शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेचा कार्यकारी अभियंत्यांना घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 22:30 IST

जिल्हा महिला रुग्णालयाकरिता आवश्यक निधीची तरतूद झाली असल्याने रुग्णालयाचे बांधकाम करण्यासाठीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, ....

ठळक मुद्देकाळे फासण्याचा इशारा : महिला रुग्णालय बांधकामाची प्रक्रिया पूर्ण करण्याची मागणी

आॅनलाईन लोकमतभंडारा : जिल्हा महिला रुग्णालयाकरिता आवश्यक निधीची तरतूद झाली असल्याने रुग्णालयाचे बांधकाम करण्यासाठीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, अशी मागणी करीत अभियंत्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार प्रक्रिया पूर्ण केली नाही तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना काळे फासू असा इशारा माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी दिला.जिल्हा महिला रुग्णालयाच्या बांधकामाकरिता अंदाजपत्रक तयार करणे, निविदा काढणे आदी प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याच्या मागणीसाठी माजी आमदार भोंडेकर यांच्या नेतृत्वात बुधवारला बांधकाम विभागाच्या कार्यालयात धडक देवून कार्यकारी अभियंत्यांना घेराव घातला. भंडारा येथे स्वतंत्र जिल्हा महिला रुग्णालय मंजूर झाले असून, त्यासाठी आवश्यक तो निधी शासनाने मंजूर केला. यासाठी भोंडेकर यांनी पाठपुरावा केल्याने मागील हिवाळी अधिवेशन काळात शासनाने २५ लाख रुपये निधी उपलब्ध करून दिला. परंतु अनेक महिने लोटूनही सार्वजनिक बांधकाम विभागाने रुग्णालय बांधकामाचे अंदाजपत्रक तयार केले नाही. महिला रुग्णालयाकरिता बांधकाम विभागाकडून टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप भोंडेकर यांनी केला. दरम्यान भोंडेकर यांच्या नेतृत्वात शिवसेना कार्यकर्त्यांनी बांधकाम विभागाच्या कार्यालयात धडक देत कार्यकारी अभियंत्यांना घेराव घातला.यावेळी त्यांनी महिला रुग्णालयाच्या बांधकामासाठी अंदाजपत्रक तयार करणे, निविदा प्रकाशित करणे आदी मागण्या केल्या. यावर ही प्रक्रिया १५ मार्च पर्यंत पूर्ण करण्यात येईल तसेच २५ मार्च पर्यंत प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात येईल, असे आश्वासन कार्यकारी अभियंता ऋषीकेश राऊत यांनी शिष्टमंडळाला दिले. महिला रुग्णालयाचे बांधकामासाठी आवश्यक ती प्रक्रिया निर्धारीत कालावधीत पूर्ण करण्यात आली नाही तर, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भंडारा कार्यालयासमोर आंदोलन करीत अधिकाºयांना काळे फासण्याचा इशारा माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी दिला. यावेळी शिवसेनेचे संजय रेहपाडे, अनिल गायधने, अ‍ॅड.रवी वाढई, यशवंत सोनकुसरे, सुरेश धुर्वे, दिनेश गजबे, नितेश मोगरे, सतीश तुरकर, मयूर लांजेवार, ललीत बोंद्रे, अख्तर बेग मिर्झा, संदीप सार्वे, राजू थोटे, ईश्वर टाले, निखील उपरीकर, श्रीकांत पंचबुद्धे शिवसैनिक उपस्थित होते.