शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही शत्रू नाही..." CM देवेंद्र फडणवीस यांनी मानले उद्धव ठाकरे-शरद पवारांचे आभार, पण का?
2
पुण्यात मध्यरात्री २ तास गावगुंडांचा धुमाकूळ; रिक्षा, कार, स्कूल बससह २० ते २५ वाहनांची तोडफोड
3
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Sensex मध्ये २०० अंकांपेक्षा अधिक उसळी, कोणते शेअर्स चमकले?
4
टेरिफची धमकी देत ट्रम्प यांनी साधली इतिहासातील सर्वात मोठी डील; जगातील मोठी अर्थव्यवस्था झुकली...
5
...तरीही भारत बांगलादेशच्या मदतीला धावला! विमान अपघातातील जखमींवर उपचारासाठी डॉक्टरांचे पथक पाठविणार...
6
ज्या मराठी तरुणीला मारहाण झाली, तिची परिस्थिती गंभीर; डॉक्टर म्हणाले, पॅरालिसीस...'
7
बाजाराचा मोह सोडा! ३ कोटी ९ लाखांचा मालक तर PPF चं बनवेल; फक्त पती-पत्नीला हा फॅार्म्युला वापरावा लागेल
8
दुबईत नोकरी, १० लाखाची ऑफर...; मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी १९ वर्षांनी मोहम्मद शेखची सुटका
9
पाकिस्तानी विमानांना भारतीय हवाई हद्दीत प्रवेश नाहीच; केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय
10
स्वत:च्या कार घेऊन आता ट्रेनने जाता येणार गोव्याला! कसं? जाणून घ्या...
11
Deep Amavasya 2025: दीप अमावास्येला दिवे उजळून 'अशी' करा शास्त्रोक्त पूजा आणि आरती!
12
"आपण भारतात राहतो, बंदूक घेऊन ठेवावी लागेल", प्रेग्नंसीवेळी घाबरलेली रिचा चड्डा; कारण काय?
13
जो पोलिसांना सापडला नाही, त्याला मनसेच्या कार्यकर्त्यांना कसा शोधला?; समोर आली थरारक घटना
14
पाच फुटांच्या मूर्तींचे कृत्रिम तलावांतच विसर्जन करा, पर्यावरण विभागाची सूचना!
15
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: १० राशींवर अपार धनलक्ष्मी कृपा, पगारवाढ लाभ, स्वामी शुभच करतील!
16
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
17
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
18
आजचे राशीभविष्य २३ जुलै २०२५ : या राशींना आजचा दिवस लाभदायी, या राशींसाठी...
19
केवळ १८ महिन्यांचा संसार, मागितली १२ कोटींची पोटगी, बीएमडब्ल्यू! कोर्ट महिलेला म्हणाले... 
20
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार, गृह राज्यमंत्र्यांचा राजीनामा घेणारच : परब

शिव आरोग्य योजना नागरिकांसाठी वरदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2015 00:28 IST

दुर्गम भागातील जनतेच्या आरोग्याच्या समस्या सोडविण्यासाठी राज्यात शिव आरोग्य योजना सुरु करण्यात आली आहे.

