शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील फुटपाथ बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 22:01 IST

शहराची वाढती लोकसंख्या आणि गल्लीबोळात सुरू झालेल्या व्यवसायामुळे राष्ट्रीय महामार्गासह शहरातील प्रमुख चौकातील फुटपाथ बेपत्ता झाले आहेत. यामुळे रस्त्यावरून मार्गक्रमण करताना जीव मुठीत घेऊन चालावे लागते.

ठळक मुद्देअपघाताची भीती : व्यवसायिकांच्या पर्यायी जागेचा विसर
<p>लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शहराची वाढती लोकसंख्या आणि गल्लीबोळात सुरू झालेल्या व्यवसायामुळे राष्ट्रीय महामार्गासह शहरातील प्रमुख चौकातील फुटपाथ बेपत्ता झाले आहेत. यामुळे रस्त्यावरून मार्गक्रमण करताना जीव मुठीत घेऊन चालावे लागते. यातून अपघाताची भितीही वाढली आहे. काही वर्षापुर्वी अतिक्रमण हटविताना या व्यवसायीकांना पर्यायी जागेचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र या आश्वासनाचाही प्रशासनाला विसर पडला आहे.भंडारा शहरात गल्लीबोळात अनेकांनी आपले व्यवसाय थाटले आहेत. बेरोजगारीमुळे अनेकजण चरितार्थासाठी टपरी टाकून व्यवसाय करीत आहेत. शहराच्या राजीव गांधी चौक, त्रिमुर्ती चौक, बसस्थानक परिसर, जिल्हा परिषद चौक, गांधी चौक, शास्त्री चौक, नागपूर नाका यासह शहराच्या विविध भागात लघु व्यवसायीकांनी फुटपाथवर अतिक्रमण करून दुकाने थाटली आहे. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत ही मंडळी याठिकाणी आपला व्यवसाय करीत असतात. मात्र यात शहरातील फुटपाथ गायब झाले आहे. नागरिकांना रहदारीच्या रस्त्यावरून चालावे लागते.त्यामुळे कायम अपघाताची भिती असते. तसेच खरेदीसाठी गेलेल्या ग्राहकांना आपली वाहने भर रस्त्यावरच उभी करावी लागतात. त्यामुळे वाहतुकीसही अडथळा निर्माण होतो. वाहतूक पोलीस वारंवार या व्यवसायीकांना सूचना देऊन दुकानासमोरील वाहने हटविण्याचा प्रयत्न करतात. परंतु वर्षानुवर्ष हीच परिस्थिती भंडारा शहरात कायम आहे.शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गामुळे आधीच शहरवासीय जीव मुठीत घेऊन वाहने चालवितात. अहोरात्र या मार्गावरून भरधाव वाहतूक सुरू असते. त्यातच आता या महामार्गावर पार्किंग झोन झाले आहेत. तसेच अनेक व्यववसायीकांनी आपली दुकाने थाटली आहेत. त्यामुळे याठिकाणी एकादी अप्रिय घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.स्थानिक प्रशासनाने शहरातील अतिक्रमण हटविण्याचा अनेकदा प्रयत्न केला. परंतु त्यात यश आले नाही. तत्कालीन जिल्हाधिकारी सचिंद्र प्रतापसिंह यांनी धडाकेबाज कारवाई करून शहरातील संपूर्ण अतिक्रमण काढले होते. त्यावेळी शहरातील रस्त्यानी मोकळा श्वास घेतला. परंतु बेरोजगारीचा प्रश्न पुढे आला. अनेकांचे व्यवसाय उध्वस्त झाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती.त्यावेळी या अतिक्रमणधारक व्यवसायीकांना पर्यायी जागा देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. परंतु त्यानंतर यावर कोणीही विचार केला नाही. परिणामी आज शहरातील सर्व फुटपाथ दुकानांनी गजबजले आहे.दुकानातील साहित्य रस्त्यावरशहरातील मुख्य बाजारपेठेसह विविध ठिकाणचे दुकानदार आपल्या दुकानातील साहित्य रस्त्यावर मांडत असल्याने दिसून येते. अनेक चौकात हॉटेल व्यवसायीक चक्क भट्टी लावून माल तयार करतात. तर स्टेशनरीसह विविध व्यवसायीक दुकानाच्यापुढे साहित्य मांडतात. यामुळे वाहतुकीला अडथळा होवून नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो. नगरपरिषदेसह बांधकाम विभागाने याप्रकरणी लक्ष देवून अशा व्यवसायीकांना समज देण्याची गरज आहे.