लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शासनाने जाहीर केलेल्या शिवभोजन योजनेला भंडारा येथे प्रजासत्ताक दिन २६ जानेवारीपासून प्रारंभ होत असून अवघ्या दहा रूपयात नागरिकांना थाळी उपलब्ध होणार आहे. जिल्हा परिषदेत आर्थिक विकास महामंडळाच्या बचत गटाचे भोजनालय आणि महसूल कॅन्टींनमध्ये ही योजना सुरू करण्यात येत आहे.शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत राज्यातील गरीब व गरजू जनतेला सवलतीच्या दरात भोजन उपलब्ध करून देण्याची शिवभोजन योजना सुरू करण्यात आली आहे. २६ जानेवारीपासून भंडारा मुख्यालयी ही योजना सुरू होत आहे. या योजनेचा शुभारंभ पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्या हस्ते होणार आहे. या योजनेंतर्गत सुरू करण्यात येणाऱ्या भोजनात दोन चपात्या, एक वाटी भाजी, एक वाटी वरण, भात समाविष्ठ असलेली थाळी दहा रूपयात उपलब्ध करून देण्यात येणार आहे.भोजनालय चालविण्यासाठी सद्यस्थितीत सुरू असलेल्या खानावळ, स्वयंसेवी संस्था, महिला बचतगट, भोजनालय, रेस्टॉरंट अथवा मेस यापैकी सदर योजना राबविण्यास सक्षम असलेल्या भोजनालयाची जिल्हास्तरावर निवड करण्यात आली आहे. भंडारा जिल्ह्यात केवळ जिल्ह्याच्या ठिकाणी दोन ठिकाणी ही योजना सुरू राहणार आहे.जेवण दुपारी १२ ते २ या कालावधीत भोजनालयात उपलब्ध होणार आहे. शिवभोजन थाळी अंतर्गत प्रत्येक संस्थेला अधिकाधिक दीडशे थाळी देणे अनिवार्य आहे. शासकीय कर्मचारी तसेच कोणत्याही आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांना सवलतीच्या दरात जेवणात सक्त मनाई आहे. या योजनेचा लाभ गरजुंनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.२०० थाळीचे नियोजनभंडारा शहरात दोन ठिकाणी ही योजना सुरू करण्यात येत असून याठिकाणी २०० थाळीचे नियोजन प्रशासनाने केले आहे. या योजनेंतर्गत कंत्राटदारांन अनुदान मिळणार आहे. प्रत्येक थाळीसाठी शहरीभागामध्ये ५० रूपये तर ग्रामीण भागामध्ये ३५ रूपये असे दर कंत्राटदारांना देण्यात येणार आहे. दहा रूपये वगळता अन्य रक्कम ही अनुदानही राहणार आहे.
भंडारात प्रजासत्ताक दिनापासून शिवभोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2020 06:01 IST
लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : शासनाने जाहीर केलेल्या शिवभोजन योजनेला भंडारा येथे प्रजासत्ताक दिन २६ जानेवारीपासून प्रारंभ होत असून ...
भंडारात प्रजासत्ताक दिनापासून शिवभोजन
ठळक मुद्देदहा रूपयात थाळी : दोन ठिकाणी होणार प्रारंभ