शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

सहा तासांच्या मेगा ब्लॉकने वाहनधारक वेठीस

By admin | Updated: August 2, 2015 00:51 IST

रेल्वे प्रशासनाने दोन तासाऐवजी सहा तासाचा मेगाब्लॉक केला. यामुळे तुमसर-गोंदिया राज्य महामार्गावर रात्रभर वाहतूक बंद होती.

वाहनांच्या रांगा : पहाटेपर्यंत फाटक बंदतुमसर : रेल्वे प्रशासनाने दोन तासाऐवजी सहा तासाचा मेगाब्लॉक केला. यामुळे तुमसर-गोंदिया राज्य महामार्गावर रात्रभर वाहतूक बंद होती. रेल्वे फाटकाच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.मुंबई-हावडा मार्गावर तुमसर रोड येथे फाटक क्रमांक ५३२ आहे. शुक्रवारी रात्री ११.३० ते पहाटे ५ वाजेपर्यंत अप रेल्वे ट्रॅकवर मेगाब्लॉक करण्यात आले. केवळ एक ते दीड तासांचे हे काम होते. रात्री २.१५ ते पहाटे ४.१५ पर्यंत येथे मेगाब्लॉक करण्याची वेळ होती. अप ट्रॅकची पूर्ण गिट्टी रेल्वे कर्मचाऱ्यांनी काढली. रात्री ११.३० ते पहाटे ५ पर्यंत हे फाटक रेल्वे प्रशासनाने बंद केले होते. यामुळे तुमसर-गोंदिया राज्य महामार्गावर दोन कि़मी. पर्यंत जड वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या. लहान वाहने वाहनधारकांनी दुसऱ्या मार्गाने काढली. दक्षिण-पूर्व रेल्वेचे तुमसर रोड महत्वपूर्ण जंक्शन आहे. १० दिवसापूर्वी डाऊन ट्रॅकचे मेगाब्लॉक येथे करण्यात आले होते. ३१ जुलैचा मेगाब्लॉक करण्याचे रेल्वे प्रशासनाने ठरविले होते. हा मेगाब्लॉक मध्यरात्री करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला होता, अशी माहिती आहे. परंतु रात्री ११.३० वाजता या कामाची सुरूवात झाली. रेल्वे प्रशासनाचे सुमारे ६० ते ७० कर्मचाऱ्यांनी हे मेगाब्लॉकची कामे केली. मुख्य राज्यमार्ग तथा मुख्य रेल्वे मार्गावर इतका मोठा मेगाब्लॉक क्वचितच करण्यात येतो. केवळ अपट्रॅकचा (दोन ट्रॅक) वर हा मेगाब्लॉक होता. येथे रेल्वेच्या नियोजनाचा अभाव दिसून येतो. (तालुका प्रतिनिधी)