शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
3
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
4
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
5
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
6
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
7
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
8
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
9
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
10
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
11
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
12
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
13
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
14
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
15
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."
16
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
17
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
18
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
19
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
20
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी

धान्य दुकानदार तहसीलवर धडकले

By admin | Updated: April 22, 2016 01:51 IST

खोट्या तक्रारीवरून तहसिलदारांनी नियमबाह्यपणे शिधापत्रिका जोडल्या आहेत. देव्हाडा (खुर्द) येथील स्वस्त धान्य

मोहाडी : खोट्या तक्रारीवरून तहसिलदारांनी नियमबाह्यपणे शिधापत्रिका जोडल्या आहेत. देव्हाडा (खुर्द) येथील स्वस्त धान्य दुकानदारावरचा अन्याय थांबविण्यात यावा, यासाठी स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने बसस्थानकाहून मोर्चा काढण्यात आला. धान्य दुकानदारांनी तहसिल कार्यालयावर धडक दिली त्यावेळी तहसिलदार कार्यालयात नव्हते. त्यानंतर धान्य दुकानदार संघटनेनी मागण्यांचे निवेदन आमदार चरण वाघमारे यांना दिले.भंडारा जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरविंद कारेमोरे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला. मोर्चात मिलिंद रामटेके, बाळू बोबडे, यशवंत गायधने, योगेश रोटके, मार्तंड मोहनकर, मारोती कोडवते, शालिक गिरीपुंजे, कपूरचंद शेंडे यांच्यासह धान्य दुकानदार सहभागी झाले होते.देव्हाडा (खुर्द) येथील स्वस्त धान्य दुकानदार ज्ञानेश्वर मुटकुरे यांच्या दुकानाच्या विरोधात माजी सभपती झगडू बुद्धे हे २०११ पासून गावातील काही लोकांना हाताशी धरून आणि खोट्या तक्रारी करून अधिकाऱ्यांची दिशाभूल करीत असल्याचा आरोप आहे. बाहेरील स्वस्त धान्य दुकानदार मेश्राम यांना देव्हाडा येथे येऊन धान्य वाटप करण्यासाठी बाध्य केले जात आहे. याला कंटाळून मेश्राम यांनी मेडीकल प्रमाणपत्र जोडून धान्य वाटप करण्यासाठी मनाई केली. ज्ञानेश्वर मुटकुरे यांनी उपायुक्तांकडे प्रकरण दाखल केले. शिधापत्रिका दुसऱ्या गावाला जोडण्याची पद्धत चुकीची आहे, असे सांगून पूर्ववत शिधापत्रिका मुटकूरे यांना जोडण्यात यावे, असे उपायुक्तांनी आदेश दिले. त्यामुळे तहसिलदारांनी फेब्रुवारी २०१६ पासून वादग्रस्त शिधापत्रिका मुटकुरे यांच्या दुकानाला जोडण्यात आल्या आहेत. मागील दोन महिन्यापासून मुटकुरे यांनी धान्याची उचल केली. धान्य वाटपाचे काम सुरू झाले. तक्रारीमधील ४० शिधापत्रिकाधारकांनी धान्याची उचल केली. बुद्धे यांनी खोटी तक्रार जिल्हा पुरवठा अधिकारी, तहसिलदार यांचेकडे केली. तक्रारीची शहनिशा न करता तहसिलदारांनी नवेगाव येथील शिधापत्रिका जोडल्या. खोट्या तक्रारी करणाऱ्या शिधापत्रिका धारकांच्या बोगस शिधापत्रिकांची चौकशी करण्यात यावी. जे दोन तीन महिने धान्याची उचल करीत नाही ते खरंच गरीब आहेत. याची चौकशी व्हावी. गावातील दुसरी बाजू प्रशासनाने तपासावी. नवेगाव येथील रेशन दुकानदाराला जोडण्यत आलेले कार्ड देव्हाडा येथील धान्य दुकानदाराला जोडण्यात यावे अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष अरविंद कारेमोरे यांनी सभेत दिला. (तालुका प्रतिनिधी)धान्यात दगड घातल्याची ग्वाही ४माजी सभापती झगडू बुद्धे यांना अन्न निरीक्षक अधिकारी यांना हाताशी धरून २०११ मध्ये भैय्यालाल बुद्धे यांच्या हाताने रेशन दुकानातील धान्यात खड्डे दगड घातले होते. यामुळे ज्ञानेश्वर मुटकुरे यांचे स्वस्त धान्य दुकान काही दिवसापर्यंत निलंबित करण्यात आले होते. झगडू बुद्धे यांच्या सांगण्यावरून धान्यात दगड घातल्याची ग्वाही भैय्यालाल बुद्धे यांनी तहसिलदार यांच्या कार्यालयात सर्वांसमोर सांगितली.