शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

संपाचा प्रवाशांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2018 23:33 IST

एसटी महामंडळाने जाहीर केलेल्या नव्या वेतन करारातील तरतुदींविषयी नाराजी असल्याने एसटी कर्मचाऱ्यांनी गुरुवारी रात्रीपासून पुकारलेल्या 'काम बंद' आंदोलनाला भंडारा विभागातील सहा आगारांमध्ये संमिश्र प्रतिसाद मिळाला. या अघोषित संपामुळे भंडारा, गोंदिया जिल्ह्यात अनेक ठिकाणी बस सेवा ठप्प झाल्या असून प्रवाशांचे हाल होत आहेत.

ठळक मुद्देभंडारा विभागात संमिश्र प्रतिसाद: एसटीचे सुमारे ३० लाखांचे उत्पन्न बुडाले

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : एसटी महामंडळाने जाहीर केलेल्या नव्या वेतन करारातील तरतुदींविषयी नाराजी असल्याने एसटी कर्मचाऱ्यांनी गुरुवारी रात्रीपासून पुकारलेल्या 'काम बंद' आंदोलनाला भंडारा विभागातील सहा आगारांमध्ये संमिश्र प्रतिसाद मिळाला. या अघोषित संपामुळे भंडारा, गोंदिया जिल्ह्यात अनेक ठिकाणी बस सेवा ठप्प झाल्या असून प्रवाशांचे हाल होत आहेत.भंडारा विभागातील ८२७ फेऱ्यापैकी ६०५ फेऱ्या रद्द करण्यात आले असून ५६ हजार ७२२ किमी अंतर बसफेºया पुर्ण होऊ शकली नाही. त्यामुळे भंडारा विभागाला शुक्रवारला जवळपास ३० लाख उत्पन्नाचा फटका बसला. अघोषित संपात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर आज कुठलीही कारवाई करण्यात आली नसून शनिवारला निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता सुत्रांकडून वर्तविण्यात आली आहे.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भंडारा विभागातर्फे भंडारा व गोंदिया या दोन जिल्ह्याचा समावेश आहे़ यात भंडारा, गोेंदिया, साकोली, तुमसर, पवनी, तिरोडा असे एकूण सहा आगार आहेत़ या आगाराअंतर्गत एकूण ४३२ बसेस आहेत़ करारानुसार देण्यात येणारी वेतनवाढ ही मागणीपेक्षा कमी असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये रोष आहे. याबाबत एसटी महामंडळातील कोणत्याही अधिकृत कामगार संघटनेने संपाची हाक दिलेली नाही. तरीही कामगारांनी स्वयंस्फूर्तीने काम बंद आंदोलन पुकारल्याची चर्चा आहे. 'कर्मचाऱ्यांनी संप पुकारण्याबाबत कोणतीही अधिकृत नोटीस दिलेली नाही', असे एसटी महामंडळाकडून स्पष्ट करण्यात आले.आगाऊ नोटीस दिल्याशिवाय अधिकृतपणे संप पुकारता येत नाही. त्यामुळे कामगारांनी पुढाकार घेऊन काम बंद आंदोलन सुरू केले असून परिवहन मंत्री यांच्या मनमानी विरोधात हा संप पुकारल्याचा संताप एसटी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे. तुमसर, तिरोडा, भंडारा आगारातील एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. गोंदिया, पवनी, साकोली आगरातील काही बसफेऱ्या सुरु होत्या.गाडी आता सुटेल, नंतर सुटेल असे वाटत असताना सुमारे तासाभरानंतर एस. टी. महामंडळाच्या वतीने गाड्या रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले. जो-तो प्रवासी मोबाईलवरून आपल्या घरी व नातेवाइकांना गाड्या रद्द झाल्या आहेत. घरी येण्यास वेळ लागेल, असे सांगत होता. यांचा फायदा खासगी बस वाहतूकरदारांनी घेतल्याचे चित्र बसस्थानक परिसरात पाहण्यास मिळाले.