लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : क्रांतिकारी राष्ट्रसंत मुनीश्री तरुणसागर महाराज यांचे कडवे वचन ऐकण्याचे भाग्य भंडारा येथील नागरिकांना लाभले. येथील जशभाई मुलजीभाई पटेल महाविद्यालयाच्या विशाल प्रांगणात ५ नोव्हेंबर २००९ रोजी केलेला उपदेश ऐकून भंडारेकर तृप्त झाले होते. ‘शिशु की तरह सरल और पानी की तरह तरल बनो’ असा मुनीश्रींचा उपदेश आजही भंडारा येथील श्रोत्यांच्या स्मरणात आहे. मुनीश्रींचे देहावसान झाल्याचे वृत्त धडकताच भंडारा येथील प्रवचनाच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या.क्रांतीकारी राष्ट्रसंत तरुणसागर महाराज यांचे प्रवचन म्हणजे एक पर्वणीच. सरळ सोप्या भाषेतून नागरिकांना ते उपदेश करायचे. आपल्या विशिष्ट लकबीतून वाईट चालीरितींवर प्रहार करायचे. संपूर्ण विश्वात ख्यातकीर्त असलेले तरुण सागरजी महाराज यांचे आगमन भंडारा शहरात ५ नोव्हेंबर २००९ रोजी पदयात्रेदरम्यान झाले होते. त्यांनी भंडारा येथे एक दिवस विश्रांती घेतली.त्यावेळी भंडारा येथील नागरिकांना त्यांच्या दर्शनाचा लाभ आणि अनमोल वचने ऐकण्याची संधी मिळाली. जशभाई मुलजीभाई पटेल महाविद्यालयाच्या प्रांगणात तर प्रवचन ऐकायला एवढी गर्दी झाली होती की, पाय ठेवायलाही जागा नव्हती. मुनीश्रींचे पालखीतून आगमन झाले, त्यावेळी उपस्थितांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली होती. सभामंडपात तयार केलेल्या विशाल व्यासपीठावर मुनीश्रींचे आगमन झाले तेव्हा उपस्थित प्रत्येक जण त्यांच्यापुढे नतमस्तक झाले होते.यावेळी तत्कालीन आमदार राजेंद्र जैन, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विकास ढोमणे यांनी पद प्राक्षालन केले. राष्ट्रवादीचे धनंजय दलाल, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, रुबी चढ्ढा, केशवराव निर्वाण यांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन झाले. यानंतर मुनश्रींच्या ओजस्वी वाणीतून प्रवचनाला प्रारंभ झाला.संतश्री तरुण सागरजी महाराज म्हणाले, पाणी, वायू आणि ध्वनी प्रदूषणाच्या धोक्याबाबत नेहमी बोलले जाते. त्यापासून बचावाचे उपायही शोधले जात आहेत. परंतु यापेक्षाही विचारांचे प्रदूषण अधिक धोकादायक आहे. या प्रदूषणाने माणसाचे मन दूषित केले आहे. माणसाचे विचारावर नियंत्रण नाही. तो बोलतो एक आणि करतो एक अशी अवस्था आहे. यावेळी त्यांनी विविध उदाहरणे देत आपले मन ‘शिशु की तरह सरल और पानी की तरह तरल बनो’ असा उपदेश दिला. लहान मुलाचे मन जसे सरळ असते आणि पाणी सरळ असते अशा रुपकातून त्यांनी श्रोत्यांना संदेश दिला. मुनश्रींचे शब्दनशब्द उपस्थित श्रोत्यांनी आपल्या मनात कायमचे साठवून घेतले. शनिवारी मुनश्री तरुणसागरजी महाराज यांच्या देहवसनाचे वृत्त धडकताच भंडारेकर त्यांच्या आठवणींनी शोकमग्न झाले.
शिशू की तरह सरल और पानी की तरह तरल बनो!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 23:40 IST
क्रांतिकारी राष्ट्रसंत मुनीश्री तरुणसागर महाराज यांचे कडवे वचन ऐकण्याचे भाग्य भंडारा येथील नागरिकांना लाभले. येथील जशभाई मुलजीभाई पटेल महाविद्यालयाच्या विशाल प्रांगणात ५ नोव्हेंबर २००९ रोजी केलेला उपदेश ऐकून भंडारेकर तृप्त झाले होते. ‘शिशु की तरह सरल और पानी की तरह तरल बनो’ असा मुनीश्रींचा उपदेश आजही भंडारा येथील श्रोत्यांच्या स्मरणात आहे. मुनीश्रींचे देहावसान झाल्याचे वृत्त धडकताच भंडारा येथील प्रवचनाच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या.
शिशू की तरह सरल और पानी की तरह तरल बनो!
ठळक मुद्देनऊ वर्षापूर्वीच्या प्रवचनाला उजाळा : मुनीश्री तरुणसागरजी महाराजांच्या अलौकिक उपदेशाने तृप्त झाले होते भंडारेकर