शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सिंगल फेज योजना फसवी

By admin | Updated: February 7, 2015 00:21 IST

येथे मागील ७ वर्षापुर्वी विद्युत वितरण कंपनीने सिंगलफेज योजना अंमलात आणली. सुरवातील ही योजना खुप फायद्याची व चांगली असल्याचे...

दिघोरी (मोठी) : येथे मागील ७ वर्षापुर्वी विद्युत वितरण कंपनीने सिंगलफेज योजना अंमलात आणली. सुरवातील ही योजना खुप फायद्याची व चांगली असल्याचे विज मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले. मात्र प्रत्यक्षात ही योजना फसवी असल्याचा प्रत्यक्ष दिघोरीतील शेतकरी व लघुउद्योजकांना आला आहे.सिंगलफेज योजनेमध्ये फक्त ८ तास थ्रिफेज विद्युत पुरवठा केला जात असल्याने अन्न पिकविणाऱ्या शेतकऱ्यावंर खुप मोठे संकट ओढवले आहे. फक्त ८ तास विज पुरवठा मिळत असल्याने पिकांना सलग व एकसमान पाणी देणे शक्य होत नाही. तसेच या योजनेत विजेचा पुरवठा हा दोन टप्प्यामध्ये होत असतो. पहिल्या टप्प्यात रवीवार ते बुधवार सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजतापर्यंत थ्रिफेज विद्युत पुरवठा होतो. तर दुसरा टप्प्यांत गुरूवार रात्री १२ ते सकाळी ८ वाजेपर्यंत विद्युत पुरवठा होते. त्यामुळे शेतकऱ्यांना खुपच त्रास सहन करावा लागतो. रात्री १२ वाजता शेतात जावून मोटारपंप सुरू करावे लागत असल्याने येथील अनेक शेतकऱ्यांना साप व विंचू याविषयी प्राण्यांची दंश केला असल्याच्या घटना घडल्या आहेत. सुदैवाची बाब अशी की यामध्ये कुणाही शेतकऱ्याचा जीव गेला नाही. जर एखाद्या शेतकऱ्याचा जीव गेला नाही. जर एखाद्या शेतकऱ्यांचा जीव गेला तर याला जबाबदार विज वितरण कंपनीला का धरण्यात येवू नये, असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो.भाजीपाला पिकविणाऱ्या शेतकऱ्यांना कमालीचा त्रास सहन करावा लागतो. कारण भाजीपाला पिकाला तुट पाणी द्यावे लागते म्हणजेच पाईपचे जोड काढून काढून पाणी द्यावे लागत असल्याने रात्रीच्या अंधारात हे शक्य होत नाही. त्यामुळे बऱ्याच भाजीपाला पिकविणाऱ्या शेतकऱ्यांनी भाजीपाला पिकाची लागवड करणेच सोडून दिले आहे. त्यामुळे त्यांच्या आर्थि परिस्थितीवर विपरीत परिणाम झाला आहे.सिंगलफेज योजनेमुळे शेतकऱ्यांसारखीच बिकट अवस्था लघुउद्योजकांची झाली आहे. लघुउद्योजकांना सुद्धा ८ तासच थ्रीफेज विद्युत पुरवठा मिळतो. शिवाय रात्री १२ वाजता सुरू होणाऱ्या थ्रीफेज पुरवण्यामुळे रात्रीला काम कसे करावे, असा गंभीर प्रश्न लघुउद्योजकांना पडला आहे. लघुउद्योजकामध्ये राईस मिल, आईल मिल, आटाचक्की, बेल्डींग दुकान इत्यादी मोडत असून हे उद्योग मजुरांवर पुर्णत: अवलंबून आहेत व रात्रपाळीत काम करायला येथील मजूर तयार नसतात. त्यामुळे लघुउद्योजकांवर उपासमारीची वेळ आली आहे. (वार्ताहर)