उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : फरार आरोपीना अटक करण्याची मागणी तुमसर : अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील श्रध्दा सुद्रिक या मुलींवर लैगिक अत्याचार करुन तिची अमानुषपणे हत्या करण्यात आली. माणूसकीला काळीमा फासणारी घटनेचा जिल्हा महिला काँग्रेसतर्फे निषेध व्यक्त करीत उर्वरित आरोपीला तात्काळ अटक करण्यासंबंधी उपजिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले.मुलिंवर अमानुष अत्याचार करुन तिची निघूर्ण हत्या करण्यात आली असतांना अजूनपर्यंत पोलिसांनी या घटनेत एकच आरोपीला अटक केली. असून उर्वरित आरोपी मोकाटच आहेत. त्यामुळे पिडीतांचे कुटूंब प्रचंड दहशती खाली आले आहेत. त्याही उपर पोलिसांनी पिडीतांच्या कुटूंबाला संरक्षण देण्याऐवजी आरोपींना संरक्षण देत आहेत. परिणामी समाजात गल्ली बोळात तिव्र रोष व्यक्त होत आहे. निर्भया हत्याकांडानंतर कायद्यातबदल झालात्यानुसार जलदगतीने तपास करुन कारवाई करावी, घटनेतील सर्व आरोपींना अटक करावी, खटला फास्टट्रॅक कोर्टात चालविण्यात यावा आदी मागण्यांसह जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सिमा भुरे यांच्या नेतृत्वात उपजिल्हाधिकारी विजया बनकर यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविले. निवेदन देतेवेळी सिमा भुरे यांच्या सोबत मोहाडीच्या नगराध्यक्षा स्वाती निमजे, नगरसेविका गिता बोकडे, रागिनी सेलोकर, अरुणा श्रीपाद, मिना निखारे, भारती निमजे, ज्योती गणविर, वेदांता गंगभोज व अन्य कार्यकर्त्या उपस्थित होत्या. (शहर प्रतिनिधी)
श्रध्दा हत्याकांडाचा महिला काँग्रेसतर्फे निषेध
By admin | Updated: July 20, 2016 00:25 IST