शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
2
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्त्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
3
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
4
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
5
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
6
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
7
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
8
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
9
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
10
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
11
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
12
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
13
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
14
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
15
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
16
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
17
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
18
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
19
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
20
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं

शिवसेनेच्या जिल्हा बंदला संमिश्र प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 22:51 IST

वाढती महागाई, पेट्रोल दरवाढ, भारनियमन यासह अन्य मुद्यांना घेऊन शिवसेनेने पुकारलेल्या जिल्हा बंदला जिल्हास्तरातून संमिश्र प्रतिसाद लाभला.

ठळक मुद्देठिकठिकाणी रॅली : भारनियमन, इंधन दरवाढीचा विरोध

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : वाढती महागाई, पेट्रोल दरवाढ, भारनियमन यासह अन्य मुद्यांना घेऊन शिवसेनेने पुकारलेल्या जिल्हा बंदला जिल्हास्तरातून संमिश्र प्रतिसाद लाभला. यात तुमसर येथे काही ठिकाणी बंद पाळण्यात आला. तसेच अन्य तालुक्यातूनही प्रतिसाद मिळाला.ग्रामीण भागात जवळपास १६ तासांपेक्षा जास्त भारनियमन सुरु आहे. याचा परिणाम विशेषत: शेतकºयांना बसत असून ऐन सिंचनाच्या वेळी वीज बंद असल्याने धानाला पाणी कसे द्यावे असा प्रश्न निर्माण झाला आहे. दुसरीकडे पेट्रोलच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडत आहे.वाढत्या महागाईवर शासनाला नियंत्रण आणता आले नाही. उर्जामंत्र्यांनी जिल्ह्याला २४ तास वीज पुरवठा करू अशी घोषणा केली होती. ती घोषणा हवेत विरली असून दुसरीकडे जीवघेणे भारनियमन सुरु आहे.याच मुख्य मागणीला घेऊन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र पटले यांनी बुधवारी जिल्हा बंदची घोषणा केली होती. याला जिल्हाभरातून संमिश्र प्रतिसाद मिळाला. काही ठिकाणी व्यापारी प्रतिष्ठाने व शाळा सुरूच होती.यात तुमसर येथे चांगला तर भंडारा, मोहाडी, लाखनी, लाखांदूर, साकोली व पवनी येथे अल्प प्रतिसाद मिळाला. शाळा महाविद्यालय व व्यापारी प्रतिष्ठाने सुरु होती. तुमसरात मात्र सकाळपासूनच बंद पाळण्यात आला. त्यानंतर हळूहळू स्थिती सामान्य होत गेली. भंडारा शहरात शिवसेनेच्या वतीने रॅली काढण्यात येऊन प्रशासनाला निवेदन देण्यात आले.आंदोलनात जिल्हाप्रमुख राजेंद्र पटले, दीपक शेंद्रे, सुधाकर कारेमोरे, संजय रेहपाडे, विजय काटेखाये, संदीप वाकडे, अमीत मेश्राम, नरेश उचिबगले, अनिल गायधने, पवन चौव्हाण,राजू ंब्राम्हणकर, किशोर चन्ने, सूर्यकांत इलमे, भरत वंजारी, अरविंद बनकर, मनोज देशमुख, दिलीप सिंगाडे, अ‍ॅड.रवी वाढई, उमेश देशमुख, महेश पटले, दिनेश पांडे, कृपाशंकर डहरवाल यासह शेकडो शिवसैनिक यावेळी सहभागी झाले होते.