शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

श्रावणाची हिरवळ दाटली मंचावर

By admin | Updated: August 26, 2014 23:15 IST

लोकमत सखी मंच तर्फे श्रावण सोहळ्यानिमित्त नृत्य स्पर्धा, ग्रीन मॅचिंग स्पर्धा व वॉर्डनिहाय विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. ग्रीन मॅचिंग स्पर्धेमध्ये सखींनी अशी वेशभूषा केली

सखी मंचचा उपक्रम : विजयी स्पर्धकांना प्रमाणपत्राचे वाटपभंडारा : लोकमत सखी मंच तर्फे श्रावण सोहळ्यानिमित्त नृत्य स्पर्धा, ग्रीन मॅचिंग स्पर्धा व वॉर्डनिहाय विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. ग्रीन मॅचिंग स्पर्धेमध्ये सखींनी अशी वेशभूषा केली की श्रावणाची हिरवळ दाटली. सखी मंचावर असा भासच झाला. स्पर्धेतून विजयी स्पर्धकांना भेटवस्तू व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ता संध्या किरोलीकर, पाहुणे कायाकल्प लेडीज फिटनेस झोनच्या संचालिका मिताली भागवत, राधा कलेक्शनच्या संचालिका मधुरा हलदुलकर व परीक्षक यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. ग्रीन मॅचिंग स्पर्धेत दोन फेऱ्यांमधून एकूण २५ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. प्रथम फेरीत स्पर्धकांचे परिचय, रंग वापर व हिरव्या रंगातील परिधान दागिने सज्जा, केशभूषा व रंगभूषा करून मंचावर जणू श्रावणाची हिरवळच अवतरली असे वाटत होते. यात प्रथम क्रमांकाकरिता मंगला डहाके, द्वितीय सोनू साखरकर, तृतीय क्रमांकाकरिता सुनिता हुकरे यांना निवडण्यात आले. राधाकृष्ण नृत्य स्पर्धेत युगल प्रकारात हर्षा रक्षिये व मनिषा रक्षिये यांनी नवरंग चित्रपटातील अरे जारे हट नटखट ना खोल मेरा घुंगट या गीतावर अप्रतीम नृत्य सादर करून प्रेक्षकांचे मन जिंकले. तर एक नृत्यामध्ये रुपाली पराते प्रथम तर द्वितीय क्रमांक प्रियदर्शनी चंद्रिकापुरे यांनी प्राप्त केला. कार्यक्रमादरम्यान वॉर्डनिहाय स्पर्धेतील बक्षिस वितरण करण्यात आले. गणेशपूर येथे राखी थाली सजावट स्पर्धेत प्रथम पूजा रक्षिये, द्वितीय शालीनी धोंडे, काझीनगर येथे प्रथम अनिता टोपरे व सुनिता हुकरे, द्वितीय, सहकार नगर येथे रांगोळी स्पर्धेत प्रथम अनिता निमजे व द्वितीय रजनी धकाते, चांदणी चौक परिसरातून राखी मेकींग स्पर्धेत जुली निमजे प्रथम तर द्वितीय शिल्पा न्यायखोर व राजीव गांधी चौक एम.एस.ई.बी. कॉलनीत प्रथम विशाखा जिभकाटे तर द्वितीय चित्रा झुरमुरे यांनी मिळविला. श्रावण मेळावा स्पर्धेचे परिक्षण लाखनी तालुका संयोजिका शिवानी काटकर, पवनी येथील अल्का भागवत तर साकोली येथील सुचिता आगाशे यांनी केले. पाहुण्यांना व परिक्षकांना भेटवस्तू व प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा संयोजिका सीमा नंदनवार, संचालन शरयू टाकळकर तर आभार सुहासीनी अल्लडवार यांनी मानले. जिल्हा संयोजक ललीत घाटबांधे व युवा नेक्स्ट संयोजिका ग्रिष्मा खोत यांनी सदस्य नोंदणीची माहिती दिली. वॉर्ड संयोजिका सुधा बत्रा, कल्पना डोंगरे, सोनाली तिडके, शिलपा न्यायखोर, राखी सूर, सारिका मोरे, हर्षा बावनकर, लतीशा खोत, स्नेहा वरकडे व सुधाकर गोन्नाडे व तिघरे यांनी सहकार्य केले. (मंच प्रतिनिधी)