलास बन्सोड उसर्रा मानवी जीवनात कलेला मोलाचे स्थान आहे. आपली ऐतिहासिक सांस्कृतिक कला टिकविणे हे प्रत्येक कलावंताचे ध्येय असते. जिद्द व चिकाटीमुळे साधारण माणूसही आगळेवेगळे प्रयोग करून दाखवितो.३० वर्षापूर्वी एक पश्चिम बंगालचा जादूगर उसर्रा येथे जादूचे खेळ करायला आला आणि कायमचा उसर्रावासी झाला. त्यांच्या कलेतून अंधश्रद्धा दूर होण्याकरिता काही जादूचे खेळ दाखविले जातात. त्यातच सहा इंच व दीड फुट सायकल चालवून त्यांनी आश्चर्याचा धक्का दिला.६० वर्षीय अरुणकुमार मन्नाडे असे या प्रतिभाशाली सायकलस्वार व जादू कलावंतांचे नाव आहे. त्यांचा जन्म कोलकाता येथील आलमबाजार येथे झाला. मन्नाडे यांची कौटुंबिक परिस्थिती गंभीर होती. त्यामुळे ते फक्त इयत्ता पहिली पर्यंतच शिक्षण घेऊ शकले व वयाच्या दहा वर्षापासून देशातील सुप्रसिद्ध जादूगर ए.के. सरकार यांच्या सर्कसीत काम करू लागले.त्यांचे वडील यावेळी पश्चिम बंगाल मधील प्रसिद्ध कमला सर्कसमध्ये काम करायचे. त्यावेळी त्यांच्या वडील सहाइंच उंच व दीड फूट लांब सायकल चालवायचे. त्यांच्याच प्रेरणेतून त्यांनी ही सायकल शिकण्याचे ठरविले व त्यात ते यशस्वी झाले. मन्नाडे यांच्या मते संपूर्ण भारतात हा खेळ फक्त तेच करतात. त्यांच्या वडीलांनी ही सायकल त्यांना भेट म्हणून दिली. त्यांनी आपली स्वतंत्र सर्कस व जादूची प्रयोगशाळा काढली. त्यांनी आतापर्यंत महाराष्ट्र, ओरिसा, बिहार, झारखंड, मध्यप्रदेश, छत्तीसगड येथे विविध भागात आपले जादूचे प्रयोग व सर्कस करून प्रेक्षकांची मने जिंकली. छत्तीसगड मध्ये त्यांच्या जादूचे प्रयोग पाहण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री अजित जोगींनी सुद्धा हजेरी लावली. जादूगर अरुण कुमार मन्नाडे यांचा त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री अजित जोगींकडून सत्कार करण्यात आला. जादूटोणा ही गोष्ट जगात कुठेही नाही. या अघोरी, अनिष्ठ प्रथा बंद व्हाव्या यासाठी ते सदैव आपल्या जादूच्या प्रयोगातून सिद्ध करून दाखवितात. सर्कसमधल्या या कलावंताने उसर्रा येथे स्वातंत्र्य दिवशी सर्वांच्या समोर ही लहानशी सायकल चालवून दाखविली. ६० वर्षीय मन्नाडे यांनी सदर प्रयोग दाखवून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.सध्या उसर्रावासी असलेले मन्नाडे यांची परिस्थिती गंभीर आहे. कुटुंबाचे रहाटगाडगे चालविताना त्यांची दमछाक होते. मात्र अशा कलावंतांची प्रशासनाकडून कुठलीही दखल घेतली जात नाही ही शोकांतिका आहे. अशा प्रतिभाशाली कलावंतासाठी प्रशासनाने काही मानधन दिल्यास त्यांच्या जीवनात नवीन पहाट निर्माण होईल यात शंका नाही.