सावंत यांचे प्रतिपादन : पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण, नरेगामध्ये भंडारा जिल्हा ठरला राज्यात अव्वलभंडारा : दुर्गम भागातील जनतेच्या आरोग्याच्या समस्या सोडविण्यासाठी राज्यात शिव आरोग्य योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेमार्फत टेलिमेडीकल शिबिरात तज्ज्ञ डाक्टरांच्या माध्यमातून दुर्गम भागातील रुग्णांवर उपचार करण्यात येत आहे. ज्या भागात तज्ञ डॉक्टरांची वाणवा आहे त्या भागासाठी ही आरोग्य सेवा वरदान ठरत आहे, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी केलेभारतीय स्वातंत्र्य दिनाच्या ६८ व्या वर्धापन दिनानिमित्त पोलीस मुख्यालयाचे कवायत मैदान येथे पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी धीरजकुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर, पोलीस अधीक्षक दिलीप झलके, अतिरिक्त पोलीस अधिक्षक कल्पना बारवकर आदी उपस्थित होते. याप्रंसगी पोलीस दल, गृहरक्षक दल, पोलीस श्वान पथक, पोलीस बॅन्ड पथकआणि एन.सी.सी. यांनी पथसंचलन करुन पालकमंत्र्यांना मानवंदना दिली.पालकमंत्री म्हणाले, सन २०१४-१५ मध्ये प्रसुती मातांना दवाखान्यात आणि प्रसुतीनंतर त्यांच्या घरी ‘ड्रॉप बॅक’ सेवा देण्यात आली आहे. त्याचबरोबर बालकांनाही ही सेवा पुरविण्यात आली आहे. राज्यातील ग्रामपंचायती सुशासन आणि मुलभूत सुविधायुक्त असाव्यात यासाठी स्मार्ट ग्राम योजना राबविण्यात येत आहे. त्याचबरोबर सांसद आदर्श ग्राम योजनेच्या धर्तीवर राज्यात आमदार आदर्श ग्राम योजना राबविण्यात येणार आहे. दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी शासनाने महत्वाकांक्षी असे जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे. जिल्हयातील ८६ गावांमध्येत ४२३ कामे पूर्ण झाली आहेत. यामुळे जिल्हयात सुमारे 4 हजार हेक्टर अतिरिक्त सिंचन क्षमता तयार झाली असून शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत आहे. या योजनेला आणखी बळकट करण्यासाठी राज्यात नविन १ लाख विहिरी आणि ५० हजार शेततळयांचा कार्यक्रम राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यामध्ये जिल्हयात सुमारे १ हजार विहिरी व ७५० शेततळयांचे काम यावर्षी पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांना वाढीव मदत देण्याचा निर्णय केंद्र व राज्य शासनाने घेतला आहे. यानुसार आता शेतकऱ्यांंना मदत दिली जात आहे. अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतपिकांचे नुकसान झाले. त्यासाठी सुध्दा शासनाने बाधित शेतकऱ्यांना १ कोटी ७९ लक्ष रुपये आर्थिक सहाय्य दिले आहे. सुवर्ण जयंती राजस्व अभियान १ आॅगस्टपासून महाराजस्व अभियान म्हणून राबविण्यास सुरूवात झाली आहे. या अभियानात जनतेची प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी मंडळस्तरावर विस्तारित समाधान योजना शिबीर घेण्यात येत आहे. या अभियानात लोकांनी मोठया प्रमाणात सहभागी होवून याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही पालकमंत्री यांनी केले. खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना जिल्हा मध्यवर्ती बँकेने २५२ कोटी रूपयांचे कर्ज वाटप केले आहे. मागील वर्षी टंचाईग्रस्त घोषित केलेल्या १५४ गावांमधील १ हजार ६७२ शेतकऱ्यांच्या ७.५ कोटी रूपयांच्या कजार्चे रुपांतरण करण्यात आले आहे. तसेच यातील १ हजार २२१ शेतकऱ्यांना ६ कोटी ३१ लक्ष रूपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. नागरिकाला प्रशासनाव्दारे उत्तम सेवा मिळावी आणि लोकांची कामे वेळेत व्हावीत म्हणून शासनाने महाराष्ट्र लोकसेवा हमी कायदा लागू केला आहे. यामुळे सामान्य माणसाला दिलासा देणारे एक कवच शासनाने जनतेच्या हाती दिले आहे. माहितीच्या अधिकाराइतकाच हा कायदा क्रांतीकारी ठरेल यात शंका नाही, असेही ते म्हणाले. राज्य सरकारने केंद्र सरकारच्या धर्तीवर कौशल्य विकास कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी ही राज्याच्या कौशल्य विकास कार्यक्रमास दिशा व गती देण्यासाठी नोडल एजंसी म्हणून स्थापन करण्यात आली आहे. सन २०२२ पर्यत ४ कोटी ५० लक्ष उमेदवारांना रोजगारानुरूप प्रशिक्षण देवून कुशल मनुष्यबळ तयार करून त्यांना राज्यातच रोजगार उपलब्ध करून देण्याचे लक्ष्य ठरविण्यात आले आहे. गोसेखुर्द प्रकल्पांतर्गत नविन पुनर्वसित २२ गावठाणांपैकी १५ गावठाणास सन २०१४ मध्ये महसुली गावांचा दर्जा देण्यात आला आहे. तसेच जून २०१५ मध्ये ७ गावठाणाकरिता ग्रामपंचायतीची स्थापना सुध्दा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत भंडारा जिल्हा मनुष्य दिन निर्मितीमध्ये राज्यात (प्रतिनिधी)