लाखनीत शिव व्याख्यानमाला : अरुण नेटके यांचे प्रतिपादनलाखनी: देशात केजी टू पीजी शिवाजी अभ्यासक्रमात येतील तेव्हा आपण खरे शिवाजीचे भक्त होऊ असे मी समजतो. आज समाजात शिवाजींच्या नावाने जातीय विद्वेष पसरविला जाते त्याचे अतिशय वाईट वाटते. शिवाजी म्हणजे शुद्धता, शिवाजी म्हणजे पवित्रता, ते शिवाजी एका जातीच्या बंधनात कसे बंदिस्त होणार? जगाच्या इतिहासात ज्याला तोड नाही, तो राजा एका जातीचा कसा? तर तो सबंध भारताचा राजा होता. तो कुठल्या जातीचा नाही, तर समस्त प्रजेचा होता, असे प्रतिपादन शिववक्ता अरुण नेटके यांनी केले.हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३८७ व्या जयंतीनिमित्त लाखनी येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीद्वारे शिवजन्मोत्सव आयोजित करण्यात आले. या शिव व्याख्यानाला प्रमुख वक्ता म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी खासदार नाना पटोले होते. प्रमुख अतिथी म्हणून आमदार बाळा काशिवार, संजय एकापुरे, नगराध्यक्ष कल्पना भिवगडे उपस्थित होते. सकाळी ५०० मावळ्यांची बाईक रॅली काढण्यात आली. दुपारी समितीद्वारे ढोल ताशा पथक आणि विविध शाळांच्या सहाय्याने झाकी आणि लेझीमचे पथक काढण्यात आले. या भव्य महारॅलीत पूज्य सिंधी पंचायत, स्वप्नपूर्ती संस्था, विश्व हिंदू परिषद, नरेंद्र महाराज भक्तगण संस्था, पतंजली परिवार, ओबीसी सेवा संघ तसेच समर्थ प्राथमिक विद्यालय, समर्थ विद्यालय, राणी लक्ष्मीबाई कन्या विद्यालय, लिटिल फ्लॉवर स्कूल, समर्थ महाविद्यालय, युनिव्हर्सल स्कूल या विद्यार्थ्यांचे एन सी सी पथक, लेझीम आणि शिवाजींच्या वेशभूषधारी झाक्यांचे दर्शन लाखनीकरांनी घेतले. या भव्यमहारॅलीत १५०० पेक्षा अधिक शिवमावळ्यांची गर्दी दिसत होती. लाखनी नगरात ही बहुदा प्रथमच 'न भूतो न भविष्यति' अशा रॅलीचे अतिशय सुंदर शिस्तबंध आयोजन समितीद्वारे करण्यात आले. शिवव्याख्यान प्रसंगी स्वप्नपूर्ती संस्थेद्वारे डॉ. प्रतिभा राजहंस यांना मोती सन्मानाने सन्मान करण्यात आले. याप्रसंगी स्वप्नपूर्ती व नीटस कॉम्पुटर द्वारे विवेकानंद जयंती निमित्य विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यांचे बक्षीस वितरण अतिथींच्या हस्ते वितरण करण्यात आले. कार्यक्रमासाठी अध्यक्ष बाबुराव निखाडे, उपाध्यक्ष संजय वणवे, सचिव अॅड. कोमल गभणे, अजिंक्य भांडारकर, कोषाध्यक्ष प्रविण शेलार, प्रशांत वाघाये, कौस्तुभ भांडारकर, प्रा.उमेश सिंगनजुडे, प्रा.संजय निंबेकर, नंदू चौधरी, पंकज भिवगडे, अमित भिवगडे, सुमित मेघराजानी, विष्णू तळवेकर, विक्रम रोडे, नितेश टिचकुले,विकास पडोळे , गुणवंत दिघोरे, संदीप भांडारकर, आशिष बडगे, जयसिंग राठोड, लोकेश धरमशहारे, अनिल बावनकर,गिरीश शेंडे, विनोद थोटे, सोपान चेटूले, विवेक टिचकुले, चेतन ठवकर, आकाश गैरे यांनी घेतले. संचालन अजिंक्य भांडारकर आणि आभार अॅड. कोमल गभणे यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)
शिवाजी महाराज समस्त बहुजनांचे होते
By admin | Updated: February 21, 2017 00:25 IST