शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेने काढली हिंदू एकता रॅली

By admin | Updated: June 29, 2017 00:39 IST

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या आरोपीला अटक व भंडाराचे पोलीस निरीक्षक गजानन कंकाळे यांना निलंबित करण्याच्या मागणीसाठी ...

महामार्गावर निदर्शने : नरेंद्र भोंडेकर यांच्यासह १९ कार्यकर्त्यांना अटक-सुटकालोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या आरोपीला अटक व भंडाराचे पोलीस निरीक्षक गजानन कंकाळे यांना निलंबित करण्याच्या मागणीसाठी शिवसेनेचे माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वात शिवसेनेने बुधवारला सकाळी भंडारा बंदचे आवाहन करून हिंदू एकता रॅली काढली. त्यानंतर आंदोलकांनी राष्ट्रीय महामार्ग रोखून निदर्शने केली.त्यामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प राहिली. त्यानंतर पोलिसांनी माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. पोलिसांच्या माहितीनुसार, १९ लोकांना ताब्यात घेऊन सोडण्यात आल्याचे सांगितले.प्रधानमंत्री मोदी यांच्याविषयी आक्षेपार्ह टिप्पणीविरूद्ध भोंडेकर हे भंडारा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले असता तक्रार घेण्याऐवजी आरोपीला पाठिशी घालण्याचा ठाणेदारांनी प्रयत्न केल्याचा आरोप करून त्यांचे निलंबन करण्यात यावे, अशी मागणी करून सेनेने हिंदू एकता रॅली काढली. राजकीय दबावामुळे पोलीस प्रशासनाने पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप भोंडेकर यांनी केला. या हिंदू एकता रॅलीत शिवसेना वगळता अन्य कुठल्याही पक्षाचे कार्यकर्ते नव्हते. यापुढेही हिंदुत्वाच्या अस्मितेसाठी तुरूंगात जाण्याची वेळ आली तरी मागे हटणार नाही, अशी भूमिका माजी आमदार नरेंद्र भोंडेकर, उपजिल्हाप्रमुख संजय रेहपाडे, शहरप्रमुख सूर्यकांत इलमे, अनिल गायधने, उपसभापती ललीत बोंद्रे, यशवंत सोनकुसरे, प्रमोद केसलकर, सतीश तुरकर, दिनेश गजभिये, शेखर पंचबुद्धे, प्रभू हटवार, नरेश लांजेवार, जयंत बुधे, संदिप सार्वे, सुरेश धुर्वे, मुकेश थोटे, राजू ब्राम्हणकर यांनी घेतली होती.शाळा राहिल्या बंदशिवसेनेने पुकारलेल्या बंदमुळे शहरातील व्यापाऱ्यांनी सकाळच्या सुमारास काही वेळ दुकाने बंद ठेऊन त्यानंतर उघडली. परंतु शिवसेनेच्या या आवाहनामुळे परिसरातील शाळांच्या मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये, या काळजी घेत शाळांना सुटी दिली.