शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Khadse : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
2
शिंदेसेनेच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचा कट रचला जातोय का?; रामदास कदमांनी व्यक्त केली शंका
3
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
4
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
5
रेपो रेट कपातीचा फायदा वाहन कर्जांना देत नाहीत; खासगी बँकांविरोधात फाडाची रिझर्व्ह बँकेकडे तक्रार
6
IND vs ENG : 'गंभीर' मुद्दा! गिलला कदाचित कुलदीपला खेळवायचे होते, पण... गावसकरांचा रोख कुणाकडे?
7
"योगीजी, या लोकांना सोडू नका"; कॉन्स्टेबलच्या पत्नीचा सासरच्यांकडून अमानुष छळ, संपवलं जीवन
8
"तू सिंगल आहेस का?" रिंकू राजगुरूला चाहत्याचा प्रश्न, अभिनेत्रीने रिलेशनशिप स्टेटसच सांगितलं, म्हणाली...
9
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
10
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
11
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
12
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
13
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
14
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
15
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
16
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
17
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
18
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
19
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
20
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले

आजारी मायलेकींचे चंद्रमोळीत वास्तव्य

By admin | Updated: December 18, 2014 00:34 IST

मानवाच्या तीन गरजांपैकी निवारा ही एक अत्यंत महत्वपूर्ण गरज आहे. एका आजारी मायलेकींना नाईलाजाने निवाऱ्याअभावी चंद्रमोळीत थंडीत कुडकुडत जीवन जगावे लागत आहे.

मोहन भोयर तुमसरमानवाच्या तीन गरजांपैकी निवारा ही एक अत्यंत महत्वपूर्ण गरज आहे. एका आजारी मायलेकींना नाईलाजाने निवाऱ्याअभावी चंद्रमोळीत थंडीत कुडकुडत जीवन जगावे लागत आहे. गोबरवाही डोंगरी बु. या जगप्रसिद्ध मॅग्नीज खाणीकडे जाणाऱ्या रस्त्याशेजारीच या मायलेकींचे सध्या वास्तव्य आहे. श्रीमंतीच्या वाटेवर चंद्रमोळीत वास्तव्याला असणाऱ्या मायलेकींकडे कुणाचेच लक्ष नाही. धकाधकीच्या आधुनिक जगात कुणाकडे वेळ व सहाय्य नाही असे दिसून येते.गोबरवाही डोंगरी बु. रस्त्याशेजारी हिगबाई सजदलाल उईके (६५) व तिची मुलगी दशमी उईके (२०) एका गवत व लाकडाच्या चंद्रमोळीत मागील पाच वर्षापासून वास्तव्याला आहेत. पतीच्या मृत्यूनंतर त्यांचे गोबरवाही येथील घर पडले. त्यानंतर हिगबाई आपली मुलगी दशमी सोबत चंद्रमोळीत वास्तव्याला आली. हिगबाईचे नाव दारिद्र्य रेषेखाली यादीत नाही. त्यांच्याकडे शेती नाही. उपजिवीकेकरिता हिगबाई मोलमजुरी करीत आहे. आजारी दशमीला सोडून जाता येत नाही. म्हणून या हंगामात चंद्रमोळीजवळील नहराखाली मोकळ्या जागेत धानाचे पीक घेतले. दोन ते तीन पोती धानाचे पीक या हंगामात आले. त्याची भरडाई करण्याकरिता पैसा नाही. काय करावे या विवंचनेत त्या सध्या आहेत.हिगबाईची चंद्रमोळी जमिनीशी समतल आहे. मागे पाणी आहे. गवत व इतर कचरा असल्याने सरपटणाऱ्या प्राण्याचा येथे सदैव भीती आहे. मुलगी दशमीला न कळणारा आजार आहे. नाकातून व डोळ्यातून सतत पाणी पसरत असतो. एकदा नागपूर येथे रुग्णालयात उपचाराकरिता नेले होते. पुन्हा तो आजार बळावला आहे. इयत्ता पाचवीपर्यंत शिक्षण दशमीने घेतले आहे. हिगबाई रात्री आपल्या चंद्रमोळीत एकटीच राहते. मुलगी दशमीला सुरक्षितेकरिता शेजारच्या घरी रात्री पाठविते. आजार बरा कसा होईल ही चिंता हिगबाईला सतावत आहे.गोबरवाही डोंगरी बु. मार्ग श्रीमंतीचा मार्ग आहे. या मार्गावर जयप्रसिद्ध मॅग्नीजच्या खाणी आहेत. मोठे अधिकारी, कंत्राटदार तथा कर्मचारी याच मार्गावरून मार्गक्रमण करतात. परंतु एकाही सहृदय माणसांचे लक्ष या चंद्रमोळीकडे गेले नाही. खनिज विकास निधीतून कोट्यवधींचा निधी मॉईल प्रशासन दरवर्षी देण्याचा दावा करते. चंद्रमोळीत वास्तव्य करणाऱ्या मायलेकींना एक निवारा बांधून देण्याची गरज आहे.गोबरवाही ग्रामपंचायतीचेही येथे दुर्लक्ष असून बीपीएल यादीत नाव समाविष्ट करणे व निवारा बांधून देण्याची गरज आहे.