शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सिंघम बनणारे अधिकारी टिकत नसतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 22:09 IST

रेती माफिया वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यावर ट्रक चालवायला घाबरत नाही. घटनेचे गांभिर्य लक्षात घेतले जावे. जोखीम पत्करु नका. कुटूबाची काळजी घ्या. सिंघम बनणारे अधिकारी टिकत नसतात, असे भंडारा उपविभागीय पोलीस अधिकारी रिना जनबंधू यांनी सांगितले.

ठळक मुद्देमोहाडी येथे संवाद सभा : रिना जनबंधू यांचे प्रतिपादन

लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : रेती माफिया वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यावर ट्रक चालवायला घाबरत नाही. घटनेचे गांभिर्य लक्षात घेतले जावे. जोखीम पत्करु नका. कुटूबाची काळजी घ्या. सिंघम बनणारे अधिकारी टिकत नसतात, असे भंडारा उपविभागीय पोलीस अधिकारी रिना जनबंधू यांनी सांगितले.पोलीस ठाणे मोहाडी येथे सरपंच, पोलीस पाटील, दक्षता समिती सदस्यांची संवाद सभा घेण्यात आली. त्या सभेला मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. यावेळी मोहाडी पोलीस निरीक्षक शिवाजी कदम, पोलीस उपनिरीक्षक गभणे यांची उपस्थिती होती. रेती चोरीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस पाटलांच्या नियुक्त्या करु नयेत असा प्रश्न सभेत उपस्थित करण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना रिना जनबंधू यांनी रेती माफियांची दहशत असल्याचे अप्रत्यक्ष सुचविले. त्यासाठी आपले जीव धोक्यात घालू नका असा सल्ला दिला. रेती माफियांचा कसा बंदोबस्त करायचा ते आम्ही बघून घेवू. सरपंचांनी गावाच्या समस्या दूर करण्यासाठी उपाय शोधला पाहिजे. रेती ‘चोरी’ होते असा संदर्भ देवून तक्रार करा. रेतीशिवाय अन्य अवैध व्यवसाय गावात, परिसरात होत असतील. त्याची खबर दया त्याची तात्काळ दखल घेवू. अलीकडे मुली पळून जाण्याचे प्रकार वाढलेत. त्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घ्या. एखादी घटना आटोक्याबाहेरची असेल, गुन्हा घडण्याची शक्यता असल्यास तात्काळ पोलीस स्टश्ोनला खबर दिली जावी, कोणत्याही घटनेचे गांभिर्य लक्षात घेतले पाहिजे. गावातील लहान गुन्हे पंचाच्या, तंटामुक्त समितीच्या माध्यमाने सोडवा. दोन गटात, व्यक्तीत तणाव होत असेल तर समन्वय करा, असा विश्वास त्यांनी संवाद सभेत दिला. यावेळी पोलीस निरीक्षक शिवाजी कदम यांनी, महिला दक्षता समिती व पोलीस पाटील यांच्या मदतीने वाद मिटविण्यास मदत होत असते. सहकार्य करुन पोलीस व जनतेचे नाते दृढ करा, असे सांगितले.यावेळी संवाद सभेत पोलीस अपविभागीय अधिकारी रिना जनबंधू यांनी सर्व उपस्थितांची ओळख करुन घेतली. गावात काय परिस्थिती आहे हे जाणून घेतले तसेच अडचणी व समस्यांची माहिती घेतली. यावेळी संवाद सभेला सरपंच, पोलीस पाटील, महिला दक्षता समितीच्या सदस्या व पत्रकार उपस्थित होते.रेती चोरी रोखणाररेती चोरीचे प्रमाण वाढले आहे. त्यांच्यावर प्रशासन आळा घालण्यात अपयशी ठरला आहे. राजकिय प्रभावाने रेती माफिया बिनधास्त व्यवसाय करीत आहेत. अशा विपरित परिस्थितीत आचारसंहिता नंतर रेती माफियांचे मुसके कसे बांधायचे याचा विचार पोलीस प्रशासन करणार आहे, असे रोखठोक उपविभागीय पोलीस अधिकारी रिना जनबंधू म्हणाल्या.