शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

साहेब, काेराेना पाॅझिटिव्ह रुग्ण बाहेर फिरताेय हाे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 05:00 IST

भंडारा जिल्ह्यात काेराेना संसर्ग माेठ्या प्रमाणात वाढला आहे. सर्वाधिक रुग्ण भंडारा शहरातील आहेत. या रुग्णांच्या मदतीसाठी आणि शहरात काेराेना संसर्ग हाेऊ नये म्हणून नगर परिषदेने वाॅररूम तयार केली आहे. नगर परिषद इमारतीत असलेल्या या वाॅररूममध्ये नगर रचना सहायक अनिकेत दुर्गावळे, निखिल कांबळे, गणेश मुळे, गणेश चव्हाण हे चार कर्मचारी नियुक्त आहेत. याठिकाणी ते नागरिकांच्या सूचनासाेबतच गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णांना मार्गदर्शन करतात.

ठळक मुद्देनगरपरिषदेची वाॅररुम : जागरुक नागरिकांच्या सुचनेवरुन केली जाते तात्काळ कारवाई

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : साहेब, आमच्या परिसरातील हाेम आयसाेलेशनमध्ये असलेला काेराेना पाॅझिटिव्ह रुग्ण बाहेर फिरताेय हाे!. आमच्या परिसरात काेराेना पाॅझिटिव्ह आहे. सॅनिटाईज करण्यासाठी पथक पाठवा, असे एक ना अनेक फाेन भंडारा नगर परिषदेच्या काेराेना वाॅररूमला दरराेज येतात. नागरिकांच्या या माहितीवरून तत्काळ कारवाई केली जाते.भंडारा जिल्ह्यात काेराेना संसर्ग माेठ्या प्रमाणात वाढला आहे. सर्वाधिक रुग्ण भंडारा शहरातील आहेत. या रुग्णांच्या मदतीसाठी आणि शहरात काेराेना संसर्ग हाेऊ नये म्हणून नगर परिषदेने वाॅररूम तयार केली आहे. नगर परिषद इमारतीत असलेल्या या वाॅररूममध्ये नगर रचना सहायक अनिकेत दुर्गावळे, निखिल कांबळे, गणेश मुळे, गणेश चव्हाण हे चार कर्मचारी नियुक्त आहेत. याठिकाणी ते नागरिकांच्या सूचनासाेबतच गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णांना मार्गदर्शन करतात. पाॅझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लाेकांची यादी तयार केली जाते. पाॅझिटिव्ह रुग्णांची ऑनलाईन पाेर्टलवर माहिती भरली जाते. शहरातील कंटन्मेंट क्षेत्र घाेषित करणे, त्यावर नियंत्रण ठेवणे, शहरात प्रतिबंधात्मक कारवाईसाठी नेमलेल्या पथकाला मार्गदर्शन करणे, एवढेच नाहीतर प्रतिबंधात क्षेत्रात अडकलेल्या नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा देखील केला जाताे. याठिकाणी २४ तास नागरिकांना मार्गदर्शन करण्यात येत आहे.

३५०० रुग्ण हाेम आयसाेलेशनमध्ये

भंडारा शहरात रुग्णांची संख्या माेठ्या प्रमाणात वाढत असून, सद्य:स्थितीत ३५०० रुग्ण गृह विलगीकरणात आहेत. यावर नगर परिषदेच्या वाॅररूमधून नियंत्रण ठेवले जाते. त्यांच्याशी फाेनवरून संपर्क साधला जाताे. तसेच ५२ अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून घराेघरी भेटी देऊन त्यांच्या प्रकृतीसाेबतच ते काेराेना नियमांचे पालन करतात की नाही याचीही चाचपणी केली जाते.

शहरातील प्रत्येक प्रभागातील पाॅझिटिव्ह रुग्णांच्या घरी व प्रतिबंधात क्षेत्रात नगरपरिषदेच्या पथकाकडून निर्जंतुकीकरण करण्यात येते. यासाठी नगरपरिषदेने पथक तयार केले आहे. तसेच नगरपरिषदेच्या वतीने भाजीपाला व्यावसायिक व इतर जीवनावश्यक वस्तू विक्रेत्यांना मास्क आणि सॅनिटायझरचे नि:शुल्क वितरण करण्यात येत आहे.

 

काेराेना संसर्गाची लाट राेखण्यासाठी नगर परिषद सज्ज आहे. विविध पथकांच्या माध्यमातून शहरातील परिस्थितीवर नियंत्रण ठेवले जाते. विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. शहरात निर्जंतुकीकरण केले जाते. नागरिकांच्या मदतीसाठी नगरपरिषदेने वाॅररूम स्थापन केली असून, नागरिकांनी काेराेना संसर्ग राेखण्यासाठी सहकार्य करावे.- विनाेद जाधव, मुख्याधिकारी भंडारा

नियम माेडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई 

ब्रेक द चेन अंतर्गत जिल्ह्यात संचारबंदी लागू आहे. भंडारा शहरात त्याचे काटेकाेरपणे पालन केले जाते की नाही हे पाहण्याची जबाबदारी नगर परिषदेची आहे. पाेलिसांच्या मदतीने नगर परिषद शहराच्या विविध भागात गस्त घालीत असते. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाते. नगर परिषदेच्या वाॅररूमला माहिती मिळताच तेथून तत्काळ संबंधित पथकाला याबाबत सूचित केले जाते. त्यानंतर पथक त्याठिकाणी जाऊन कारवाई करते. विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांसह वेळेनंतर दुकान उघडे ठेवणाऱ्यांवर आतापर्यंत कारवाई करण्यात आली आहे.

अनेक पाॅझिटिव्ह रुग्ण देतात खाेटा फाेन नंबरगृह विलगीकरणात पाठविलेल्या काेराेना पाॅझिटिव्ह रुग्णांची स्थिती काय आहे याची माहिती नगर परिषदेच्या वाॅररूमधून घेतली जाते. त्याची चाचणी करताना त्यांचा फाेन नंबर घेतला जाताे. त्यावर संर्पक साधून मार्गदर्शन केले जाते. मात्र, २० टक्के व्यक्ती चाचणी करताना आपला खाेटा माेबाईल नंबर देत असल्याचे दिसून आले. त्यामुळे हा रुग्ण नेमका कुठे आहे याचा शाेध घेण्यासाठी नगर परिषदेच्या पथकाला त्याने दिलेल्या पत्त्यावर जावे लागते. परंतु, तेथेही याेग्य माहिती मिळत नाही. अनेकजण पाॅझिटिव्ह असतानाही बाहेर फिरताना दिसून येतात. अशा व्यक्तींचा शाेध घेऊन त्यांच्यावर कारवाई केली जाते. अनेकदा पाेलीस ठाण्यात गुन्हाही नाेंदविण्यात येताे. मात्र नागरिक रस्त्यावर भटकंती करतात.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या