शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

तुमसर तालुक्याचा कारभार प्रभारींच्या खांद्यावर

By admin | Updated: May 13, 2017 00:21 IST

भंडारा जिल्ह्यात तुमसर तालुका क्रमांक दोनचा तालुका असून शासनाला महसूल मिळवून देणारा एक महत्त्वपूर्ण तालुका आहे.

सहा वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पदे रिक्त : नियमित अधिकाऱ्यांच्या नियुक्तीसाठी पुढाकाराची गरजमोहन भोयर । लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : भंडारा जिल्ह्यात तुमसर तालुका क्रमांक दोनचा तालुका असून शासनाला महसूल मिळवून देणारा एक महत्त्वपूर्ण तालुका आहे. तुमसर तालुक्यात शासनाच्या सहा कार्यालयात अधिकाऱ्यांच्या जागा मागील काही महिन्यापासून रिक्त असून कारभार प्रभारींच्या खांद्यावर आहे. संवेदनशिल तथा राजकारणाचा केंद्रबिंदू असलेला तुमसर तालुका अधिकारीविहीन कसा, असा प्रश्न येथे पडला आहे.तुमसर तालुका जिल्ह्यात क्षेत्रफळात क्रमांक दोनचा तालुका असून आंतरराज्यीय सीमा येथे लागून आहेत. महत्वपूर्ण कार्यालयाच्या प्रमुखांचे पद मागील अनेक महिन्यापासून येथे रिक्त आहेत. संवेदनशील तालुक्यात तुमसर तालुक्याचा समावेश शासन दप्तरी आहे. तुमसर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षकांचे पद मागील चार महिन्यापासून रिक्त आहे. पोलीस निरीक्षक पदाचा प्रभार जवाहरनगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक एस.आर. नागरे यांचेकडे सोपविण्यात आला आहे. तुमसर शहर नेहमी चर्चेत राहते. अनेक अप्रिय घटना शहरात घडतात. संवदेनशील शहर म्हणून तुमसरची ओळख आहे, परंतु येथे चार महिन्यापासून नियमित पोलीस निरीक्षक मिळाला नाही. सोनी हत्याकांड, नगरसेवक प्रशांत उके व त्याचा धाकट्या भावाची येथे हत्या झाली होती. पोलीस कोठीडीतील आरोपीची केक पार्टी पुर्ण राज्यात गाजली हे विशेष.तुमसर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी चंद्रशेखर गुल्हाने यांची बदली झाली. त्यांच्या जागेवर नियमित मुख्याधिकारी अजून आले नाही. भंडारा नगरपरिषदेचे मुख्याधिकाऱ्यांकडे तुमसर नगरपरिषदेचा प्रभार सोपविण्यात आला आहे. तीन वर्षे पूर्ण होण्यापुर्वीच चंद्रशेखर गुल्हाणे यांची बदली झाली. तुमसर येथे भूमिअभिलेख कार्यालयाचे भूमी अभिलेख उपअधिक्षक मारोवकर यांची बदली झाली. मागील एक वर्षापासून येथे नियमित भूमी अभिलेख उपअधिक्षकांची नियुक्ती करण्यात आली नाही. मोहाडीचे भूमी अभिलेख उपअधिक्षक बी.आर. घाडगे यांचेकडे सध्या प्रभार सोपविण्यात आला आहे. ते दर मंगळवारी तुमसर येथे येतात. तुमसर शहर व तालुक्यातील नागरिकांना येथे मोठा त्रास सहन करावा लागत आहे. प्रकरणाचा निपटारा कसा केला जात असेल, हा संशोधनाचा विषय आहे.तुमसर उपजिल्हा रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. सचिन बाळबुद्धे हे सुद्धा प्रभारी आहेत. मागील एक वर्षापासून त्यांच्याकडे प्रभार आहे. तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालयाला नियमित अधिक्षक केव्हा मिळेल, हा प्रश्नच आहे. राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दिपक सावंत भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत हे विशेष.राज्य शासनाचे तुमसर तालुक्यात सात पशु रुग्णालये आहेत. त्यांच्या देखरेखीकरिता तुमसर शहरात पशुसंवर्धन उपआयुक्त हे पद आहे. मागील तीन महिन्यापासून सदर पद रिक्त आहे. डॉ. मंगेश काळे यांची बदली नागपूर येथे करण्यात आली. त्यांच्या जागी प्रभारी म्हणून डॉ. व्ही.ए. ईटनकर कारभार सांभाळीत आहेत. राज्य शासनाच्या चार रुग्णालयात पशू वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे मागील अनेक महिन्यापासून रिक्त आहेत. त्यातून मार्ग काढण्याकरिता राज्य शासनाने तुमसर तालुक्यात पशू दवाखाना सुरू करण्याची नुकतीच घोषणा केली. नियमित डॉक्टरची पदे येथे भरण्याची गरज आहे.तालुका कृषी अधिकाऱ्यांचे नियमित पद येथे वर्षभरापासून रिक्त आहे. तालुका कृषी अधिकारी गभने सेवानिवृत्त झाले तेव्हापासून येथे नियमित तालुका कृषी अधिकारी नाही. गोरगावचे तालुका कृषी अधिकारी एम.ए. वावधणे यांचेकडे तुमसरचा प्रभार देण्यात आला आहे. येथे नियमित अधिकाऱ्यांची तारांबळ उडते तर प्रभारी अधिकारी कसे कामे करीत असतील, हा संशोधनाचा विषय आहे. नियमित कामे, पारदर्शी प्रशासन असे घोषवाक्य शासनाचे आहे. नियमित अधिकाऱ्यांची नियुक्ती महत्वाची आहे.