शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी शिवसेनेचा आज चक्काजामचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 21:52 IST

धोक्यात आलेले धानपीक वाचविण्यासाठी पेंच प्रकल्पाचे पाणी सोडले नाही तर गुरुवार ४ आॅक्टोबर रोजी राष्ट्रीय महामार्गावर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चक्का जाम करण्याचा इशारा शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे. या शिष्टमंडळाचे नेतृत्व शिवसेना जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी केले.

ठळक मुद्देनिवेदन : पेंचचे पाणी धानासाठी सोडा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : धोक्यात आलेले धानपीक वाचविण्यासाठी पेंच प्रकल्पाचे पाणी सोडले नाही तर गुरुवार ४ आॅक्टोबर रोजी राष्ट्रीय महामार्गावर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चक्का जाम करण्याचा इशारा शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे. या शिष्टमंडळाचे नेतृत्व शिवसेना जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी केले.गत महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने भंडारा तालुक्यासह जिल्ह्यातील भात उत्पादक हवालदिल झाले आहेत. पेंच प्रकल्पाला पाण्याची मागणी करूनही पाणी सोडण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे खुर्शीपार येथे शेतकऱ्यांचा संताप मंगळवारी दिसून आला. आता शिवसेनेने हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार केला आहे. पेंच प्रकल्पाचे पाणी भंडारा तालुक्यापर्यंत पोहचले नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चक्का जाम आंदोलनचा इशारा देण्यात आला.भंडारा तालुका आणि लगतच्या परिसरातील ९ हजार हेक्टर क्षेत्रातील धानपिकाला जीवदान देण्यासाठी पेंच प्रकल्पाचे पाणी सोडण्याची गरज आहे. यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना निर्देश द्यावे अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. तसेच शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईसाठी दोषी अधिकाºयांच्या वेतनातून रक्कम कपात करण्यात यावी, पेंचचे कार्यकारी अभियंता, उपविभागीय अभियंता आणि तहसीलदारांवरही गुन्हे दाखल करावे अशा मागण्या या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.निवेदन देताना संजय रेहपाडे, अनील गायधने, सुरेश धुर्वे, मयूर लांजेवार, प्रभू हटवार, विलास लिचडे, नरेश झलके, अनील कढव, चेतन भुरे, हेमचंद भुरे, नरेश लांजेवार, राजेश सार्वे, शशीकांत आकरे, मुकेश ठवकर, नीळकंठ मानापुरे, रणजित आकरे, रामचंद्र बुरडे, प्रसाद कुकडकर, अनील चकोले आदीसह शिवसैनिक उपस्थित होते.शेतकरी संतप्तपेंच प्रकल्पाचे पाणी सोडण्यास प्रशासन दिरंगाई करीत असल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. या शेतकऱ्यांच्या भावनेचा उद्रेक चक्काजाम आंदोलनातून दिसून येत आहे. यानंतरही प्रशासन कोणतीच ठोस भूमिका घेत नसल्याचे सद्यातरी दिसत आहे.