शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेत सामसूम

By admin | Updated: July 1, 2015 00:54 IST

जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणसंग्रामाने वेग घेतला आहे.

कार्यकर्त्यांचा भ्रमनिरास : प्रचाराची भिस्त उमेदवारांवरभंडारा : जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणसंग्रामाने वेग घेतला आहे. निवडणूक चिन्ह मिळाल्यानंतर केवळ तीन दिवस प्रचाराची रणधुमाळी राहणार आहे. असे असताना राज्यात सत्तेत असलेल्या युती सरकारमधील शिवसेनेत मात्र जिल्ह्यात सामसुम वातावरण दिसत आहे. भंडारा जिल्ह्याचे पालकत्व असलेले पालकमंत्री डॉ.दीपक सावंत यांनी जिल्हा परिषद निवडणुकीकडे कानाडोळा केल्यामुळे शिवसेनेची भिस्त आता स्थानिक पदाधिकाऱ्यांवर आली. उमेदवारीच्या वाटपापूर्वी संपर्कप्रमुख खासदार कृपाल तुमाने जिल्ह्यात येऊन गेले. त्यांनी काही ठिकाणी कार्यकर्ता मेळावेही घेतले परंतु, आता मात्र वरिष्ठ नेत्यांची वाणवा कार्यकर्त्यांमध्ये जाणवत आहे.राज्यात युतीचे सरकार असले तरी भंडारा जिल्हा परिषदेत मात्र भाजप आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष स्वतंत्ररित्या निवडणूक लढत आहेत. २०१० मध्ये सेनेचे संख्याबळ केवळ दोनवर होते. आता राज्यात सत्ता असल्यामुळे शिवसेनेचा फौजफाटा प्रचाराला येईल, अशी पदाधिकाऱ्यांना अपेक्षा होती. परंतु जिल्ह्याचे पालकमंत्रीपद शिवसेनेला मिळूनही पालकमंत्री जिल्ह्यात प्रचारासाठी न आल्यामुळे सद्यस्थितीत शिवसेनेत सामसूम वातावरण आहे. पक्षाच्या चिन्हावर रिंगणात असलेले उमेदवार स्वत:च्या बळावर निवडणुकीचा किल्ला लढवित आहेत. उमेदवारी मागताना आपण सत्ता पक्षात असल्यामुळे पक्षाची ताकद पाठिशी राहील, अशी उमेदवारांची भाबडी अपेक्षा होती. अन्य पक्षाच्या नेत्यांकडून जिल्ह्यात प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. विरोधक पक्षांवर आरोपांच्या फैरी झडत आहेत. मात्र शिवसेनेची अद्याप एकही मोठी सभा जिल्ह्यात झालेली नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये निराशेचे चित्र असून मतदानापूर्वी मोठ्या नेत्याची किमान एक तरी सभा होईल, असा विश्वास कार्यकर्त्यांना आहे.(जिल्हा प्रतिनिधी)