तुमसर : मध्यरात्री झोपेत असताना मीटरमध्ये शॉट सर्किट होऊन आग लागल्याने किराणा दुकानातील सर्व सामान जळून ५ लक्ष रुपयाचे नुकसान झाल्याची घटना १.१५ वाजता दरम्यान घडली.निकेश चंद्रशेखर पशिने (४०) वर्ष यांच्या किराणा दुकान त्यांच्या मालकीच्याच घरात होता. निकेश हा दुकान बंद करुन लगतच्या घरात आपल्या परिवारासह पत्नी व मुलीसह गाळ झोपेत असताना रात्री १ वाजता दरम्यान आवाज येत असल्याने घराशेजारील मेश्राम खिडकीतून डोकावून पाहिले असता आग लागल्याचे दिसले. त्यावरुन आरडा-ओरड करत त्याची पत्नी राखी व मुलगी योगीता हिला बाहेर काढले. तोपर्यंत दुकान पूर्णत: जळून पाच लक्ष रुपयांचे नुकसान झाले. (शहर प्रतिनिधी)
शॉट सर्किटमुळे दुकानाला आग
By admin | Updated: June 22, 2015 00:23 IST